Tuesday, March 29, 2022

जेव्हा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांच्या मूळगावी धनगरी लोकनृत्य करतात

जेव्हा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हैसूरमधील त्यांच्या गावात धनगरी लोकनृत्य करतात

आबासो पुकळे/मुंबई

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा म्हैसूरमधील सिद्धरामना हुंडी या त्यांच्या मूळ गावी लोकनृत्य करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात व्हायरल केला जात आहे.

म्हैसूरमधील सिद्धरामना हुंडी या त्यांच्या मूळ गावात लोकनृत्य सादर करताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या.

हा व्हिडिओ गुरुवारी, दीनांक २४ मार्च रोजी रात्री शूट करण्यात आला, जेव्हा सिद्धरामय्या वार्षिक 'जत्रेसाठी'  त्यांच्या गावी गेले होते. व्हिडिओमध्ये ते आणि इतर सहकारी जत्रेत गाताना देखील दिसत आहेत, सुरक्षेचा लवाजमा बाजूला ठेवून, पायांच्या लयबद्ध हालचालीने हात हवेत फिरवत, ७३ वर्षीय सिद्धरामय्या यांनी मंदिरातील देवता सिद्धरामेश्वराची स्तुती करताना नृत्य पथकाचे नेतृत्व केले.  त्यांच्या नृत्यसमूहाभोवती प्रचंड गर्दी जमलेली दिसत आहे.

कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात सिद्धरामय्या यांनी, त्यांच्या वारशाबद्दल अभिमानाने सांगितले, त्यांचे नाव आणि त्यांची मुळे यांचा संबंध जोडून ते म्हणाले, “माझ्या गावातील तीन दिवसांच्या जत्रेला सिद्धरामेश्वर उत्सव म्हणतात, माझ्या वडिलांचे नाव सिद्धरामेगौडा आहे आणि माझे कुलदैवत सिद्धरामेश्वर आहे. .”

सिद्धरामय्या भूतकाळातील त्यांच्या मुळवारसाबद्दल बोलताना म्हणाले की, ते लोक कलाकार होते आणि ते 'जनपद कुनीथा' लोकनृत्य सादर करणार्‍या नृत्य मंडळाचा भाग होते. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना असेही सांगितले की, त्यांचे पालक कधीच शाळेत गेले नव्हते, ते एक मेंढपाळ होते आणि त्याच्या वडिलांनी त्याना वीरा मक्काला कुनिथा या गावी सिद्धरामना हुंडी या लोकनृत्य गटात दाखल केले होते.


सिद्धरामय्या यांनी त्यांच्या एका मुलाखतींमध्ये देखील याचा उल्लेख केला होता की, त्यांच्या पालकांनी त्यांना औपचारिक शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले नाही आणि त्याऐवजी त्यांनी कला शिकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती. तथापि, त्यांनी विधानसभेत सांगितले की, हे त्यांच्या नृत्य शिक्षकांपैकी एक होते ज्यांनी त्यांना कन्नडमध्ये लिहायला आणि वाचायला शिकवले.

त्यांना पाठी पेन्सिल ऐवजी वाळूवर कन्नड लिपी शिकवण्यात आली. “दोन वर्षांत, त्यांनी मला वर्णमाला, व्याकरण आणि बरेच काही शिकवले. ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही,'' असे सिद्धरामय्या यांनी एका न्यूज वेबसाइटला सांगितले.

व्हिडीओत सिद्धरामय्या यांच्या बाजूस दिसणारे वयोवृध्द व्यक्ती ही, सिद्धरामय्या यांचे बालपणीचे मित्र आहेत, असे भारतीय सामाजिक लोकसंस्कृतीचे अभ्यासक सुदर्शन अक्कीसागर यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...