आधुनिक महानायक
बापू बिरू वाटेगावकर(आप्पा)
"रंगा शिंद्यानं बोरगावात पोरीचं नरडं दाबून मारून टाकलं. पण त्याच्याविरुद्ध कुणी साक्ष देईना. भीत होते त्याला. तेव्हा चार मुली माझ्याकडे आल्या. म्हणाल्या आता आमचं काही खरं नाही. आम्ही देह कृष्णा-कोयनेला अर्पण करणार. तुम्हाला काही होत असलं तर बघा. तेव्हा मी कुऱ्हाड हातात घेतली अन् रंग्याचा कोथळा बाहेर काढला." - बापू बिरू वाटेगावकर
पूर्वीच्या दक्षिण सातारा जिल्ह्यात म्हणजे आताचा सांगली जिल्ह्यात कृष्णा-वारणा खोऱ्यात बंदूक आणि कुऱ्हाडीच्या जोरावर गावगुंडावर दहशत निर्माण करणाऱ्या बापू-बिरू वाटेगावकर (अप्पा) यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे़. कायद्याने गुन्हेगार ठरलेल्या व्यक्तीला समाजमान्यता मिळण्यामागचे कारण काय होते़? कोण होता हा बापू-बिरू? कृष्णा-वारणेच्या खोऱ्यात अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या नायकांची इतिहासात कमतरता नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर चर्चेत आलेले आणखी एक नाव म्हणजे 'बापू बिरू वाटेगावकर'. याचा संदर्भ कोणत्या लढ्याशी नसला तरी गावगाड्यात महिलांना, गोरगरीबाना नाडणाऱ्या आणि छळणाऱ्या विरोधात दरारा आणि धाक बापूंचा या भागावर एकेकाळी होता.
बापूने गावगुंडांचा खातमा केला. २५ वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन १२ खून केले. यांपैकी केवळ एका खुनात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पोलिसांकडून खासगीत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या खुनांची मोजदाद नाही. पुरावे आणि साक्षीदारही त्यांनी मागे ठेवले नाहीत. गावगुंडांवर प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या बापूने शिक्षा भोगल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात ‘अध्यात्मा’त रममाण होण्याचा प्रयत्न केला. यात कायद्याच्या दृष्टीने बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) कायमच गुन्हेगार ठरतो, तर लोकांच्यादृष्टी तो रॉबिनहूडपेक्षा कमी नाही. आज सांगली जिल्हा म्हणजे त्यावेळचा दक्षिण सातारा. कृष्णा नदीच्या खोऱ्यात बारमाही पाण्यामुळे ऊसासह नगदी पिकांची कमतरता नव्हती. जिथपर्यंत नजर पोहोचेल तिथंपर्यंत ऊस. काही ठिकाणी बाभळीचे बन. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंहांच्या पत्री सरकारने या परिसराला वेगळी ओळख निर्माण करून दिली. स्वातंत्र्यानंतर गावातील काही ठरावीक लोकांकडे कारभार आला. पैसा आणि सत्तेच्या जोरावर मातलेल्या काही धनदांडग्यांनी मनमानी सुरू केली. यातूनच गावगाड्यात गावगुंडांच्या गुन्हेगारी टोळ्या वाढल्या. बोरगाव हे वाळवा तालुक्यातील समृद्ध गाव. गावाच्या तिन्ही बाजूला कृष्णा नदीचा वेढा आणि सुपीक जमिमीनुळे बारमाही शेतं हिरवीगार. रोजगाराच्या उपलब्धतेमुळे बाहेरचे मजूरही बोरगावसह आसपासच्या वाड्यावस्त्यात येऊन राहिले. गावगुंडांच्या दृष्टीने हे गरीब मजूर आयती शिकार ठरत होते. त्यांच्या कोंबड्या पळवणे, शेतशिवारातून बोकड, शेळ्या उचलणे असे प्रकार वाढत होते. याच्याविरोधात बोलायची सोय नव्हती. कुणी बोललाच तर त्याला धमकावून मारहाणही व्हायची. बोरगावचा रंगा शिंदे हा गावगुंडांच्या टोळीचा म्होरक्या होता. त्याचा उपद्रव इतका वाढली की, त्याने एक दिवस गावातील एका महिलेवर जबरदस्ती केली. पुढे महिलेला जिवंत जाळन्यापर्यंत मजल गेली.
त्यावेळी बापू बिरू वाटेगावकर हा तरुण मेंढपाळ बोरगावच्या तालमीत घाम गाळत होता. लहानपणापासून कधीच शाळेचे तोंड पाहिले नाही, त्यामुळे अक्षरओळख असण्याचा संबंध नाही. आईवडिलांकडून मिळणारी तोंडी माहिती, ओव्या, कीर्तन आणि प्रवचन हेच त्याचे शिक्षणाचे साधन. घोंगडं खांद्यावर टाकून दिवसभर मेंढरांमागे हिंडने, पोटभर खाणे आणि पैलवानकी करणे एवढाच नित्यक्रम सुरू होता. रंगा शिंदेचे कारनामे रोज त्यांच्या कानावर येत होते, मात्र त्याचे गांभीर्य कळत नव्हते. गणेशोत्सवात गावात मंडळासमोर ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता. रात्री ओव्या रंगात आल्या आणि रंगाने बायकांमध्ये शिरून दंगा सुरू केला. बायकांची पळापळ झाली. बापूनी रंगाला बाजूला घेऊन पान सुपारी दिली. ओव्यांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आणि काही वेळातच बापूनी चाकूने रंगाचा कोथळा बाहेर काढला. १९६६ मध्ये बापूच्या हातून हा पहिला खून झाला. यानंतर फरार झालेले बापू पोलिसांना २५ वर्षे सापडले नाहीत.
रंगा शिंदेच्या खुनानंतर बोरगाव पंचक्रोशीत लोकांनी पुरणपोळीचे जेवण केल्याच्या आठवणी काही जुने लोक सांगतात. रंगाच्या भावाने बदला घेण्याची शपथ घेतली, मात्र बापुंनी त्यालाही संपवले. यानंतर रंगा शिंदेच्या मामाने बापुंना मारण्यासाठी बंदुकीचे लायसन मिळवले. याची माहिती मिळताच बापुंनी रंगाच्या मामाला ताकारीच्या बसस्टँडमध्ये गोळ्या घातल्या. सलग तीन खून केल्याने आसपासच्या परिसरात बापू बिरू वाटेगावकर नावाची दहशत निर्माण झाली. बापूविरोधात साक्ष देण्यासाठी कुणी धजत नव्हते, त्यामुळे पोलिसांना पुरावेच मिळाले नाहीत. या काळात बापू बोरगाव, जुनेखेड, वाळवा, ताकारी, रेठरे हरणाक्ष, बिचूद, शिरटे, येडेमच्छिंद्र, खरातवाडी परिसरात दबा धरून बसले. लोकांनी शेतातल्या वस्तीवर त्यांच्या जेवणाची सोय केली. दरारा वाढेल तसे काही तरुण बापूकडे ओढले गेले. गावगुंडांमुळे आपण पोलिसांच्या हाती लागू याची भीती बापुंना होती. त्यामुळे अशा गावगुंडांना बापूने हेरून ठार केले. शेतात खड्डे काढून मृतदेहांची विल्हेवाट लावली. एकूण बारा खुनांची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र बापुंनी यापेक्षा जास्त खून केल्याची माहिती पोलिस खासगीत देतात. १२ खून करूनही बापुंना केवळ रंगा शिंदेच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा झाली. आपल्या नावाने कुणी लोकांना दमदाटी करून लूटमार करणे त्यांना पसंत नव्हते. यातून चार सहकाऱ्यांवर बापूने हल्ला केला. स्वत:च्या मुलालाही बापुंनी मारले. या साऱ्या घटना गेल्या चार-पाच वर्षांत बापू स्वत:च सार्वजनिक कार्यक्रमांतून सांगत असे.
सामान्यांसह पोलिसांशीही दोस्ती
खूनसत्र सुरू झाल्यानंतर बापू तब्बल २५ वर्षे पोलिसांना चकवा देत होते. या काळात त्यांना शेतकरी आणि मजुरांनीच तारले. जेवणाची शिदोरी शेतात पोहोच केली. पोलिसांच्या गाड्या पोहोचण्यापूर्वी बापुंना निरोप पोहोचायचे. शिवारातील मंदिरांमध्ये आसरा मिळाला. या काळात काही पोलिसांनीही बापूला मदत केली. बापुंना मिळालेली बंदूकही एका पोलिसाचीच होती. त्यांनी साताऱ्यातून बंदूक मिळवल्याचे पोलिस चौकशीत सांगितले होते. विशेष म्हणजे बंदुकीच्या गोळ्याही त्यांना काही पोलिसांकडून मिळाल्या होत्या. या नेमक्या कुणाकडून मिळाल्या याबाबत मात्र अखेरपर्यंत मौन बाळगले. जेव्हा नाव सांगण्याची वेळ आली, तेव्हा त्याने आजारपणात मेलेल्या पोलिसाचे नाव सांगून वेळ मारून नेली. १९९० मध्ये बापुंना तत्कालीन पोलिस निरीक्षक मदन पाटील यांनी जुनेखेडच्या परिसरात बाभळीच्या बनात जेरबंद केले. कळंबा जेलमधील बापुंना पोलिस बंदोबस्तातून काढून पळवण्याचाही प्रयत्न झाला. सांगली कोर्टातील सुनावणी आटोपून कोल्हापूरला परतताना शिगावचा गुंड रवी कांबळे याने तमदलगेजवळ एसटी अडवून बापुंची सुटका केली होती. यानंतर काही वेळातच पोलिसांनी जत तालुक्यातील उमदीजवळ त्यांन जेरबंद केले. जन्मठेपेची शिक्षा भोगताना तुरुंगात चांगल्या वागणुकीचा फायदा मिळाला. रंगा शिंदेचा बंदोबस्त केल्यामुळे त्याला चार एकर जमीन मिळाली होती. अध्यात्माची गोडी याच काळात वाढल्याचे बापू नेहमी सांगत असे. शाहीर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा आणि मंगला बनसोडे यांच्या तमाशातील वगनाट्याने बापूंना जनमानसांत पोहोचवले. किंबहुना, बापूची प्रतिमा निर्माण केली.
अध्यात्मिक वृत्तीने बदलली प्रतिमा
फरार असलेल्या काळात एकदा बापू बहे-बोरगावच्या रामलिंग बेटावर गेला होते. सोबत चार साथीदार होते. मध्यरात्रीच्या सुमारास रामाचे दर्शन घेण्यासाठी पुजाऱ्याला उठवले. तेव्हा स्वामी जोगळेकर महाराज मंदिरात भेटले. जोगळेकर महाराजांनी बापूंना माळ दिली. 'मांसाहार मस्तीची वस्तू आहे. व्यसन सोड आणि पैशांचा मोह करू नको,' असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर बापूंनी मांसाहार आणि व्यसन केलेच नाही. जन्मठेपेच्या काळात अध्यात्मिक वृत्ती आणखी वाढली. अभंग तोंडपाठ झाले. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची संगत सुटली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला होता. बापू बिरू प्रवचने देऊ लागले. बापअन्यायविरोधत लढणारा ढाण्या वाघ, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. जनमाणसात गावगुंडांची दहशत असते, मात्र गावगुंडावर ज्यांची प्रचंड दहशत होती असे बापू बिरू नावाने प्रसिद्ध असणारे "आधुनिक महानायक बापू बिरू वाटेगावकर" ९६ व्या वर्षी १६ जानेवारी २०१८ ला अर्थात" कृष्णेच्या तिरावरील वादळ अंनतात विलीन झाल. !!