Thursday, December 29, 2022

‌ "समाज रत्न‌" : अक्कीसागर साहेब

 ‌"समाज रत्न‌" : अक्कीसागर साहेब 


जिवन जगत असताना अनेक सहवास मिळतं असतात, असाच एक सहवास जिवनात आला. ज्यांची मातृभूमी कर्नाटक, जन्मभुमी मध्यप्रदेश, कर्मभूमी महाराष्ट्र लाभली असून, आपलं समाज रूण परत फेड करण्यासाठी देशपातळीवर काम करण्याचा योग आला आणि सर्व राज्यांत कार्यकर्त्यांचा जथ्था निर्माण केलेले, फुले विचार धारेवर चालणारे, संघर्षमय जीवनातून वंचित, उपेक्षिताच्या न्याय हक्कासाठी पर्याय निर्माण करणारे,मनमिळाऊबुध्दिवान व्यक्तीमत्व असलेले असे ते स्नेही मित्र सिदप्पा अक्कीसागर होय.

जिवनात असेही योगायोग येतात ते इतिहास घडवून जातात, मी नौकरी करीत असताना मला मान्यवर कांशीरामजीच्या बहुजन चळवळीचा संबंध आला. त्या निमित्ताने मी त्यांच्या बहुजन डे कार्यक्रमासाठी १५ मार्च १९९४ला मुंबई येथे गेलो होतो. तेथे यशवंत सेनेचे सरसेनापती महादेवजी जानकर साहेब यांचा संबंध आला. त्यामुळे पुढे याच चळवळीत काम करणारे सिध्दपा अक्कीसागर यांचा जवळून संबंध आला आणि एकत्रच काम करण्याचा योग आला.

सिदप्पा अक्कीसागर यांचे वडिल लक्ष्मणराव याचं मुळ गाव चंदरगी तालुका रामदुर्ग,जिल्हा बेळगाव असुन त्यांची फौजी खात्यांत नौकरी असल्यामुळे मध्यप्रदेशात जबलपुर येथे राहाण्याचा योगायोग आला होता. येथेच सिदप्पा अक्कीसागर यांचा जन्म झाला. पुढे लक्ष्मणराव अक्कीसागर यांची महाराष्ट्रात पुणे येथे बदली झाली. त्यामुळे सिदप्पाचे शिक्षण पुणे येथेच झाले. सिदप्पाचे पदवी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मुंबई येथे रिझर्वबॅकेंत नौकरीला लागले.पुढे त्यांना कांशीरामजीच्या बहुजन चळवळीचा सहवास लाभला आणि बहुजन चळवळीमुळे समाज रूण परत फेड करण्याची जाणीव झाली, त्यामुळे त्यांना समाज कार्य करण्याची ओढ लागली आणि समाज कार्याला सुरुवात केले. त्यानी जेथे नौकरी करत होते त्या रिझर्व्ह बँकेत अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती साठी स्वंतत्र कार्यालय देण्यात आले होते, परंतू इतर मागासवर्गीयांसाठी कार्यालय नव्ह्ते. हि सामाजिक जाणीव सिदप्पा यांना झाल्यामुळे त्यांनी बॅकेतील इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची एक बैठक घेवून ओबीसी कर्मचारी महासंघाची निर्मिती केली आणि स्वतः संस्थापक अध्यक्ष बनले व अधिकार्याशी संघर्ष करून बॅकेच्याच ईमारतीत इतर मागासवर्गीय कर्मचारी संघटनेला कार्यालय मिळवून घेतले. येथूनच सिदप्पा हे देश पातळीवर सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी देश पातळीवर संघटनेचे जाळे पसरविले. ओबीसींवर होणार्या अन्याया विरूध्द न्यायाचा संघर्ष सुरू झाला यातूनच एक अभ्यासक बनले.

 या चळवळीमुळे सिदप्पाना इतिहास वाचण्याचा, इतिहास घडविण्याच्या मुलं मंत्र ‌मिळाला.

त्यांना वाटू लागले आपली संस्कृती हि पशुपालक संस्कृती‌ असुन आपण इतिहासातील नाग संस्कृती, द्रविड संस्कृती, मौर्य संस्कृती चे वारसदार आहोत म्हणजेच आपण समता संस्कृतीचे आहोत. समता संस्कृतीत बंधूभाव असुन समाज शांती सुखाने नांदत असतो. जर या लोकशाहित विषमता नष्ट करून समता संस्कृंती आणायची असेल तर सत्ता असणे आवश्यक आहे. जर सत्ता पाहिजे असेल तर पक्ष आणि नेता लागतो म्हणून ते नेता धुंडत होते. सन १९९४ ला जानेवारी महिन्यात म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानदान महिन्यात यशवंत सेनेचे सरसेनापती त्यागमुर्ती महादेवजी जानकर साहेबांचा संबंध आला आणि त्यांना पाहिजे तो नेता मिळाला. 

ज्या बॅकेतून शिवसेना निर्माण झाली त्या बॅंकेतूनच यशवंत सेना वाढण्यास प्रोत्साहन मिळत गेले.त्यांनी नेते महादेवजी जानकर साहेबांना संघटना वाढीसाठी लागणारे प्रचार माध्यम म्हणून मासिक काढण्याची संकल्पना दिली.समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून यशवंत सेनेच्या माध्यमातून " विश्वाचा यशवंत नायक " नावाचे मासिक सुरू केले व कार्यकारी संपादक म्हणून अंक काढण्याची जबाबदारी स्वतः घेतली.

या माध्यमातून नौकरी करत असताना कर्मचार्यांचे प्रश्न सोडवित असतं त्याचं बरोबर संघटना चालवण्यासाठी " विश्वाचा यशवंत नायक " मासिक चालवून यशवंतसेनचे कार्य सुरू केलें. 

आता सम्राट अशोकाचे स्वप्न पूर्ण करणारा नेता आपणाला मिळाला, त्यासाठीं सत्ता लागते, सत्तेत जाण्यासाठी पक्ष लागतो म्हणून ३१मे २००३ ला महाराणी अहिल्याबाई च्या जन्मभुमित यशवंत सेनेचे रूपांतर पक्षात करण्यास बौध्दिक सहकार्य केले. राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांनी सहकार्यांना सोबत घेवून " राष्ट्रिय समाज पक्षाची " स्थापना केली .

 त्यावेळी सिदप्पानी प्रत्यक्ष नौकरी करीत " विश्वाचा यशवंत नायक" मासिकातून सामाजिक कार्य सुरू ठेवले आणि सन १९९७ ला सेवा निवृत्त झाले. सेवानिवृत झाल्यानंतर राष्ट्रिय समाज पक्षाच्या कार्यात सक्रिय झाले. त्यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे पक्ष बांधणिस वेळ अपुरा पडत होता म्हणून जानकर साहेबांनी पक्षाची धुरा विश्वासु कार्यकर्ता सिदप्पा अक्कीसागर यांच्यावर सोपविण्याचे ठरविले आणि राष्ट्रिय अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती केली.  

पक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर सिदप्पा अक्कीसागर यांनी पक्षाचे जाळे चार राज्यातून अठरा राज्यांत नेण्याचे काम केलें. पुढे राष्ट्रिय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देवून, राष्ट्रिय अध्यक्ष पद राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांकडे सोपविले. यावर न थांबता सिदप्पा अक्कीसागर यांनी कर्मचारी, बुद्धिजीवी वर्ग बांधण्यासाठी राष्ट्रिय समाज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पद स्विकारून कामाला लागले आहेत. त्यांचा एकच ध्यास असतो राष्ट्राला पोशणारा, राष्ट्रांवर प्रेम करणारा हाच खरा राष्ट्रिय समाज असून या लोकशाहीत राष्ट्रिय समाजातील वंचीत, उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे, त्या साठीच प्रत्येक बुद्धिजीवी वर्गानी समाज रूण परत फेड केलं पाहिजे तरच खरा‌ राष्ट्रिय समाज निर्माण होईल आणि समतेची राज्य येवून राष्ट्र बलवान बनेल. 

हे काम आपण सर्वांनी पुढे नेण्यास तन,मन,धनाने सहकार्य करणे हेच सिदप्पा अक्कीसागर यांना खर्या अर्थाने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठरतील,आणि असे समाज रत्न समाजात निर्माण होतील. त्याचसाठी आमचे मार्गदर्शक मा.सिदप्पा लक्ष्मण अक्कीसागर साहेबाना दिर्घायुष्य लाभो‌ . हिच प्रार्थना.


--- गोविंदराम शूरनर

विश्वाचा यशवंत नायक डिसेंबर 2022

 विश्वाचा यशवंत नायक : डिसेंबर २०२२

*यशवंत नायक – डिसेंबर 2022*

*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*


पान १

_*धैर्य असून मत व्यक्त करू शकत नाही (क्षमता नाही म्हणून) तो मूर्ख आहे : डॉ. आंबेडकर*_

पान -२

_*क्षमता असून मत व्यक्त करण्याचे ध्येय दाखवत नाही (घाबरतो म्हणून) तो गुलाम आहे : डॉ. आंबेडकर*_

पान -३

_*क्षमता आणि धैर्य असूनही मत व्यक्त करत नाही(जाणीवपूर्वक मौन राहतो) तो कडवा/हटवादी संकुचित आहे : डॉ. आंबेडकर*_


*मुख्य बातम्या – पान 1* 

@ सुरत : यशवंत नायक ब्यूरो

भाजप काँग्रेसची सिस्टीम एकच; त्यांची सिस्टम संपण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर


@ मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

महादेव जानकर यांचा साधेपणा दुर्गम भागातील नागरिकांना भावला


> महादेव जानकर यांची रायगड जिल्ह्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांवर पायपीट


पान : २

@ इंदौर : (मध्य प्रदेश)यशवंत नायक ब्यूरो 

महादेव जानकर यांचा मध्य प्रदेश राज्य दौरा

> उज्जैन येथे बाबा महालकाल चरणी अभिषेक

> इंदौर च्या सुप्रसिद्ध गणेश मंदिरात घेतले दर्शन


@ परळी वैजनाथ : गुजरात यशवंत नायक ब्यूरो

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना रासप तर्फे अभिवादन


@ शाहजांहपुर: उत्तर प्रदेश यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार : प्रदीप सिंह तोमर

> रासपचे मो. सईद खा महापौर पदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात 


@ बीड : यशवंत नायक ब्यूरो

मांजरसुभा जि- बीड येथे महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत


पान : ३

@ बेळगांव :यशवंत नायक ब्यूरो 

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

> चिंचणी मायाक्का देवीचे दर्शन करून रामदुर्ग तालुक्यातील एम चंदरगी येथे महादेव जानकर यांचा मुक्काम


@ सातारा : यशवंत नायक ब्यूरी

संत बाळूमामा पालखीचे पळसावडे येथे महादेव जानकर यांनी घेतले दर्शन


@ नंदगड : यशवंत नायक ब्यरो 

क्रांतिकारी भूमीत पिताश्री जगन्नाथ जानकर यांना १० वा स्मृतिदिन निमित्त अभिवादन


@ शाहजांहपुर : यशवंत नायक ब्यूरो

उत्तर प्रदेशात शहिदांच्या स्मारकास रासप पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन..!


@ बेळगांव /कर्नाटक : यशवंत नायक ब्यूरो

एस एल अक्कीसागर यांना मातृशोक

गंगुबाई अक्कीसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


पान : ४

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे क्रांतिवीर संगोळी रायण्णा १५ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन

> राष्ट्र राष्ट्रीय कार्यकारणी व विविध राज्य पदाधिकारी राहणार उपस्थित


*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*

*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*

*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक






Sunday, December 25, 2022

एस.एल.अक्कीसागर यांना मातृशोक..

एस.एल.अक्कीसागर यांना मातृशोक..


गंगूबाई अक्कीसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

बेळगाव (कर्नाटक) : वृत्तसंस्था 

राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर यांचे वृद्धापकाळाने मौजे चंदरगी जिल्हा बेळगाव येथे राहत्या घरी निधन झाले. 


गेल्या वर्षभरापासून गंगुबाई अक्कीसागर या वृद्धापकाळाने घरीच होत्या. नुकतीच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कर्नाटक दौऱ्यावेळी चंदरगी या गावी मुक्काम करून गंगुबाई अक्कीसागर यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. गंगुबाई अक्कीसागर या निरक्षर होत्या,  परंतु त्यांनी सुपुत्र एस.एल अक्कीसागर यांना वयाच्या २२ व्या वर्षी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर म्हणून धाडले होते. आईच्या वृद्धापकाळामुळे एस एल अक्कीसागर गावीच राहत होते. गंगुबाई अक्कीसागर यांच्या पश्चात सात लेकी व एक मुलगा, सून, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

गंगूबाई अक्कीसागर को भावभीनी  श्रद्धांजलि..!

 समाचार एजेंसी बेलगाम (कर्नाटक): 

राष्ट्रीय समाज पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एवं राष्ट्रीय समाज एम्प्लॉय फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष एसएल अक्कीसागर की माता श्री गंगूमाई लक्ष्मण अक्कीसागर का वृद्धावस्था के कारण मौजे चंदरगी जिला बेलगाम कर्नाटक स्थित आवास पर दुखद निधन हो गया। कै. गंगूमाई अक्कीसागर पिछले साल से वृद्धावस्था के कारण घर पर ही रह रही थीं।  हाल ही में राष्ट्रीय समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक दौरे के दौरान चंदरगी गांव में रुके और गंगूमाई अक्कीसागर के स्वास्थ्य की जानकारी ली.  गंगूमाई अक्कीसागर अनपढ़ थीं, लेकिन 22 साल की उम्र में अपने बेटे एसएल अक्कीसागर को भारतीय रिजर्व बैंक के महाप्रबंधक के रूप में सफलता मिली।  मां की वृद्धावस्था के कारण एसएल अक्कीसागर गांव में रहने लगा थे।

Wednesday, December 21, 2022

गुरुजींची एक्झीट वेदनादायी; समाजातील लोक हळहळले..!

गुरुजींची एक्झीट वेदनादायी; समाजातील लोक हळहळले..!

ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले, शाळेच्या दप्तरी नाव आणि जन्म तारीख देऊन शाळेचा प्रवेश घडवून दिला, तसेच स्वतःच्या दुचाकीवरून घर ते शाळा असा रोजचा प्रवास करून ज्यांनी मला लहान वयात शाळेची गोडी निर्माण केली, असे माझे आवडते आणि प्रथम गुरुवर्य श्री. बाबा गुरुजी यांना एका बदमाश माणसामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले. त्यांचे मुळगाव खरात वस्ती, गटेवाडी पो - पिंपरी ता- माण जि- सातारा. गटेवाडी सारख्या छोट्याश्या गावात पहिले शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जायचे. गावकऱ्यांशी ते फार आदराने राहायचे. सगळ्याशी मिळून मिसळून राहायचे, त्यामुळे त्यांच्या बद्दल गावकऱ्यांना आपुलकी वाटायची. गुरुजी यांच्यावर वेदनादायी प्रसंग ओढवला हे ऐकून कुकुडवाड, नरवणे, वडजल, नरबटवाडी, ढाकणी, कारंडेवाडी, पुकळेवाडी, दोरगेवाडी आदी परिसरात शोककळा पसरून संपूर्ण समाजमन हेलावले. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

खरात गुरुजी यांचे मित्र व स्नेही प्रा. आनंद पुकळे सर यांनी बाबा गुरुजी यांच्याबद्दल आठवणी सांगताना ते म्हणाले, खरात गुरुजी हे अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्याकाळात ओळखले जायचे. त्यांच्या घरची परस्थिती ही अत्यंत गरिबीची होती. गटेवाडी ते कुकुडवाड हे अंतर अनवाणी पायांनी चालत येऊन त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांची लहानपणी खूप आबळ झाली. त्यांचे हस्ताक्षर हे अत्यंत सुरेख आणि सुंदर होते. गणित विषयात ते तरबेज होते. त्यांचा स्वभाव हा मनमिळावू होता, त्यांची Exit इतक्या कमी कालावधीत झाली, या वृत्ताने प्रा. पुकळे सर हे शोकमग्न झाले. मानवता प्रिय गुरुजी अकाली गेले, त्यांच्या कुटुंब परिवारास, आम्हा विद्यार्थ्यांस तीव्र दुःख झाले. गुरुजी यांच्या स्मृतीस विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली..!💐

शोकाकुल - आबासो सुखदेव पुकळे. 

Thursday, December 15, 2022

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

चिंचणी मायाक्का दर्शन करून रामदूर्ग तालुक्यात महादेव जानकर यांचा मुक्काम

बेळगाव : यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. श्री. जानकर यांनी काल (दि.१४) रायबाग तालुक्यातील कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्का देवीचे दर्शन घेतले. रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल अक्कीसागर यांच्या मातोश्रींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी श्री. जानकर रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी(एम) या गावी पोहचले. तसेच त्यांनी चंदरगी या गावी मुक्कामही केला, असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

श्री. अक्कीसागर यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर या फार दिवसापासून वृद्धापकाळाने आजारी आहेत. एस एल अक्कीसागर यांचे राष्ट्रीय समाज पक्ष संघटन बांधणी व पक्ष नावारूपाला आणण्यात खूप मोठे योगदान राहिले आहे. श्री. 

अक्कीसागर साहेब यांच्या मातोश्रींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी श्री. जानकर कर्नाटक दौऱ्यावर आलेले आहेत. ते आज चंदरगीहून बेळगावमध्ये उपस्थित राहतील व महत्वाच्या गाठीभेटी घेऊन, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे समाधी'स्थळाचे दर्शन घेन्यासाठी नदंगड ता - खानापूरच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दौऱ्यात ते कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांशी ते भेट घेणार आहेत. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक राज्यात रासपचे संघटन वाढविण्याचे दृष्टीने श्री. जानकर सध्या प्रयत्नशील आहेत, कारण त्यांचा अलीकडच्या काळात दक्षिण भारतातील लोकांसारखा पेहराव समाज माध्यमात झळकत आहे. कर्नाटक राज्य हे श्री. जानकर यांच्यादृष्टीने आवडते राज्य असल्याचे बोलले जाते.

Wednesday, December 7, 2022

लंपी आजाराने 'सोन्या छब्याचा' घेतला बळी; शेतकरी कुटंबावर शोककळा

लंपी आजाराने 'सोन्या छब्याचा' घेतला बळी; शेतकरी कुटंबावर शोककळा 

सोन्या छब्याचा बेंदुर सणाचा संग्रहित फोटो

कुकुडवाड : प्रतिनिधी

माण तालुक्याच्या दक्षिण भागात लंपी या चर्मरोगाने धुमाकूळ घातला असून, पुकळेवाडी येथील नामांकित बैल जोडी 'सोन्या आणि छब्या' यांचा लंपी आजाराने बळी गेल्यामुळे, कुकुडवाड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. लंपी आजाराने बैल जोडीचा मृत्यू झाल्याने, शेतकरी कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोन्या छब्याच्या जाण्याने गावात शोककळा पसरून, शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत. छब्या बैल विना दाव तीन किलोमीटर अंतरावरून, अगदी रसत्याच्याकडेने एक बाजू धरून थेट चालत येऊन थेट दावणीवर थांबायचा.

मिळालेली माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून पुकळेवाडी येथील पशुपालक गोचीडच्या साथीने हैराण असून, त्याकडे पशुसंवर्धन विभागाने डोळेझाक केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी लंपीचा पादुर्भव होऊ नये, म्हणून लसीकरण केले गेले, परंतु लसीकरण करताना गोचिडग्रस्त जनावरांचा इतर जनावरांशी संपर्क झाल्याने, लंपीची साथ झपाट्याने पसरून अनेक जनावरांना घेरल्याचे बोलले जात आहे. लस दिल्यानंतर जनावरे अस्वस्थ झाली, त्यामुळे लसीकरण तर चुकीचे झाले नाही ना? अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

आयुष्यभर भटकंती करत मेंढपाळीचा व्यवसाय केल्यानंतर स्वर्गीय वस्ताद पुकळे यांनी मोठ्या हिंमतीने 'सोन्या व छब्या'चा सांभाळ केला. वडिलांची आठवण म्हणून त्यांच्या पश्चात त्यांची मुले उत्तम पुकळे, प्रकाश पुकळे, संजय पुकळे या बंधूनी सोन्या व छब्याला लहान मुलाप्रमाणे जीवापाड जपले. गावगाड्यात सोन्या आणि छब्याची जोडी उठून दिसायची. मशागतीची कामे करताना बैलजोडी शेतशिवारात फुलून दिसायची, बघताक्षणी समाधान व्हायचे. सोन्या व छब्यास लंपीची लागण होऊन, त्यांचा मृत्यू झाला. डॉ. शेंडगे यांनी बैलजोडी वाचवण्यासाठी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते असफल ठरले, अशी माहिती प्रकाश व उत्तम या बंधूनी दिली.

उत्तम पुकळे यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे ही बैलजोडी आमच्या घरी होती. माघी पौर्णिमेस होणाऱ्या सिद्धनाथ देवाच्या बगाडाचा मान सोन्या व छब्यास होता. घरातील लहान थोरांचे व गावकऱ्यांचे देखील या बैलजोडीवर विशेष प्रेम होते. सोन्या व छब्याच्या जाण्याने घरातील सर्वजण धायमोकलून रडत आहेत. लंपी आजाराने आमच्या दावणीची जनावरे नव्हे तर माणसं गेल्या इतकं प्रचंड दुःख आहे. छब्या बैलासारखा गुणवान आणि मानवता प्रिय बैल आमच्या कुटुंबाचा रोजच्या जीवनाचा एक भाग बनला होता. तर काही दिवसांपूर्वी वाई येथील बगाडासाठी सोन्या व छब्याला मागणी आली होती.

शेतकरी उत्तम पुकळे यांच्याशी बोलताना सोन्या आणि छब्यासोबत २०२२ च्या बेंदूर सणातील आठवणीने राष्ट्र भारतीचे संपादक प्रा. आबासो पुकळे भावूक झाले. 'सोन्या आणि छब्या' ही बैल जोडी महाराष्ट्रसह देशात प्रसिद्ध झाली होती, अशी प्रतिक्रिया प्रा. पुकळे यांनी दिली. कुकुडवाड येथील पप्पू काटकर यांनी सांगितले की, सोन्या आणि छब्यासाठी लाखो रुपयांची बोली व्हायची, परंतु उत्तम पुकळे यांनी पै गावातील गोरगरीब लोकांची मशागतीची कामे करून दिली. अडल्या नडल्या लोकांना सोन्या आणि छब्याची जोडी शेवटचा पर्याय ठरायची.  


क्लिक करा पाहण्यासाठी>३ जुलै २००२२ बेंदूर सण सोन्या छब्याची आठवण 

क्लिक करा पाहण्यासाठी> शेतात मशागतीची कामे करताना आठवणीतले सोन्या आणि छब्या

क्लिक करा पाहण्यासाठी श्री. सिद्धनाथ देवाचा माघी पौर्णिमेस बगाड ओढताना सोन्या आणि छब्या

'राष्ट्र भरती'च्या वाचकांसाठी 'छब्या बैलाची कथा' ही ग्रामीण कथा लवकरच प्रसिद्ध करू

Friday, December 2, 2022

भाजप काँग्रेसची सिस्टम एकच; त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर

भाजप काँग्रेसची सिस्टम एकच; त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर

सुरत : यशवंत नायक ब्यूरो 

काँग्रेस व भाजप दोन्ही पार्टी एकच सिस्टीम राबवत आहे, मात्र त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र यांनी सुरत येथे बोलताना केले आहे. चौर्यासी विधानसभा मतदार क्षेत्रातील उमेदवार मोतीभाई रबारी यांच्या प्रचारार्थ स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना वरील विधान केले आहे. दरम्यान श्री. महादेव जानकर यांनी लिंबायत विधानसभा व चौर्यासी विधानसभा मतदार क्षेत्रात 'रोड शो'द्वारे जनतेशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना श्री. जानकर पुढे म्हणाले, बेरोजगार आरोग्य व शिक्षण यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष काम करेल. अमेरिकेतील लोकांना नोबेल पारितोषिक जास्त मिळत आहेत, भारताला मात्र नोबेल मिळत नाहीत, त्यामुळे शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कोणताही आजार असू द्या, वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत दिली पाहिजे. आरोग्य, शिक्षण मोफत दिले आणि बेरोजगारीवर मात केली तर देश महासत्ताक बनेल.

निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन होईल, असे गुजरात मधील लोकांना वाटते.  कधी भाजप, कधी काँग्रेस ला सत्ता दिलीत, रासप, आपला ही संधी मिळाली पाहिजे. छोट्या पक्षांना देखील सत्ता मिळाली पाहिजे. मोठे पक्ष जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय करतात.  रासप गरीब लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे. ज्यांना कोण तिकीट देत नाही, त्यांना राष्ट्रीय समाज पक्ष मुख्य राजकीय प्रवाहात आणत आहे. काँग्रेस व भाजप दोन्ही पार्टी एकच सिस्टीम राबवत आहेत, मात्र त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे.  सुरत वासियांना आवाहन करेन की, भाजपला सत्ता दिलीत, एकवेळ रासपला सत्ता द्या. गुजरातची भूमि ही दुधाची भूमी आहे. भाजपपेक्षा चांगले काम करू असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, गुजरात प्रभारी सुशील शर्मा, गुजरात युवा अध्यक्ष महेंद्र राठोड,  सुरत जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.


कापरडा, पारडी, वलसाड, लिंबायत, चोर्यासी, दभोई, वडोदरा शहर, अकोटा, रावपुरा, मांजलपूर आदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना गुजरातवासिय जनतेने विजयी करण्याचे आवाहन श्री. जानकर यांनी केले.



चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...