Sunday, April 30, 2023

महाराष्ट्रात धनगर समाजाला किंमत काय? माजी मंत्री अण्णासाहेब डांगेंचा उद्विग्न सवाल; म्हणाले फेटा बांधून मिरवू कशाला ?

महाराष्ट्रात धनगर समाजाला किंमत काय? माजी मंत्री अण्णासाहेब डांगेंचा उद्विग्न सवाल; म्हणाले फेटा बांधून मिरवू कशाला 

माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करताना खासदार श्रीनिवास पाटील खासदार अमोल कोल्हे माझे मंत्री जयंत पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक व अन्य.

|महाराष्ट्रातील समाजामध्ये धनगर समाजाला (Dhangar community) किंमत काय? समाजालाच किंमत नसेल तर आपण फेटा बांधून कशाला मिरवायचं, म्हणून मी फेटा बांधायचा सोडून दिला होता, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे (Dr. Annasaheb Dange) यांनी दिली. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते. अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाविषयी व्यक्त केलेल्या नाराजीतून त्यांचा रोख नेमका कुणाकडं, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून अण्णासाहेब डांगेंना डी. लिट ही पदवी

महाराष्ट्रातल्या समाजामध्ये धनगर समाजाला काय किंमत आहे? असा सवाल माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी केला आहे. यावर सगळ्यांनी गंभीरपणे विचार करावा असेही डांगे म्हणाले. इस्लामपूरमध्ये अण्णासाहेब डांगे यांना पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं इस्लामपूरमध्ये जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना अण्णासाहेब डांगे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यावेळी व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात धनगर समाज महत्त्वाचा घटक

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात धनगर समाज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. धनगर समाजाची एक व्होट बॅंक मानली जाते. विविध राजकिय पक्ष ती आपल्याकडे वळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असतात. यातच सांगली जिल्ह्यातील धनगर समाज राजकिय दृष्ट्या अधिक जागृत आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत दिवंगत बॅ. टी. के. शेंडगे, दिवंगत अण्णासाहेब लेंगरे, दिवंगत शिवाजीराव शेंडगे, प्रकाश शेंडगे हे चार आमदार निवडून विधानसभेत गेले तर अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे हे तीन आमदार विधान परिषदेत गेले. त्यापैकी प्रकाश शेंडगे यांना दोन्ही सभागृहाचे सभासद होण्याची संधी मिळाली.

युतीच्या काळात ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिले

वाळवा तालुक्यातील इस्लामपूरचे अण्णासाहेब डांगे हे संघाच्या मुशील घडले. पुढे त्यांना भाजपने विधान परिषदेत संधी दिली होती. भाजपच्या माधव प्रयोगात ते धनगर समाजाचा चेहरा होते. त्यांनी धनगर समाज भाजपला जोडण्यासाठी संघटनात्मक बांधणी केली. डांगे यांना विधान परिषदेत भाजपचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर ते ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. 2001 ला त्यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला होता. मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ब्राम्हणी धर्मापासून सावधान : शाहू महाराज

 ब्राम्हणी धर्मापासून सावधान : शाहू महाराज



७ तोळे सोने परत करणारा प्रामाणिक राजस्थानी धनगर

 ७ तोळे सोने परत करणारा प्रामाणिक राजस्थानी धनगर 



Saturday, April 29, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबिरात 162 तक्रारींचे निराकरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबिरात 162 तक्रारींचे निराकरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबिरात तक्रारीचे निराकरण करताना मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर अधिकारी.


मुंबई : |२९/०४/२०२३

सरकार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुंबई महापालिकेच्या भायखळा ई वार्ड येथे पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबिरात 162 तक्रारींचे निराकरण महिला व बाल विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

भगवान मामा यांचा सेवापूर्ती सोहळा धुमधडाक्यात

भगवान मामा यांचा सेवापूर्ती सोहळा धुमधडाक्यात 

श्री भगवान सिताराम पाटील (मामा) यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे पार पडला. 

श्री भगवान मामा यांचा सेवापूर्ती सोहळा वाजत गाजत, धुमधडाक्यात विविध मान्यवरांच्या शुभेच्छा आशीर्वादाने पार पडला. सेवापूर्ती समारंभ पार पडल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वावंजे ते त्यांचे राहते घरापर्यंत गावातून वाजत गाजत धुमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट मित्रपरिवार सहकारी सर्वजण सहभाग झाले होते. सर्वांसाठी जेवणाचा खास कार्यक्रम त्यांनी राहत्या घरी आयोजित केला होता. शिपाई जरी असले तरी अडल्या नडल्या लोकांना ते आधार वाटायचे.

------





श्री. एस. एस. फडतरे यांची सेवापुर्ती

रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. एस. एस. फडतरे साहेब यांचा सेवापूर्ती समारंभ पार पडला. दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी येथे तर 28 एप्रिल 2023 रोजी नावडे येथे पार पडला. 




Thursday, April 27, 2023

माजी सरपंच आनंदा बापू पुकळे यांचे निधन

माजी सरपंच आनंदा बापू पुकळे यांचे दुःखद निधन

पुकळेवाडी गावचे नेते आनंदा बापू पुतळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गावच्या विकासासाठी ते व्यक्त होणारे नेतृत्व होते. लोकांच्यासाठी काम करणारे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने कुकुडवाड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.





शेतकऱ्यांच्यासाठी माण तालुक्यात राजकीय नेते एकत्र

शेतकऱ्यांच्यासाठी माण तालुक्यात राजकीय नेते एकत्र

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर,आमदार जयकुमार गोरे भाऊ, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई , राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख माजी कोकण आयुक्त, अभयसिंह जगताप, राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते बबन दादा विरकर, दादासाहेब दोरगे, मार्केट कमिटी उपसभापती वैशालीताई विरकर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, माऊली सलगर आदी मान्यवर उपस्थित होते.


Friday, April 14, 2023

महामानवाचे भक्त न बनता त्यांच्या विचाराचे शिष्य बनावे : प्रबोधनकार गोविंदराम शूरनर

महामानवाचे भक्त न बनता त्यांच्या विचाराचे शिष्य बनावे : प्रबोधनकार गोविंदराम शूरनर

जयंती कार्यक्रमांत बोलताना प्रबोधनकार गोविंदराम शुरनर व अन्य मान्यवर. 


नांदेड (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे महात्मा बसवेश्वर, महात्मा जोतीराव फुले, भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराम शूरनर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, या महापुरूषानी जे कार्य केले ते कोण्या एका समाजासाठी नाही तर सर्व मानवाच्या उद्धारासाठी केले याचा विसर पडू देवू नका, त्यांच्या कार्यामुळेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, राजकिय बदल झालेला दिसून येतो. नविन पिडिने या महापुरुषांचे भक्त न बनता त्यांच्या विचारांचे शिष्य बनावे असे प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुणे डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरानी आंतरजातीय विवाह घडवून जांतीअंताचा लढा देवून समतेचा संदेश दिले, तेच कार्य महात्मा जोतीराव फुले नी आंतरजातीय विवाह घडवून आणले, यापूढे जाऊन शैक्षणिक कार्याची सुरूवात करून मानसाला मानुस बनविले, तेच कार्य डॉ बाबासाहेबांनी संविधानाव्दारे आपणाला स्वातंत्र्य मिळवून दिले यांची जाणिव नविन पिडिनी ठेवली तरच लोकशाही टिकेल असे बोलले. केरबा जेटेवाड, डॉ. गणपत जिरोनेकर, मारोती पवार यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला व्हि. जंगले, शेषराव कांबळे, शिरसेकर सर, सौ. सावित्री शूरनर, शंकर रघुजीवार, नरेन्द्र शंकर, सौ. ज्योती कसनकर , सौ.वनिता राठोड, विजयकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे शेवटी ग्रंथपाल मदनेश्वरी देवकते यांनी सर्वांचे आभार मानले.


Thursday, April 13, 2023

माण खटावच्या प्रांताधिकारीपदी उज्वला गाडेकर रुजू

माण खटावच्या प्रांताधिकारीपदी उज्वला गाडेकर रुजू


मान खटावचे प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रांताधिकारी म्हणून सौ उज्वला गाडेकर यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयात हजर राहून पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माण तालुका तलाठी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

माण खटावच्या प्रांताधिकारी सौ उज्वला गाडेकर यांनी आज प्रांताधिकारी दहिवडी येथे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला💐💐💐💐

मंगलारामजी देवासी के नेतृत्व में पंचायत समिति मुख्यालय पर धरना प्रदर्शन

सभी समाज बंधुओ से निवेदन है, कल दिनांक 13 अप्रैल को प्रातः 10 बजे मारवाड़ जंक्शन समिति के सामने प्रधान मंगलाराम जी के नेतृत्व में धरना प्रदर्शन में ज्यादा से ज्यादा संख्या में पधार कर अपने समाज की ताकत और एकता का परिचय दें विकास अधिकारी मारवाड़ जंक्शन द्वारा परेशान किया जा रहा है विधायक खुशवीर सिंह के द्वारा भी काम नहीं करवाये जाने पर परेशान किया जा रहा है*🙏


चलें मारवाड़ जंक्शन                            चले मारवाड़ जंक्शन

 दिनांक 13/04/2023 को सुबह 10 बजे मारवाड़ जंक्शन प्रधान मंगलाराम जी देवासी के नेतृत्व में पंचायत समिति मुख्यालय पर धरना प्रदर्शन किया जाएगा सभी ज्यादा से ज्यादा संख्या में पधार कर समाज की एकता का परिचय दें ! खुशवीर सिंह को रबारी समाज के वोट पूरे चाहिए लेकिन रबारी समाज का कोई भी भाई सरपंच, प्रधान, MLA, पंचायत समिति सदस्य, जिला परिषद सदस्य नहीं होने चाहिए इनको राजनीतिक भागीदारी कभी नहीं देना चाहते रबारी सिर्फ ऐवड (भेड़ बकरी) सराये और अनपढ़ भाईयों को मूर्ख बना बनाकर समाज कि केतली के पैसे ले लेकर बस उनको जिताते रहें!  

खुशवीर सिंह अभी मंगलाराम जी देवासी प्रधान को BDO के माध्यम से परेशान कर रहे हैं उससे पहले भमरी हरीश देवासी बिजोवा सरपंच साहब को भी मुंशी के माध्यम से परेशान किया बहुत परेशान किया जो समाज की एकमात्र महिला सरपंच हैं और समाज को मजबूर होकर सड़क पर आना पड़ा था समाज को सड़क पर परेशान करने में खुशवीरसिंह ने कोई कमी नहीं छोड़ी!

प्रदर्शन करते हूए देवासी समाज के भाई 



खुशवीर सिंह निर्दलीय MLA हैं मारवाड़ जंक्शन से जो सीएम गहलोत साहब की सरकार बचाने के नाम पर अपनी मनमर्जी से अधिकारी लगाकर अपने रबारी समाज के प्रतिनिधियों को टारगेट कर रहे हैं ! इससे पहले शिलालेखों में प्रधान मंगलाराम जी देवासी और भमरी हरीश देवासी बिजोवा सरपंच का नाम नहीं लिखना इससे यह दर्शाता है कि इनको रबारी समाज के नाम से नफरत है ! 

इनको वोट रबारी समाज के पूरे चाहिए लेकिन इनके सामने कोई रबारी समाज का राजनेता नहीं होना चाहिए  यह इनकी मानसिकता है!

 कुछ समाज के चाटुकार पाल रखे हैं जो इनके कहने के अनुसार समाज को गुमराह करते रहते हैं जो लोग समाज के लिए लड़ते हैं उनको बदनाम करते हैं! खुशवीर सिंह कभी नहीं चाहते कि कोई देवासी भाई राजनीति में आगे आए यह सिर्फ वोट और कोतली के नोट देते रहे और उनके वोटों पर राज करता रहूं आज भाइयों हमारे प्रधान मंगलाराम जी के साथ हो रहा उससे पहले बिजोवा सरपंच के साथ हुआ यह सिर्फ रबारी समाज को ही क्यों टारगेट कर रहे हैं समाज को समझने की जरूरत है और यह आगे भी दूसरे भाइयों के साथ ऐसा ही करते रहेंगे आप इनको वोट देते रहेंगे और माला साफा पेहनाते रहेगे तो यह मिट्टी व झूठी बातों से समाज को गुमराह करते रहेंगे अब तो रबारी समाज जागो यह आपको कभी भी राजनीति में आगे नहीं आने देना चाहते है BDO के माध्यम से प्रधान मंगलाराम जी को फेल करना चाहते हैं प्रधान साहब कि राजनीति खत्म करना चाहते हैं ताकि कभी हमेशा कोई आगे नहीं आए 🙏 सभी भाइयों से हाथ जोड़कर विशेष निवेदन है कि आपको कल ज्यादा से ज्यादा संख्या में पधार कर भाई मंगलाराम जी का सहयोग वह समर्थन करें आने वाले इलेक्शन में खुशीसिंह का हिसाब किताब बराबर करना है इसलिए जरूर अपनी उपस्थिति दर्ज करावे🙏

- हरीश देवासी 

हरीश देवासी यांनी कळवले आहे की मारवाड जंक्शन येथे अपक्ष आमदार मुख्यमंत्री गेहलोत यांच्या सोबत राहून देवासी समाजातील सरपंच यांच्यावर दबाव आणून काम करत आहेत. गटविकास अधिकारी त्रास देतात. याविरुद्ध आज १३/ ०४/२३ रोजी मारवाड जंक्शन पंचायत समिती वर देवासी समाजाने विशाल धरणा प्रदर्शन करत जोरदार निषेध नोंदवला.

यात्रा जोतिबा देवाची ! सांगता अखंड हरिनाम सप्ताहाची !!

यात्रा जोतिबा देवाची ! सांगता अखंड हरिनाम सप्ताहाची !!

कुलदैवत श्री जोतिबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी कोल्हापूर येथे पार पडली. तत्पूर्वी दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी पुकळेवाडी येथून श्री रतन नंदी सोबत नगारा घेऊन भाविक भक्त मोठ्या उत्साहाने जोतिबा डोंगराच्या दिशेने रवाना झाले. दिनांक 4 एप्रिल सायंकाळी पाच वाजता रतन नंदीसह भक्तांनी  जोतिबा डोंगराकडे पायथ्याकडून शिखराकडे प्रस्थान केले. चांगभले बोलत तासाभराच्या अवधीतच नंदीसह यात्रेकरूंचे डोंगरावर आगमन झाले. मंदिर परिसरात भेट देऊन रतन नंदीसह यात्रेकरू पुजाऱ्यांच्या घरी आश्रयस्त झाले. दिनांक 5 एप्रिलला पालखीवर गुलाल खोबरे उधळून भक्तानी यात्रेचा आनंद लुटला. सायंकाळी आठ वाजता ज्योतिबा डोंगरावरून रतन नंदिसह पुकळेवाडी ग्रामस्थ गावाकडे मार्गस्थ झाले. वारणा, कृष्णा, येरळा नदीचे पाणी पिऊन यात्रेकरू दिनांक ८ एप्रिल रोजी पुकळेवाडीत दाखल झाले. 9 एप्रिल रोजी विसावा तर दहा एप्रिल रोजी देव बोळवण्याचा कार्यक्रम पार पडला, यावेळी पोलीस दलात पदोन्नती मिळवलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री भास्कर पुकळे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सचिन पुकळे सर व सामाजिक कार्य केल्याबद्दल राहुल दादा पुकळे यांचा जाहीर नागरी सत्कार पार पडला. प्रदक्षिणा घालून तसेच गुलाल उधळत देव बोळवण्याचा कार्यक्रम पार पडला, त्यात गजनृत्यही पार पडले. जोतिबा यात्रेनिमित्त होत असलेल्या  पारायणचे दि. 11 एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता थाटामाटात पार पडली. जोतिबा यात्रेत गजनृत्य, धनगरी ओव्या, गीत आदी कार्यक्रम पार पडले.

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता : ११ एप्रिलचा दिवस

सकाळ सकाळी बाल गोपाळ जोतिबा मंदिराच्या आवारात जमले होते. बाल गोपाळ यांनी पताके हातात घेतले होते, बाहेर  गावावरून आलेले महाराज मंडळी अभंग म्हणत होते तर टाळकरी टाळ वाजवत होते. मृदुंगमणी पखवाजाचे ताण काढत होते. गावातील तरुण मुलं पालखीची सजावट करत होते. काल्याच्या कीर्तनाची दहीहंडी बांधण्यात काहीजण गुंतले होते. राम कृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम चे गोड स्वर उमटू लागले आणि पालखीतील गावकऱ्यांची भाऊ गर्दी वाढू लागली. विठू नामाचा गजर करत पालखी हळूहळू विष्णूबुवा यांच्या घराजवळ आली. वारकऱ्यांचा वैष्णवांचा डाव रंगला आणि गजी नृत्याची घाई पार पडली. दरम्यान पालखी सिद्धनाथ मंदिरात आली. गज नृत्याच्या घाईने वारकऱ्यांच्या तालासुरातील लयबद्ध फुगड्यांनी उपस्थिता नागरिकांचे लक्ष वेधले. ग्रामस्थ महिला मंडळी अगदी लहानथोर अवघे अवघे फुगड्या खेळण्यात दंग झाले होते आनंदाचा भर आला होता तर इकडे तरुण पोरांनी उपस्थित भक्तांना ताक, लशी देऊन उन्हाने कोरड पडलेल्या घशाला गारवा निर्माण केला.  फुगड्यांचा खेळ संपला रे वारकरी ज्योतीराम मंदिराकडे काल्याच्या कीर्तनासाठी एकत्र आले. वडगाव स्वामी जयराम स्वामी मठाधिपती ह भ प विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन पार पडले. वारकरी पंथामध्ये, क्षेत्रामध्ये लहान थोर स्त्री-पुरुष जात वर्गातील भेदभावास स्थान नसल्याचं विठ्ठल स्वामी महाराजांनी ठणकावून सांगितले. पशुपालक संस्कृतचा गौरोद्गार काढताना महाराज म्हणाले, पशुपालकांना जपले पाहिजे पुकळेवाडी गाव तसं संस्कृती जपणारे गाव आहे. विशेष  : महाप्रसाद भोजनासाठी दोन व्यक्तींचे हात राबले... १) महादेव बापू पुकळे.. २) नारायण बाबा पुकळे 




























































चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...