मुंबई- गोवा महामार्गावर रासपचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; भीक नको हक्क द्या म्हणाले
दिनांक ८/११/२०२१ रोजी बाबदेवपट्टी पुनर्वसन , कडापूर ते धनवी मार्गे जोर रस्ता व खर्डी ते हुंबरी मार्गे नेराव सुतारवाडी रस्ता या अतिगंभीर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. माणगाव-रायगड पोलीस प्रशासन व पत्रकार बंधूंनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या आंदोलनास सहकार्य केल्याचे रायगड जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्कप्रमुख संतोष (तात्या) ढवळे यांनी सांगितले. या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागाचे नेते भगवान ढेबे, मावळ लोकसभेचे नेते श्रीकांतदादा भोईर, महिला आघाडीच्या नेत्या सौ मनीषाताई ठाकूर, महाड विधानसभेचे नेते बाळाराम ढवळे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संपतराव ढेबे, माणगाव तालुका अध्यक्ष संदीप सुतार, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, गजानन चंदणे(खालापूर), प्रदीप कोचरेकर(खोपोली), बळीराम ऐनकर (कर्जत), सूर्यकांत टेंबे(दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष), दिनेश ढवळे, अनिकेत सुतार, केशव ढवळे, निलेश उपाळे, धाऊ ढवळे, पांडुरंग झोरे, तस्लिमा अन्सारी (मोरबे- माणगाव), सौ. कमल ढवळे, चंद्रकांत झोरे, सौ. शोभा झोरे, पप्पू सुतार, लक्ष्मण ढवळे, सुनील उपाले, जयेश ढवळे, मालोजी झोरे, दीपक थोरात, किरण ढवळे, मोतीराम वरक, सौ. छाया ढवळे, सुनील कडू, सौ. पार्वती ढवळे, रोहिदास झोरे, सुनील भद्रिके, पिंटेश कोकरे, प्रकाश वाघमारे, जयराम भद्रीके, संजय थोरात, प्रकाश वाघमारे,नथुराम मरगळे यांच्यासह विविध आघाडीचे विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment