🙏🙏 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक पुकळेवाडी सन २०२०🙏🙏🙏
सर्व ग्रामस्थ मंडळी पुकळेवाडी,मुंबईकर , सर्व व्यवसाय, व नोकरीनिमित्त बाहेर असणारे सर्व पुकळेवाडीकर बंधू आणि भगिनींनो दर पाच वर्षांनी येणारी ग्रामपंचायत निवडणूक यावर्षी ही पार पडली.आज ग्रामपंचायत आवेदनपत्रे भरण्याची मुदत ५.३०वाजता संपली आणि आपल्या गावातून ७ जागांसाठी फक्त ७ च आवेदनपत्रे जमा करण्यात आली.आणि ज्या गावची राजकीयदृष्टीने संवेदनशील अशी तालुक्यात नोंद होती व या गावाची ग्राम पंचायत निवडणूक, खूप संघर्ष , भावकितील वाद जिरवा जिरवी. अशा अनेक बाबतीत आपल्या वर जो कलंक लागला होता तो पुसण्यात आपण सर्वजण पुकाळेवाडीकर आज यशस्वी झालो, हे आपणा सर्वांचे यश आहे हे यश सर्वांचे आहे.यासाठी पुढाकार घेणारे सर्व व्यक्ती ,ग्रामस्थ , यांचे आभार भविष्यात गावातील , गावचा विकास असेल, नवीन योजना असतील, ध्येयधोरणे ठरविणे असेल , एकमेकांची सुख दुःख असतील या सर्वांसाठी आपण असेच एकत्र येऊन आपण काम करणार आहोत या सर्व बाबीसाठी तुमची सर्वांची साथ महत्वाची आहे. आपण एक असेल तर कोणाचीही हिंमत नाही आपल्या पुकळेवाडीला रोखण्याची ,कोणीही नसेल परका येथे असतील सर्वजण आपले या सुविचाराने वागूया आणि आपले गाव सुखी समृद्ध करूया एवढीच अपेक्षा
ग्रामपंचायत पुकळेवाडी
सदस्य
१) श्री ब्रम्हदेव तुकाराम पुकळे
२) श्री तानाजी भीमराव पुकळे
३) श्री विजय बयाजी पुकळे
४) सौ.सपना महादेव पुकळे
५)सौ.पिनाबाई बाळासाहेब पुकळे
६)सौ.अलका शंकर पुकळे
७)सौ.रंजना महादेव पुकळे
वरील सर्व सदस्य बिनविरोध निवडून दिलेबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद
No comments:
Post a Comment