एक स्पॉटबॉय म्हणून चित्रपट सृष्टीची दार ठोठावणारे आणि आज यशस्वी निर्माता/लेखक/गीतकार/संवाद/दिग्दर्शक/अभिनेतापर्यंत मजल मारणारे मातृपितृ फिल्म्सद्वारे “बोला अलखनिरंजन “चल रं फौजी अश्या अनेक कलाकृतीचे निर्मिती करणारे श्री घनश्याम येडे यांनी शून्यातून एक छोटे विश्व निर्माण केलं आहे, अशा प्रकारचे उदगार रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर एस एल अक्कीसागर यांनी काढले.
घनश्याम येडे यांना 'दंडनायक संत कणकदास' पुस्तक भेट देताना एस एल अक्कीसागर, बाजूस सतीश नाझकर |
श्री घनश्याम येडे यांनी काल दिनांक ३० मार्च २०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय समाज एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच लेखक, कवी, पत्रकार, संपादक श्री एस एल अक्कीसागर यांच्या नवी मुंबई येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या समवेत रासेफ महाराष्ट्र अध्यक्ष श्री सतीश नाझरकर सर होते. श्री अक्कीसागर यांनी श्री घनश्याम येडे यांचा सत्यशोधक - दंडनायक संत कणकदास ही पुस्तिका देऊन सन्मान केला.
No comments:
Post a Comment