Saturday, January 2, 2021

वंशावळी (Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी

 वंशावळी (Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी

(वंशावळी# स्वतः वडील-आजोबा-पंजोबा-खापरपंजोबा-पन्तू-नातू-अन्तू-खातू-नातू)

महिन्याच्या प्रत्येक पहीला शुक्रवार लेख 

-----------------------------------------------------------

आपण सर्वसाधारणपणे आपल्या पुर्वजांच्या वंशाची, कुळातील पूर्वजांच्या वंशावळी ही काही अपवादात्मक कारणांसाठीच जुळविण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. शाळा महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणा-या काही महत्वाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यामध्ये वंशावळी हा एक भाग आहे


परंतु हा वंशावळी जुळविण्याचा व शोधण्याचा मार्ग हा तात्पुरत्या कागदोपत्री तरतूदीसाठी सिमीत आहे. कारण जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील व वडीलांचे वडील म्हणजे आजोबा इथपर्यंतच हा वंशावळीचा विषय मर्यादित होतो.

परंतु काही शहरात आजचा मुंबईस्थित तरूण वर्ग  व उत्साही चाकरमाणी  आपली वडीलोपार्जित मालकीची जागा, कुळाची जागा, वंशाची वंशावळी या पारंपरिक व महत्वाच्या गोष्टीचा शोध लावण्याचा व ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत व बहुतेक लोकांना यात यशही आले आहे व येत आहे.


सुनिल भडेकर यांच्या सध्या वास्तवातल्या ४ पिढ्यांची वंशावळी  राजापूर-रत्नागिरी येथील असेल तर त्या आधीची ५ पिढयांची१७०० शतकापासुनची वंशावळी लांजा-रत्नागिरी तालुक्यातील भडे या गावची असेल. तसेच काही तावडे, खानविलकर,टुकरुल, पारकर,मांजरेकर, सुर्वे,राणे, सावंत, दळवी,माने, राऊत,कदम, मोरे,गजरमल,गडकरी यांच्या सदर जिल्ह्यातील वंशावळीच्या बाबतीत आहे.


आपण आपल्या पुर्वजांच्या वंशाची *साधारणतः ९ पिढ्याच्या वंशाची वंशावळी* शोधू शकतो जुळवू शकतो. या सर्व प्रकारात महसुल  विभागाचा दस्तैवजांपैकी काही महत्वाचे दस्तैवज खालीलप्रमाणे-


१) *टिपनबुक नोंदवही-*

(जागेचे सर्व्हे, वर्णन नोंद व मुळ भोगवटाधारक सदर बुकात सापडतात. साधारण १८४० ते १८८० या कालावधीच्या नोंदी)


२) *सुडपत्रक-सुडाचा उतारा सन १८६४*-सुडाच्या मुळ उता-यास जमाबंदी पत्रक असेही म्हणतात.


३) *जंगलखर्डा नोंदवही पत्रक सन १८८६-* सदर नोंदवहीत आपल्या वंशातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणतः १८२० साली झाला होता त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजे ज्यांचा जन्म सन १७०० ते १७२० च्या आसपास झाला आहे त्या वंशातील मुळपुरुषाचे नाव नोंद असते. म्हणजे आपण ७ व ८ व ९ क्रमांकाची पुरुषाची वंशावळी या दस्तैवजावर नोंद असते


४) *बोटखत नोंदवही १८९५ व आकारफोड पत्रक १९५७*- या दस्तैवजावरून आपण साधारण ५ व ६ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.


५) *फेरफार पत्रक नोंदवही व मेळाची फाईल,*- गावनमुना ६अ, तसेच गुणपत्रिका  या दस्तैवजावरून  वंशावळीतील ३ व ४ क्रमांकाच्या पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.


६) *विदयमान २०१८ चा ७/१२ उतारा* यावर आपले व आपल्या वडीलांचे नाव असते म्हणजे क्र.१ व २ क्रमांक  ची वंशावळी येथे जुळली जाते.


*यापैकी कोणते दस्तैवज कोठे अर्ज करावेत.*

१) टिपनबुक नोंदवही-भुमापन तथा भुमीअभिलेख विभाग तहसील

२) जंगलखर्डा नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय

3) बोटखत नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय

४) आकारफोड पत्रक-तलाठी/तहसील कार्यालय

५) मेळाची फाईल-तहसिल/तलाठी कार्यालय

६) फेरफार नोंदवही/गुणपत्रिका/गावनमुना ६अ, ७/१२ उतारा-तलाठी कार्यालय

७) मेळ साक्षीदार पुरावा-तहसिलदार/तलाठी कार्यालय/ 


वंशावळी(Family Tree) छजुळणी करून *तहसिल क्षेत्रातील दुय्यम निबंधक तथा सक्षम महसुल प्रमाणक अधिकारी* मार्फत प्रमाणित करावी


 सदर प्रकरणातील टिपनबुक(सन १८४० ते सन १८८०), सुडाचा उतारा १८६४-सुडपत्रक, जंगलखर्डा नोंदवही १८८६ व बोटबुक नोंदवही-१८९५, ही मोडी लिपीमध्ये तहसिल कार्यालय/भुमापन तथा भुमीअभिलेख यांचे कार्यालयात उपलब्ध होते. त्याचे मराठीमध्ये *शासकीय मोडीलिपी तज्ञाकडुन प्रमाणीत*

हस्तांतर करून घ्यावे.


व सदर दस्तैवज हे अर्ज करून प्रत्येक दस्तैवज हा रुपये २/-, रुपये १० ते जास्तीत जास्त रुपये ४०/- शासकीय शुल्क भरणा करुन संबंधित महसुल विभागात अर्जाचे प्राप्त करवावे.

तरी साध्या सोप्या भाषेत वर्णन केलेल्या माहीतीचा अभ्यास करताना महसुल विषयक कायदेशीर पुस्तके व दस्तैवज यांचाही वाचकांनी अभ्यास करावा.


मागील लेख:

बारा बलुतेदार वतन जमीन पध्दतीखोत व त्यावरील आजची मालकी "


( *पुढील लेख:* हा पतीच्या वडीलोपार्जित ७/१२ जागेवर पतीच्या हयातीत पत्नीचे सहहीस्सेदार म्हणून नाव लावता येते-शासन परिपत्रक-नियम.सदर लेखावर

आपल्या सुचना कळवाव्यात)

--------------------------------

सुनिल सुनंदा शशिकांत भडेकर

महसुल अभ्यासक

LLB, MBA (Finance), B. com.

Special Executive Officer 

Govt. Maharashtra 

WhatsApp: 90296 44000

helpsocialorg@gmail.co

(आजतागायत  १६० च्यावर महसुल निशुल्क  व्याख्याने)

केवळ  मुंबई.ठाणे.राजगड. पालघर.रत्नागिरी निशुल्क व्याख्यानासाठी संपर्क.

-----------------------------------------------

Please Empower your   Friends by Sharing this

-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...