उद्या कर्नाटकात रासपचा क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक सोहळा
मुंबई : भारतीय स्वातंत्र्य महापराक्रमी योद्धा क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या स्मृतिदिन व उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी कर्नाटक रासप तर्फे क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक सोहळा नंदगड़ (जि-बेळगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटक रासपचे राज्य सरचिटणीस अनिल पुजारी यांनी दिली आहे. रासपचे राष्ट्रिय कार्यकारणी सह, विविध राज्यातील रासपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. ७ फेब्रुवारी ला एस टी आरक्षण मेळाव्यामुळे कलबुर्गी ते नंदगड़ होणारी रॅली रद्द करन्यात आली आहे. परंतु थाटामाटात राज्यभिषेक कार्यक्रम पार पाडु, असा विश्वास श्री. पुजारी यांनी व्यक्त केला आहे.
कर्नाटक राज्य संयोजक धर्मन्ना तोंटापुर यांच्यासह श्री. पुजारी हे बेळगावात दाखल झाले आहेत. दोन अठवड्याहुन अधिक काळ रासपचे राष्ट्रिय अध्यक्ष श्री. एस. एल. अक्किसागर हे स्वतः कर्नाटक राज्यात तळ ठोकून आहेत. गदग, कोलार, कलबुर्गी, बेळगाव, विजयपुर,हावेरी, चित्रदुर्ग, म्हैसुर, दावणगेरे, रायचूर, बेल्लारी, यादगिरी, बेंगलोर आदि जिल्ह्यातून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उपस्थित राहतील.
No comments:
Post a Comment