भागोजी कोंडीबा पुकळे उर्फ भागूआबा कालवश
पुकळेवाडी गजी मंडळाचे लोकप्रिय झांज्या म्हणून भागूआबा ओळखले जात होते. वृद्धपकाळातहि प्रामाणिकपणे 'कष्ट करून खाणे' हा त्यांच्या बाणा ऐतखाऊ लोकांना मार्मिक होता. श्री. सिद्धनाथ, श्री. जोतीबा देवाला पहाटे उठून अभिषेक घालणारे भागूआबा एक चांगले भक्त होते. सत्याने वागणे, चालणे, बोलणे या तत्वाने जनगणारे भागूआबा यांना आज देवाज्ञा झाली.
"पावन जेवायला या" : भागूआबा
श्रावण महिन्याचे दिवस होते. पाऊसाची दिवसभर आणि रात्रभर रिपरिप सुरु होती. मेंढरं आणि मेंढपाळ थंडी, वारा, पाऊसाचा मारा खात रस्त्याच्या कडेला थांबलेली, आणि अशातच मेंढक्यांच्या बायकांचे तीन दगडाच्या चुलीवर भाकऱ्या भाजायचे काम चालू होते, परंतु भाकऱ्या काही पचत नव्हत्या. इतक्यात सडक धरून भिजत चाललेल्या अनोळखी माणसाला 'पावन जेवायला या' अशी हाक देऊन पोटभर जेवायला घालणारा भागूआबा निराळेच होते. स्वतः उपाशी राहून वाटसरूला जेवण देणाऱ्या भागूआबांचे मानवतावादी कार्य श्रेष्ठ आहे.
भागोजी कोंडीबा पुकळे यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच त्यांच्या कुटूंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. भागुआबांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी ईश्वरचरणी पार्थना..!
💐💐💐💐💐💐💐
शोकाकुल : आबासो पुकळे, पुकळेवाडी.
No comments:
Post a Comment