अवंदा कारंड्या मायबाईची यात्रा भरणार; २० फेब्रुवारी २०२१ रोजी यात्रा रद्द केल्याचे जिल्हाधिकारी यांनी घोषित केले आहे.
(आबासो पुकळे/ मुंबई ) : श्री. मायाक्कादेवी यात्रा २०२१ दरवर्षीप्रमाणे पार पडणार आहे. सन २०२० मायक्का देवी यात्रा थाठामाठात पार पडल्यानंतर , कोरोना महामारी रोगाचा पदुर्भाव वाढल्याने देशभरात प्रमुख यात्रांवर बंदी घालण्यात आली होती. गतवर्षी एकमेव चिंचली मायाक्कादेवी यात्रा पार पडली होती. माघ पौर्णिमेला होणारी चिंचली ता- रायबाग जि- बेळगाव(कर्नाटक) येथील श्री. मायक्कादेवीची यात्रा नेहमीप्रमाणे यावर्षी होणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या संख्येने यात्रेला जातात. म्हाकूबाईची यात्रा म्हणून भक्ताकडून सांगितले जाते. शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ पासून ०७ मार्च २०२१ वार- रविवार पर्यंत यात्रा भरणार आहे. २ मार्च वार- मंगळवार रोजी बोन्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. उगार- कुडची येथे कृष्णा नदीत काचोळी पूजन व स्नान केल्यानंतर भाविक भक्त चिंचली मायाक्कादेवीच्या दर्शनाला जातात. दुधनळी नदीला(हल्याळ नदी) स्नान करून महानैवद्य तयार केला जातो. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातुन बैलगाडीने तर मुंबईसह, वसई, ठाणे जिल्ह्यातून भक्त ट्रॅव्हल्स, रेल्वेने येतात तर काही भक्त खासगी वाहनाने यात्रेला येतात.
"मायाक्कादेवीची यात्रा भरणार असल्याबाबतची खात्री करून घेण्यासाठी चिंचणी ता- रायबाग जि- बेळगाव येथे स्वतः जाऊन आलो आहे. पुजाऱ्याची गाठ(भेट) घेऊन आलो आहे; अजून मी रस्त्यातच आहे. २ तारखेला बोन होणार आहे. यात्रा होणार आहे म्हणून सगळीकडे पोस्टर, टीव्हीलाही आलय. मंदिराचे दोन्ही दरवाजे उघडले आहेत. अजून घरी पोचलु नाय, भंडारा लेऊन आलो आहे, यात्रा होणार आहे म्हणून सांगा, ज्याची इच्छा होईल ते येईल" - म्हाकू पांडुरंग पुकळे, मायाक्कादेवी भक्त.(१७/०२/२०२१).
Mayakka Devi Yatra is annually organized at Chinchali in the month of Magh. It is the important festival of the famous Mayakka Devi Temple at Chinchali in Karnataka. Mayakka Devi Yatra 2021 date is March 2.
Mayakka Devi is a manifestation of Mother Goddess Shakti. She is worshipped mainly in Northern Karnataka and South Maharashtra.
The fair and festival includes numerous rituals the most important being chariot pulling.
Mayakka Devi Yatra is observed on Magh Krishna Paksha Chaturthi Tithi or the fourth day during the waning phase of moon in Magh month as per traditional Hindu lunar calendar followed in Maharashtra.
No comments:
Post a Comment