दिनांक २६/०३/२०२२ रोजी "धनगर मराठेशाही होलकर राजवंश" लेखक माननीय मधुसूदन राव होलकर जी की ऐतिहासिक पुस्तक का विमोचन करते हुये (समक्ष दर्जनों मीडिया पत्रकार) - माननीय प्रेमपाल धनगर (राष्ट्रीय अध्यक्ष- आल इंडिया धनगर समाज महासंघ), श्री निरंजन धनगर(वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष), श्री बेनी प्रसाद धनगर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), धनगर अजयपालसिंह होलकर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), श्री निहाल सिंह धनगर (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), श्री महादेव धनगर(मध्यप्रदेश अध्यक्ष),बहन रानी लक्ष्मी धनगर (अध्यक्ष छत्तीसगढ़), श्री अनिल धनगर(महासचिव मध्यप्रदेश), बहन मनीषा पाल धनगर(अध्यक्ष महिला विंग, मध्यप्रदेश - स्थान इंडियन कोफी हाऊस, जबलपुर मध्यप्रदेश !
Thursday, March 31, 2022
आरक्षण घेत आहे शेवटचा श्वास
आरक्षण घेत आहे शेवटचा श्वास ..!
श्री.अनिल वैद्य
(माजी न्यायाधीश)
रेल्वेचे खाजगीकरण करण्यासाठी 151 रेलगाड्या 35 वर्षासाठी खाजगी कपन्यांना चालविण्यासाठी देणार असल्याचे कालच्या मटा मध्ये वाचून व्यथित झालो म्हणून हा लेख लिहत आहे. *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी* sc,st,obc ना सरकारी नोकरीत जाण्याचा उपदेश का केला ?
हे या आधीच्या लेखात मी लिहले आहे. थोडक्यात सरकारी नोकरीत केवळ पोटा-पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी उपदेश केला नाही तर समाजाची उर्जितावस्था, प्रतिमा व प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेला तो उपदेश होता.
X c c cc *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* म्हणाले की, "ब्राम्हणाचे महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकरीत आहेत."वस्तुस्थिती अशी आहे की तो समाज मोगल,ब्रिटीश काळापासून सरकारी नोकरीत आहे. तो काही श्रीमंत समाज नव्हता व आताही नाही पण सरकारी नोकरीत असल्याने,वरिष्ठ पदे त्यांच्याकडे असल्याने त्यांचा दबदबा आहे.
ही बाब लक्षात घेऊनच *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी* नोकरीत जाण्याचा सैद्धांतिक उपदेश केला.तो सामाजिक मागासलेपणा वर एक उपचार आहे.सामाजिक इमेज निर्माण करण्यासाठी उपाय आहे.त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा दरवाजा निर्माण करुन दिला.
थोडी फार प्रगती होत असतांना संरक्षणाचा गळा घोटण्याचे सुरू झाले.
1972 पासून आरक्षण विरोधात काही संघटना काम करीत आहेत तर काहींचा छुपा विरोध आहे.परन्तु संविधानिक तरतूद इतकी मजबूत आहे की कुणाच्या विरोधाने आरक्षण बंद होवू शकत नाही,मग यांनी नविन चाल खेळणे सुरु केले,
न्यायालयात आरक्षण प्रकरण न्यायचे व तेथुन आदेश मिळवायचे, नुकताच आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असा निर्णय न्यायालयाने दिला, आणि दुसरा महत्वाचावार संस्थांचे खाजगीकरण करून करण्यात येत आहे. खाजगीकरण केले की, आरक्षण आपोआपच नष्ट होणार हे त्यांना पक्के ठाऊक आहे.
एअर इंडिया,ऑइल कम्पन्या यांचे खाजगीकरण करण्याचा बेत पूर्ण झाला आहे. ONGC ही गलेलठ्ठ पगार असलेली कम्पनी, सिंध व पंजाब बँक, महाराष्ट्र बँक,व इतर काही बँकेच्या खाजगीकरनाचा बेत आहे.
PUC म्हणजे सरकारी उपक्रम असलेल्या कंपनी जसे की भारत हेवी इलेक्ट्रॉनिकलस सारख्या देशातील ट्रान्फॉर्मेर निर्माण करणाऱ्या कम्पनी. यांचे खाजगीकरण करण्याचा बेत आहे. महाराष्ट्रात MSEB सारख्या कम्पनी उत्तम काम करीत आहे तरीपण विद्युत कँपन्यांचे खाजगीकरण करण्याचे केंद्र सरकारच्या मनात आहे,1991 पासून सरकारी उपक्रमाचे खाजगीकरण करणे सुरू आहे. एव्हढेच काय तर निर्गुंतवणूक मंत्रालय निर्माण करून सरकारी उपक्रम खाजगी लोकांना विकणे सुरु केले आहे.भारतीय जीवन विमा कम्पनीचे खाजगीकरण करण्याची योजना होती ती त्या विमा कर्मचारी व विमा
प्रतिनिधीनी विरोध केल्याने तूर्तास थांबले आहे.तथापि खाजगी विमा कम्पनीला प्रोत्साहन देऊन सरकारी विमा कम्पनीचे लचके तोडले आहे. टेलीफोन कम्पनी भारत दूरसंचार निगम व एम टी एन एल कडे दुर्लक्ष केले व मोडकळीस आणले, त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावली. खाजगी टेलिफोन व मोबाईल कँपन्यांना परवाने दिले.अशा रीतीने खाजगीकरणं जोरात सुरू आहे त्यामुळे आरक्षण शेवटच्या घटका मोजत आहे.
*घटना समितीला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेंडूल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने एक मसुदा सादर* केला होता.त्यातिल 4 नम्बर च्या मुद्द्याला आर्थीक शोषणा विरुद्ध संरक्षण या मथळ्याखाली सरकारला सुचित केले होते की, सविधानात अशी तरतूद करावी की, मूलभूत व पायाभूत उद्योगधंदे सरकारी मालकीचे राहतील,विमा उद्योगावर राज्य सरकारचा हक्क राहील, प्रत्येक नागरिकाला सक्तीने विमा काढण्याचा सरकार प्रयत्न करेल. कृषी उद्योग सरकारच्या मालकीचा राहील इत्यादी...!
या मागणीनुसार संविधान समितीने संविधानात मूलभूत उद्योग व पायाभूत उद्योग अंतर्भूत केले असते तर सरकारला पायाभूत व मूलभूत उद्योगाचे खाजगीकरण करणे शक्य झाले नसते.या वरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी किती जबरदस्त होती याची कल्पना येते.त्यांना माहीत होते की ब्रिटिश गेल्यावर उद्या या देशावर राज्य करणारे स्वकीय ( हिंदुस्थानी?) लोक भांडवलदारी प्रवृत्तीचे असतील.
खाजगीकरण हे राष्ट्रवाद निर्माण करण्यात अडथळा आहे. आजही सरकारी उपक्रम कितीही असुविधाजनक असू द्या,त्या विषयी लोकांना आपुलकीची भावना असते. सरकारी दवाखान्यात सुविधा नसेल तरी जनतेला तो आपला दवाखाना वाटतो.सरकारी उद्योग व उपक्रम ही राष्ट्रीय संपत्ती आहे.आरक्षण नष्ट करण्याच्या नादात सरकारला कंगाल व्हायचे आहे.
खाजगीकरण करून आरक्षण नष्ट तर करण्यात येईल पण राष्ट्रीय मालकी समाप्त होते याची तरी सरकारला थोडी --- वाटली पाहिजे.
151 रेल्वे गाड्या मध्ये 35 वर्षासाठीं खाजगी कंपनी मनमुराद नफा तर कामावेल पण आरक्षण पूर्ण नष्ट होईल.
ज्यामुळे आरक्षणवादी समूहाचे अपरिमित नुकसान होईल जे कधीही भरून निघणार नाही. *आरक्षण द्यायला परत फुले, शाहू,-आंबेडकर पण होणार नाहीत.* त्यामुळे आरक्षण आता व्हेंटिलेटरवर आहे असे समजून याची तात्काळ दखल घेतली पाहिजे.
श्री.अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
घनश्याम येडे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं : एस एल अक्कीसागर
एक स्पॉटबॉय म्हणून चित्रपट सृष्टीची दार ठोठावणारे आणि आज यशस्वी निर्माता/लेखक/गीतकार/संवाद/दिग्दर्शक/अभिनेतापर्यंत मजल मारणारे मातृपितृ फिल्म्सद्वारे “बोला अलखनिरंजन “चल रं फौजी अश्या अनेक कलाकृतीचे निर्मिती करणारे श्री घनश्याम येडे यांनी शून्यातून एक छोटे विश्व निर्माण केलं आहे, अशा प्रकारचे उदगार रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर एस एल अक्कीसागर यांनी काढले.
घनश्याम येडे यांना 'दंडनायक संत कणकदास' पुस्तक भेट देताना एस एल अक्कीसागर, बाजूस सतीश नाझकर |
श्री घनश्याम येडे यांनी काल दिनांक ३० मार्च २०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय समाज एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच लेखक, कवी, पत्रकार, संपादक श्री एस एल अक्कीसागर यांच्या नवी मुंबई येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या समवेत रासेफ महाराष्ट्र अध्यक्ष श्री सतीश नाझरकर सर होते. श्री अक्कीसागर यांनी श्री घनश्याम येडे यांचा सत्यशोधक - दंडनायक संत कणकदास ही पुस्तिका देऊन सन्मान केला.
Tuesday, March 29, 2022
बाज्या बैजाची ऐतिहासिक नसर्गिक खिंड
जेव्हा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांच्या मूळगावी धनगरी लोकनृत्य करतात
जेव्हा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हैसूरमधील त्यांच्या गावात धनगरी लोकनृत्य करतात
आबासो पुकळे/मुंबई
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा म्हैसूरमधील सिद्धरामना हुंडी या त्यांच्या मूळ गावी लोकनृत्य करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात व्हायरल केला जात आहे.
म्हैसूरमधील सिद्धरामना हुंडी या त्यांच्या मूळ गावात लोकनृत्य सादर करताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या.
हा व्हिडिओ गुरुवारी, दीनांक २४ मार्च रोजी रात्री शूट करण्यात आला, जेव्हा सिद्धरामय्या वार्षिक 'जत्रेसाठी' त्यांच्या गावी गेले होते. व्हिडिओमध्ये ते आणि इतर सहकारी जत्रेत गाताना देखील दिसत आहेत, सुरक्षेचा लवाजमा बाजूला ठेवून, पायांच्या लयबद्ध हालचालीने हात हवेत फिरवत, ७३ वर्षीय सिद्धरामय्या यांनी मंदिरातील देवता सिद्धरामेश्वराची स्तुती करताना नृत्य पथकाचे नेतृत्व केले. त्यांच्या नृत्यसमूहाभोवती प्रचंड गर्दी जमलेली दिसत आहे.
कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात सिद्धरामय्या यांनी, त्यांच्या वारशाबद्दल अभिमानाने सांगितले, त्यांचे नाव आणि त्यांची मुळे यांचा संबंध जोडून ते म्हणाले, “माझ्या गावातील तीन दिवसांच्या जत्रेला सिद्धरामेश्वर उत्सव म्हणतात, माझ्या वडिलांचे नाव सिद्धरामेगौडा आहे आणि माझे कुलदैवत सिद्धरामेश्वर आहे. .”
सिद्धरामय्या भूतकाळातील त्यांच्या मुळवारसाबद्दल बोलताना म्हणाले की, ते लोक कलाकार होते आणि ते 'जनपद कुनीथा' लोकनृत्य सादर करणार्या नृत्य मंडळाचा भाग होते. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना असेही सांगितले की, त्यांचे पालक कधीच शाळेत गेले नव्हते, ते एक मेंढपाळ होते आणि त्याच्या वडिलांनी त्याना वीरा मक्काला कुनिथा या गावी सिद्धरामना हुंडी या लोकनृत्य गटात दाखल केले होते.
सिद्धरामय्या यांनी त्यांच्या एका मुलाखतींमध्ये देखील याचा उल्लेख केला होता की, त्यांच्या पालकांनी त्यांना औपचारिक शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले नाही आणि त्याऐवजी त्यांनी कला शिकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती. तथापि, त्यांनी विधानसभेत सांगितले की, हे त्यांच्या नृत्य शिक्षकांपैकी एक होते ज्यांनी त्यांना कन्नडमध्ये लिहायला आणि वाचायला शिकवले.
त्यांना पाठी पेन्सिल ऐवजी वाळूवर कन्नड लिपी शिकवण्यात आली. “दोन वर्षांत, त्यांनी मला वर्णमाला, व्याकरण आणि बरेच काही शिकवले. ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही,'' असे सिद्धरामय्या यांनी एका न्यूज वेबसाइटला सांगितले.
व्हिडीओत सिद्धरामय्या यांच्या बाजूस दिसणारे वयोवृध्द व्यक्ती ही, सिद्धरामय्या यांचे बालपणीचे मित्र आहेत, असे भारतीय सामाजिक लोकसंस्कृतीचे अभ्यासक सुदर्शन अक्कीसागर यांनी सांगितले.
Wednesday, March 16, 2022
१२ वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम
श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज वावंजे येथे २ मार्च २०२२ रोजी माजी विद्यार्थी यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी स्थानिक कुल कमिटीचे चेअरमन जी आर पाटील, प्राचार्य जे टी कांबळे, अब्दुलाही शेख, सरपंच डी बी म्हात्रे, विकास जोगले आदी उपस्थित होते. विद्यार्थीनी पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. विद्यार्थी प्रती अनेकांनी शुभेच्छ्या दिल्या.
श्री. छ. शिवाजी विद्यालयात सेवानिवृत्ती समारंभ
श्री. छ. शिवाजी विद्यालयात सेवानिवृत्ती समारंभ
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वावंजे या शाखेतून नाईक शिपाई या पदावरून श्री सुरेशमामा शेडगे तर इंग्रजी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ शुभांगी मंडलिक मॅडम या सेवानिवृत्त झाल्या. लिपिक सौ. रेश्मा ओवळेकर या सेवानिवृत्त झाल्या. विद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडला. यावेळी विद्यालयाचे चेअरमन श्री. जी. आर. पाटील, व्हायस चेअरमन अब्दुलाही शेख, प्राचार्य श्री. कांबळे जे. टी, पर्यवेक्षक श्री. कारंडे आर बी, सरपंच श्री. डी बी म्हात्रे, माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. सौ. मंडलिक मॅडम यांचे पती व भाऊ आणि त्यांची दोन मुले यावेळी उपस्थित होते. श्री. शेडगे मामा व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.
Sunday, March 13, 2022
धनगर समाजाला लागू होणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या 13 योजना
धनगर समाजाला लागू होणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या 13 योजना
1. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्त्वावर अर्थसहाय्य देणे
2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे
3. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे
4. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10 हजार घरकुले बांधून देणे
5. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना/कार्यक्रम राबवण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.
6. राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्त सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.
7. केंद्र सरकारच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.
8. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी चराई अनुदान देणे. (प्रायोगिक तत्त्वावर)
9. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक आणि युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.
10. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक आणि युवतींनी स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.
11. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक आणि युवतींना लष्करातील सैनिक भरती आणि राज्यातील पोलिस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.
12. ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेअंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय-मान्यता प्राप्त) प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या आणि संगोपनासाठी अर्थसहाय्य.
13. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती या महसुली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...
-
काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकरांचा सोलापूर मध्ये इशारा सोलापूर (११/१/२५) : मठाच्या आड कोणी आल्यास जश्यास तसे उत्तर देण्याचा इ...
-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त मुंब...
-
RSP દ્વારા રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠની ઉજવણીની સફળતાપૂર્વક તૈયારી 26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિ...