२९ एप्रिल पर्यंत पुकळेवाडीत जनता कर्फ्यु
पुकळेवाडी : येथे बाधित क्षेत्र घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी, पुकळेवाडी ता- माण येथे दि.२९ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आल्याची माहिती, पोलीस पाटील सौ. लता हेमंतकुमार पुकळे यांनी दिली आहे.
आज पुकळेवाडी ग्रामपंचायत येथे आपत्ती व्यवस्थापन समितीची मीटिंग घेण्यात आली. त्यानुसार खालील निर्णय घेण्यात आले आहेत.
१) दिनांक १९/०४/२०२१ते दिनांक २९/०४/२०२१ पर्यत पुकळेवाडी गाव पूर्णपणे बंद केले आहे.
२) किराणा माल घरपोच दिला जाईल,किराणा मालाची यादी दुकानदारस पाठवणे.
३) मुंबई -पुणे वरुन आलेले लोकांची कोरोना टेस्ट र्रिपोर्ट दाखवणे बधंनकारक आहे. तसेच ७ दिवस 'होम कोरोंन्टाईन' रहावे लागेल.
४) विनामास्क फिरनाऱ्यास ५०० रु दंड भरावा लागेल.
No comments:
Post a Comment