Thursday, November 25, 2021

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मध्यप्रदेश - उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मध्यप्रदेश- उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर

झाशी रेल्वे स्थानकात महादेव जानकर, कुमार सुशील व अन्य.

मुंबई : आबासो पुकळे

'कंनेक्ट इंडिया स्वराज रॅली' अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर, माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य हे उत्तर भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे(मामा) आहेत. 

दतीया (मध्यप्रदेश) येथे महादेव जानकर, बाळासाहेब लेंगरे मामा, कुमार सुशील व अन्य रासप पदाधिकारी.

उद्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यप्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित 'राष्ट्रीय संविधान दिवस' कार्यक्रम व  कार्यकर्ता मेळावा दातिया जिल्ह्यात सपहा पहाड मैदान, रेल्वे स्टेशनच्या जवळ, दतिया येथे आयोजित केला आहे. दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी उत्तर प्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित कानपूर येथे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशाल जनसभेचे आयोजन केले आहे.
मल्हारगड आलमपुर जिल्हा - भिंड येथे राजे मल्हारराव होळकर समाधीस्थळी महादेव जानकर, बाळासाहेब लेंगरे मामा, अन्य रासप पदाधिकारी.

दतिया(मध्यप्रदेश) येथे महादेव जानकर यांचे स्वागत करण्यात आले

दरम्यान, आज २५ नोव्हेंबर रोजी पहाटे महादेव जानकर झाशी रेल्वे स्थानकात पोहचले व दतियाकडे रवाना झाले. पुढे  पितांबरी पीठ की नगरी दतिया मध्यप्रदेश पोहचल्यानंतर  राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांचेतर्फे भव्य स्वागत व अभिनदंन करण्यात आले. दरम्यान, मल्हारगड आलमपुर, जिल्हा- भिंड (मध्यप्रदेश) येथे अटकेपार झेंडे लावणारे राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधी परिसरास श्री. जानकर यांनी भेट दिली.

Tuesday, November 23, 2021

आझाद भारत में लोकतंत्र की हत्या हो रही है : हरीश देवासी

आझाद भारत में लोकतंत्र की हत्या हो रही है  : हरीश देवासी


आजाद भारत में लोकतंत्र की हत्या हो रही है ! आज सिरोही शिवगंज में 6 दिन हो गए हैं और अभी तक पीड़ित परिवार को न्याय नहीं मिला ! पूरे 36 कोम को सड़कों पर उतर कर धरना प्रदर्शन करना पड़ रहा है अभी तक लाश मोर्चरी में रखी हुई है!  इंसानियत मर चुकी है अपराधी अभी भी बाहर घूम रहे हैं उनको गिरफ्तार नहीं किया जा रहा है ! यह कहीं ना कहीं प्रशासन की मिलीभगत और किसी बड़े व्यक्ति की मिली भक्ति के बिना नहीं हो सकता  ऐसा आरोप बिजोवा के सरपंच हरीश देवासी ने लगाया !  देवासी समाज के सभी युवा साथियों यदि अब आप जागरूक नहीं हुए तो आने वाले टाइम पर आप का अस्तित्व ही खत्म हो जाएगा हमें अभी तक आगे और बहुत सारी लड़ाइयां लड़नी बाकी है इसके लिए सभी युवाओं को आगे आना होगा और ऐसे लोगों को सबक सिखाने की जरूरत है आने वाले इलेक्शन में ध्यान रखें  वही लोग आपके सामने गिड़गिड़ाएंगे नाटक करेंगे लेकिन हमे तो उसको वोट की चोट बस एक व्यक्ति यदि 10 लोगों को डिवाइड कर सकता है तब इन लोगों को पता चलेगा जैसे गुर्जर समाज और जाट समाज हमारे से कितने आगे निकल चुके हैं उनके लोगों में जागरूकता और एकता के कारण ही वह लोग आगे बढ़े हैं आज उन लोगों को कोई परेशान नहीं करता तो आप भी ध्यान रखे! 





प्रदेश में न्याय के लिए आखिर कब तक सड़को पर आना पडेगा..⁉️

आजादी के 74 /' 75 वर्ष बाद भी देश मे गरीब, पिछडे एवं शोषित समाजो को अधिकार व न्याय के लिए सड़को पर धरना-प्रदर्शन करना पडता हैं और शासन-प्रशासन का मौन व तमाशबीन बनना तो सरेआम आज़ाद भारत में लोकतंत्र की हत्या हैं. शिवगंज कोना कोलर निवासी भाई ‌अनाराम देवासी का मृत शरीर मोर्चरी में पडा व खराब हो रहा हैं उसको छ-सात दिन हो रहे हैं उसका परिवार , रिश्तेदार और हजारो लोग सड़को पर बैठे है मगर मृत्यु पुर्व लिखे हुए पत्र में नामजद लोगों से प्रशासन द्वारा पुछताछ या गिरफ्तारी या अभी तक कोई बडी कारवाई ना होना चिंता का विषय हैं. आखिर प्रशासन पिडीत परिवार व राईका समाज के धैर्य की परिक्षा क्यू व कब तक लेंगे और शासन-प्रशासन ऐसे संवेदनशील मामलों पर लीपा-पोती क्यू व कब तक करेगी. यह मृतक के परिवार व देवासी समाज के साथ बहुत बड़ा अन्याय हो रहा है. अब पुरे प्रदेश के 36 कौम के बुद्धीजिवी लोगों से करबद्ध निवेदन हैं की पिडीत परिवार को न्याय दिलाने मे मदद करे. और न्याय व अधिकार के लिए सभी को आगे आना होगा नही तो अब मानवता ही खत्म हो रही हैं. और प्रदेश में हत्यारो का मनोबल व अपराध भी बढेगा...? जागो युवाओं जागो अभी नहीं तो कभी नहीं..! इसलिए अब अपराधियों के खिलाफ पिडीत परिवार व राईका समाज का 36 कौम साथ दे और अब एकता का परिचय बहुत जरूरी है!


छ-सात दिन से धरणे पर बैठे सभी आदरणीयों , भाईयों , साथियों, अनुजों एवं समाज के सभी समाज सेवी संगठनों , संघर्ष समितीयों के सभी कर्मठ कर्मवीर कार्यकर्ताओ को नतमस्तक प्रणाम.

राईका , रैबारी , देवासी समाज राजस्थान

प्रदेश की सभी संघर्ष समितीयाँ , संगठन एवं मार्गदर्शन मंडल और  युवाशक्ती

मालधारी अधिकार संगठन राजस्थान

Saturday, November 20, 2021

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय : भगवान ढेबे

पनवेल :  तालुक्यातील कामोठे स्थित जवाहर इंडस्ट्रीज मधील एका विदेशी कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अल्प वेतनात राबवून त्यांना  मूलभूत सोईसुविधापासून डावलले जात होते, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागाचे तथा कामगार नेते भगवान ढेबे यांच्या ६ महिन्याच्या संघर्षानंतर कंत्राटी कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. सदर आस्थापनेत सुमारे चारशे ते पाचशे कामगार दिवस-रात्र काम करत होते. त्यांची पिळवणूक होत होती, याविरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्री. ढेबे यांनी कामगारांच्या बाजूने कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार करत त्यांच्याकडे दाद मागितली. 

श्री. ढेबे यांच्या अथक प्रयत्नामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून ज्या कामगारांना किमान वेतन मिळत नव्हते, अशा कामगारांना माहे ऑक्टोबर 2021 पासून किमान वेतन लागू, त्याचबरोबर घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, दुप्पट दराने ओव्हर टाईम, दिवाळी बोनस, भविष्यनिर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, भर पगारी रजा अशा अनेक सुविधा मिळवून देण्यात आल्या आहेत.  त्यामुळे सर्व कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये, अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढण्यासाठी संघर्षासाठी त्यांच्या संघटनेच्या कार्यालयांमध्ये येऊन संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन श्री. ढेबे यांनी केले आहे.  यावेळी श्री. ढेबे यांच्यासमवेत श्री. आण्णासाहेब रुपवर , सौ. मनिषाताई ठाकूर, मुकेश भगत, श्रीकांतदादा भोईर आदी उपस्थित होते.

Friday, November 19, 2021

तीनों कृषी कानुन बिल वापस लेने पर लोकतंत्र की जीत हुई और अहंकार की हार : महेंद्र राठोड, युवा नेता रासप गुजरात

तीन कृषी कायदे बील मागे घेतल्याची घोषणा, लोकशाही जिंकली तर मोदी सरकारच्या अंहकराची हार : महेंद्र राठोड, युवा नेता गुजरात रासप


तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर गुजरात राष्ट्रीय समाज पक्षाचे युवानेते श्री महेंद्र राठोड यांनी आणि आपली प्रतिक्रिया समाज माध्यमात व्यक्त केली आहे. राठोड म्हणाले हा लोकशाहीचा विजय असून मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. गेल्या एक वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या धैर्याचा विजय आहे. अशदूरदृष्टी पणा व मोदी सरकारचा अहंकार यामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला हा देश कधी विसरणार नाही.
श्री राठोड पुढे म्हणाले आहेत, आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्याला वंदन करतो कारण त्यांच्या बलिदानाचा हा विजय आहे.


 



Monday, November 15, 2021

महादेव जानकर म्हणाले, या देशात आक्रित घडतय

महादेव जानकर म्हणाले, या देशात आक्रित घडतय

मनोर : पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर, बाजूस सिद्धप्पा अक्कीसागर

मनोरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न; सब समान तो देश महान : महादेव जानकर

मुंबई : आबासो पुकळे 

या देशात आक्रित घडतय; ज्यांची मतांची टक्केवरी कमी आहे ते आमच्या डोक्यावर बसलेत आणि ज्यांची मतांची टक्केवारी जास्त आहेत ते भिक मागत बसलेत, पण मला मागतकरी समाजाला देणारा समाज बनवायचाय, त्यासाठी आम्हाला आमचे दल मजबूत करायचे आहे, असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. पालघर तालुक्यातील मनोर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, जिल्हा प्रभारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेला माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर सामोरे गेले. आ. जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन आम्ही आमचा पक्ष बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे. कारण दुसऱ्या बाजूला काँग्रेस गांधीवादावर चालते, शिवसेना आणि भाजप हिंदूवादावर चालते, समाजवादी पार्टी समाजवादावर चालते तसे आम्ही फुलेवाद व मानवतावादावर चालणारे आहोत. "सब समान तो देश महान" असे उद्गार पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी काढले.
सर्व धर्मीयांना राजकीय, सामाजिक, आर्थिक भागीदारी समान मिळाली पाहिजे, या विचाराने आमचा पक्ष पुढे जाणार आहे. आज सर्वच समाजात जातिभेद केला जातोय, धर्मवाद केला जातोय, दंगली घडवल्या जातात, हे कुठेतरी थांबवून, समतामुलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. मानवतावाद पुढे आणण्याचे काम आमच्या पक्षातील अल्पसंख्यांक आघाडी, मच्छिमार आघाडी, वकील आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व आघाडीचे नेते करणार आहेत, असे पत्रकार परिषदेत जानकर म्हणाले.  पुढे जाऊन काँग्रेस आणि भाजपला पर्याय आम्ही देऊ, हे आमचं पुढचं संशोधन असणार आहे. कारण, काँग्रेस आणि भाजपवर आरएसएसचे नियंत्रण आहे, तुम्हाला नेता राहुल गांधी पाहिजे की मोदी पाहिजे हे तेच ठरवतात. प्रधानमंत्री काँग्रेसचा असला तर तो गांधी घराण्यातला आणि भाजपचा असला तर आरएसएस मधून करायचा ही प्रथा बदलायला पाहिजे.  सर्वसामान्यांमधला प्रधानमंत्री व्हावा, ही आमची अपेक्षा आहे. असे बोलून जानकर यांनी दोन्ही पक्षावर ताशेरे ओढले. भारत देशात राहणाऱ्या उच्चवर्गीय, आदिवासी, ओ.बी.सी, मुस्लिम, ख्रिश्चन मागासवर्गीय सर्व समाजासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. सर्व धर्मियांना संगती घेऊन आमचा पक्ष बळकट करणार आहोत. असे दोन दिवसीय शिबिरात महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज या देशात फक्त मुस्लिम आणि मागासवर्गीय लोकांना टार्गेट केले जातंय. पण हे विसरून चालणार नाही की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मुस्लिमांचही तेवढाच योगदान आहे, जेवढा सर्व देशवासीयांचा आहे.



राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाप्रभारी  यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर माधवधाम, मनोर  जिल्हा- पालघर येथे पार पडले. यावेळी जिल्हा प्रभारी यांच्यासह माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, प्रसन्नकुमार, बाळकृष्ण लेंगरे, कुमार सुशीलजी, गोविंदराम शूरनर, पंडित घोळवे आदी उपस्थित होते.

Saturday, November 13, 2021

मुंबई- गोवा महामार्गावर रासपचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; भीक नको हक्क द्या म्हणाले

मुंबई- गोवा महामार्गावर रासपचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; भीक नको हक्क द्या म्हणाले





मुंबई महामार्गावर माणगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व यावेळी आंदोलकांनी विविध मागण्या केल्या व जोरदार घोषणाबाजी केली. बोपदेवपट्टी गावाचे पुनर्वसन करा, जोर धनगरवाडी ला धनवीमार्गे रस्ता करा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. 




दिनांक ८/११/२०२१ रोजी बाबदेवपट्टी पुनर्वसन , कडापूर ते धनवी मार्गे जोर रस्ता व खर्डी ते हुंबरी मार्गे नेराव सुतारवाडी रस्ता या अतिगंभीर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.  माणगाव-रायगड  पोलीस प्रशासन व पत्रकार बंधूंनी  राष्ट्रीय समाज पक्षाच्या आंदोलनास सहकार्य केल्याचे रायगड जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्कप्रमुख संतोष (तात्या) ढवळे यांनी सांगितले. या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागाचे नेते भगवान ढेबे, मावळ लोकसभेचे नेते श्रीकांतदादा भोईर, महिला आघाडीच्या नेत्या सौ मनीषाताई ठाकूर, महाड विधानसभेचे नेते बाळाराम ढवळे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संपतराव ढेबे, माणगाव तालुका अध्यक्ष संदीप सुतार, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, गजानन चंदणे(खालापूर), प्रदीप कोचरेकर(खोपोली), बळीराम ऐनकर (कर्जत), सूर्यकांत टेंबे(दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष), दिनेश ढवळे, अनिकेत सुतार, केशव ढवळे, निलेश उपाळे, धाऊ ढवळे, पांडुरंग झोरे, तस्लिमा अन्सारी (मोरबे- माणगाव),  सौ. कमल ढवळे, चंद्रकांत झोरे, सौ. शोभा झोरे, पप्पू सुतार, लक्ष्मण ढवळे, सुनील उपाले, जयेश ढवळे, मालोजी झोरे, दीपक थोरात, किरण ढवळे, मोतीराम वरक,  सौ. छाया ढवळे, सुनील कडू, सौ. पार्वती ढवळे, रोहिदास झोरे, सुनील भद्रिके, पिंटेश कोकरे, प्रकाश वाघमारे, जयराम भद्रीके, संजय थोरात, प्रकाश वाघमारे,नथुराम मरगळे यांच्यासह विविध आघाडीचे विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते.

उच्चशिक्षण सहसंचालकांच्या कक्षात विनाचिठ्ठी थेट प्रवेश, प्रा. डॉ. हेमंत कटरे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक


 

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...