Saturday, January 2, 2021

माणूस मरतो म्हणजे काय ?

 माणूस मरतो म्हणजे काय ?



मृत्यु ही सुध्दा एक भौतिक क्रियाच आहे. मनुष्य मरण पावला यालाच त्याचा जीव गेला असे म्हणतात. मग आपल्या शरीरात जीव असतो तरी कोठे ?


सर्वसामान्यपणे असे समजले जाते की मनुष्याचा जीव त्याच्या हृदयात असतो. काहींच्या मते तो मेंदूत असतो. पण जीवशास्त्रीयदृष्ट्या माणसाचा जीव हा शरीरातील कोण्या एका अवयवात केंद्रीत झालेला नसून मनुष्याच्या शरीरात असलेल्या अब्जावधी (एकावर १४ शून्ये किंवा १० लाख अब्ज) पेशींच्या स्वरूपात सर्व शरीरभर पसरलेला असतो. जीवन म्हणजे या सर्व पेशींमध्ये असलेल्या हजारो वेगवेगळया प्रथीनांच्या मार्फत होणार्‍या रासायनिक क्रियांचा परिपाक असतो. या रासायनिक क्रिया होण्यासाठी शरीराबाहेरुन त्या पेशींना प्राणवायु (ऑक्सिजन) आणि ग्लुकोज सारखी रसायने लागतात. हा पुरवठा जोपर्यंत सुरु असतो तोपर्यंत पेशींचे कार्य सुरु असते म्हणजे त्या जिवंत असतात. शरीरात चालणाऱ्या श्वासोच्छवास आणि (हृदयामार्फत) होणारे रक्ताभिसरण यासारख्या प्रक्रियांद्वारे या पेशींना उर्जापुरवठा सुरु असतो.


 ज्यावेळी या दोन गोष्टी (श्वासोच्छ्वास आणि हृदयक्रिया) काही कारणांमुळे बंद पडतात तेव्हा पेशींचे कार्य बंद पडते, त्यांच्यात होणाऱ्या रासायनिक क्रिया थांबतात म्हणजेच त्यांचे जीवन संपते आणि माणसाचा मृत्यू होतो. जसे गाडीतील पेट्रोल संपले की गाडी बंद पडते किंवा समईतील तेल संपले किंवा त्यावर झाकण ठेवून तिला हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला की समई विझते. त्याचप्रमाणे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा संपला की जीवाचा मृत्यू होतो. यात त्या शरीरातून आत्म्यासारखी एखादी शक्ती बाहेर गेली असे होत नाही !

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...