राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मध्यप्रदेश- उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर
|
झाशी रेल्वे स्थानकात महादेव जानकर, कुमार सुशील व अन्य. |
मुंबई : आबासो पुकळे
'कंनेक्ट इंडिया स्वराज रॅली' अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर, माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य हे उत्तर भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे(मामा) आहेत.
|
दतीया (मध्यप्रदेश) येथे महादेव जानकर, बाळासाहेब लेंगरे मामा, कुमार सुशील व अन्य रासप पदाधिकारी.
|
उद्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यप्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित 'राष्ट्रीय संविधान दिवस' कार्यक्रम व कार्यकर्ता मेळावा दातिया जिल्ह्यात सपहा पहाड मैदान, रेल्वे स्टेशनच्या जवळ, दतिया येथे आयोजित केला आहे. दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी उत्तर प्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित कानपूर येथे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशाल जनसभेचे आयोजन केले आहे. |
मल्हारगड आलमपुर जिल्हा - भिंड येथे राजे मल्हारराव होळकर समाधीस्थळी महादेव जानकर, बाळासाहेब लेंगरे मामा, अन्य रासप पदाधिकारी. |
|
दतिया(मध्यप्रदेश) येथे महादेव जानकर यांचे स्वागत करण्यात आले |
दरम्यान, आज २५ नोव्हेंबर रोजी पहाटे महादेव जानकर झाशी रेल्वे स्थानकात पोहचले व दतियाकडे रवाना झाले. पुढे पितांबरी पीठ की नगरी दतिया मध्यप्रदेश पोहचल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांचेतर्फे भव्य स्वागत व अभिनदंन करण्यात आले. दरम्यान, मल्हारगड आलमपुर, जिल्हा- भिंड (मध्यप्रदेश) येथे अटकेपार झेंडे लावणारे राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधी परिसरास श्री. जानकर यांनी भेट दिली.
No comments:
Post a Comment