Friday, October 22, 2021

10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची संधी

10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची संधी

सातारा : सातारा डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करुन केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयतनशील आहे. सातारा पोस्ट ऑफिसद्वारे आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लहान मुलींचा सन्मान करण्यासाठी  मुलींचे “सुकन्या समृध्दी खाते” उघडण्यासाठी  विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या गावापर्यंत पाहोचून 10 वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व मुलींचे सुकन्या समृध्दी खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे डाक विभागाच्या प्रमुख अपराजिता म्रिधा यांनी सांगितले. 

  भारत सरकार मार्फत उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली व सर्वात जास्त व्याजदर असणारी ही योजना आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळा, गैर सरकारी संस्था, खाजगी संस्था पुढाकार घेऊन आपल्या भागातील सर्व 10 वर्षाखालील मुलींचे सुकन्या खाते उघडु शकतात. सुकन्या समृध्दी  या योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हेल्प लाईन नं. 8275700654 असुन अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट आफिसमध्ये संपर्क करावा असेही श्रीमती म्रिधा यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...