माण - खटाव तालुक्याच्या सीमा निश्चित करणारी श्री. शंभू महादेवाच्या डोंगर रांगातील 'बाज्या बैज्या (बाजीराव - बयाजी)ची ऐतिहासिक खिंड'
जिथे ब्रिटिशांची बंदूक चालत नव्हती, तिथे 'बाज्या बैज्या'च्या गोफनीने ब्रिटिशांचे शीर नव्हे केवळ डोईवरची टोपी टिपली जायची. साहित्याच्या क्षेत्रात 'उपेक्षित ठरलेल्या' रामोशी समाजातील क्रांतिकारक बाज्या बैज्याची पराक्रमी कहाणी ज्यांनी 'माणदेशी बंड' कादंबरीद्वारे लिहली असे माझे स्नेही, थोर साहित्यक श्री. रघुराज मेटकरी सर यांची विटा ता- खानापूर जि- सांगली येथे भेट झाली. ' ज्यांच्या मनात 'अन्यायाविरुद्ध चीड' निर्माण होते, अशा सर्वांनी माणदेशी बंड आवर्जून वाचावे.
No comments:
Post a Comment