भाजप मंत्र्याने देवी लोकमाता अहिल्याबाई होळकर चौकाचे नाव बदलून दिले आजोबांचे नाव
स्थानिक लोकांच्या विरोधानंतर भाजपचे राज्यसभा खासदार जोतिरादित्य सिंधीयाने पोलीस बंदोबस्तात काढला पळ
मुंबई : आबासो पुकळे
दिनांक १ मार्च २०२१ रोजी सोमवारी मध्यप्रदेशातील गुना येथील देवी लोकमाता अहिल्याबाई होळकर चौकाचे नामोनिशाण मिटवून भाजपचे राज्यसभा खासदार जोतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत भाजपचे पंचायत मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया यांनी आपल्या आजोबांचे नाव दिले. हि घटना समजताच स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमस्थळी मंचावर जात जोरदार विरोध दर्शवला.
गुना (मध्य प्रदेश) येथे न्यू टेकरी रस्त्याला देवी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव होते. तेथील चौकास देवी अहिल्याबाई होळकर चौक असे ओळखले जात होते, मात्र भाजप मंत्र्याने भारताच्या पहिल्या आदर्श महिला राज्यकर्त्या महारानी अहिल्यादेवी होळकर यांचे नामोनिशाण मिटवून आजोबांचे नाव देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यानंतर जमीन दान देणारे जमीनदाते कैन्हय्यालाल पाल यांच्यासह स्थानिक नागरिकांनी थेट कार्यक्रमात जाऊन विरोध दर्शविला, मात्र जोतिरादित्य सिंधिया यांनी जमीनदात्यांना तुमचे दान द्यायचे काम आहे. नाव देण्याचा अधिकार सरकारचा आहे. कार्यक्रमानंतर गुना येथील नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर जोतिरादित्य सिंधियाना पोलीस बंदोबस्तात पळ काढावा लागल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
मध्य प्रदेश सह देशभरात जोतिरादित्य सिंधियाचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध
भिंड येथे बघेल समाजाने आंदोलन छेडत गोहद गुलबंदर येथे सिंधियाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मंदसौर येथे धनगर गायरी समाजाने सिंधियाचा पुतळा जाळला. तर इंदौर मध्ये मराठी भाषिक समाज संतप्त झाला असून लोकमाता अहिल्यादेवींनी सिंधियानी सुबुद्धी द्यावी असे पोस्टर झळकले आहेत, तसेच रविवार पर्यंत सिंधियानी चूक सुधारावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. होळकर सेनेचे सुरेंद्रसिंह बघेल यांनी लवकरात लवकर सिंधियानी चूक सुधारावी,अन्यथा गवाल्हेर मध्ये सिंधियाच्या जय विलास पॅलेस वर धडक देण्याचा इशारा दिला आहे. आगरा (उत्तर प्रदेश), हारिद्वार, अहमदाबाद, अलिगढ येथे जोतिरादित्य सिंधियाचे पुतळे जाळून निषेध केला आहे.
निषेध आणि संताप क्षणचित्रे >
No comments:
Post a Comment