ब्राम्हणांना नावे ठेऊन काही होणार नाही, राष्ट्रीय समाज ब्राम्हणवादापासून लांब : सिद्धप्पा अक्कीसागर
भारतीय राज्यघटनेस पुष्पांजली वाहत वंदन करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करताना श्री. सिद्धप्पा अक्कीसागर, के. प्रसन्नाकुमार, गोविंदराम शूरनर व अन्य. |
महात्मा फुले कर्मभूमी पुण्यात राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनची बैठक व यशवंत नायक वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
पुणे : राष्ट्र भारती द्वारा, आबासो पुकळे
दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी श्रीरूप, शिवशंभोनगर भाग ३ अ, कात्रज-कोंढवा रोड कात्रज पुणे येथे राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे यशवंत नायक वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यशवंत नायक २७ वर्षे पूर्ण करून २८ व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाची सुरवात महामानव डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित भारतीय राज्य घटनेचे पूजन व राज्यघटना भेट देऊन झाली. पुढे राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनसाठी काम करणाऱ्या शासकीय व निमशासकीय, खाजगी कर्मचारी बांधवांचा परिचय करून देण्यात आला व मनोगत कार्यक्रम पार पडला.
मार्गदर्शन करताना रासेफचे अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर |
यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्रातील संघटन होते. समीर पेंडाम यांनी घोड्याचे चित्र रेखाटले होते. ब्राह्मणाकडे डबल स्टॅण्डर्ड आहे. लोकांकडून फालतू गोष्टी सोशल मीडियात टाकल्या जातात. २४ एप्रिल १९८८ ला यशवंत सेना स्थापन झाली तर १९९० ला चंद्रभागेच्या तीरावर विलीन झाली. पाण्यात राहून माशाशी वैर करून चालणार नाही. आपली नोकरी सांभाळून काम केले पाहिजे. महादेव जानकरांनी काशीराम असल्याचे सिद्ध केले आहे. २००९पर्यंत अभिमन्यू सारखा 'राष्ट्रीय समाज पक्ष' एकटा लढला. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. जगात असे कुठे घडले नाही, नोकरी सोडल्यानंतर एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आपली शक्ती किती मोठी आहे, हे मी जाणतो. ११ लोकांना घेऊन काशीराम यांनी ०४ राज्यात पार्टी यशस्वी केली.
शिक्षकांनी इतिहास भूगोल सोबत समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकवावा. राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान बनणार. जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. चार्वाक आणि बुद्ध ग्रेट माणसे आहेत. प्रत्येक माणसांमध्ये ऊर्जा आहे. आपल्याला सत्ता, संपत्ती सन्मानासाठी काम करायचेय. महामानव गौतम बुद्ध हा सर्वोत्तम माणूस आहे. महात्मा फुले यांच्या मार्गावरून बाबासाहेब आंबेडकर चालले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले. ज्यांचे कर्म चांगले त्यांचे फळही चांगले. ज्यांचे कर्म दगड ते दगडच राहणार. आपण धनगरवाड्याच्या बाहेर जायला पाहिजे. रासेफमध्ये ५० टक्के महिलांचा सहभाग हवा. रासेफमध्ये सर्वजाती धर्माच्या, प्रांताच्या लोकांना सहभागी करून घ्या.
आपला माणूस शोधू नका, आपली संघटना शोधा कारण.. : प्रबोधनकार गोविंदराम शूरनर
मार्गदर्शन करताना प्रबोधनकार श्री. गोविंदराम शूरनर |
समाजाच्या कल्याणासाठी समाजकार्य म्हणजे बुद्धिजीवी. सत्यशोधक बनायचे असेल तर 'फुलेवाद' वाचला पाहिजे. नकली भारतीय नाहीतर मला असली भारतीय बनायचे आहे, असे ठरवले पाहिजे. 'जय मल्हार' शब्द आम्हीच दिला. आपण जय भारत आहोत. 'बहाने'बाज समाज, 'गुलाम' समाज बनतो, 'गुलाम' समाज, 'लाचार' आणि 'विकाऊ' समाज बनतो. भावनिक कार्यकर्ता टिकू शकत नाही. त्याची गणना आयाराम गयाराममध्ये होते. आम्ही 'जोश'मध्ये राहतो. 'होश'मध्ये राहणारा कार्यकर्ता हारत नाही. बुद्धीला धार दिली पाहिजे. बुद्धीला धार द्यायची असेल, तर वाचलं पाहिजे. आरएसएस एका 'शब्दा'वर काम करते. त्यावरून 'देशावर राज्य' करते. वाचन संस्कृतीचा मुलगा अधिकारी बनतो. 'आपला माणूस शोधू नका, आपली संघटना शोधा, आपला माणूस शत्रुपक्षात असतो आणि त्यात आपण बळी जातो'. आपल्याला एकसघं विचार करायचा आहे, टीकाऊ समाज बनला पाहिजे, विकाऊ समाज नव्हे. 'संघटना मोठी असेल, तर नेता मोठा होत असतो'. तुम्हाला समाजाला मोठे करायचे असेल, तर इमानइतबारे काम करावे लागेल. '२०२४' ला आमची सत्ता आली पाहिजे, नाही आली तर, आमच्या इशारावर चालली पाहिजे. मी यशवंतसेना ते रासपपर्यंत संघटनेत वाहून घेतलं. मी माझं काम करत राहिलो, बोलघेवड्या लोकाकडे लक्ष दिले नाही. शिकलेले लोक लिहीत नाही, पण मी मात्र लिहिता झालो, अनेक पुस्तके लिहिली प्रबोधनाची. श्री. शूरनर यांनी उपसथितांसमोर यशवंत नायकचे दैनिक व्हावे, यासाठी आकडेमोड करणारे गणित मांडले.
या बैठकीत अन्य मान्यवरांनी व्यक्त केलेले मत पुढीप्रमाणे...
श्री. सतीश नाजरकर : बुद्धिजीवी वर्ग या राष्ट्राचा पाया बनला पाहिजे. संघटनेशिवाय या देशात काहीही घडणार नाही. ४० च्या आतील लोकांना रासेफमध्ये जोडायचे आहे. आमची संघटना लेचीपेची असणार नाही. रासेफचे संघटन सत्य आणि असत्य ओळखून, 'सत्या'च्या बाजूने लढणारे असेल.सौ. पूनम राजगे ताई : आज आमच्या घरी अक्कीसागर साहेब व सर्वांचे स्वागत. आमच्या घरी ज्ञानी लोक आले. ज्ञानी लोकांना आमच्या परिवाराचे सहकार्य लाभेल. रासेफचे चांगले सामाजिक काम आहे. आम्हाला पुस्तकांची भेट दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद.श्री. संभाजी हुलगे : मुंबईच्या ऑफिसमधून यशवंत नायकचे कार्यालय बाहेर काढा. यशवंत नायकचे सभासद वाढवावे, अन्यथा यशवंत नायकचे दैनिकाचे स्वप्न अधुरे राहील. अक्कीसागर साहेबांना रासेफचे काम करू द्या.
श्री. राजेंद्र कोकरे : आपण विचारांचे प्रचारक आहोत. यशवंत नायक आपला नायक आहे. कार्यक्रम राबवताना सर्वांनी मिळून खर्च केला पाहिजे.
श्री. संतोष कोकरे : रासेफच्या माध्यमातून यशवंत नायकला मदत करायची. यशवंत नायकमुळे आपला वाचक वर्ग तयार झाला. यशवंत नायक वर्धानदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा.
श्री. कालिदास गाढवे : आताच्या पिढीला चळवळ माहीत नाही. गावात आता पुढाऱ्याच फार चालत नाही. व्यक्तीला कालमर्यादा असते, विचारला कालमर्यादा नसते.
श्री.महावीर सरक : रासेफला आर्थिक मदत करावी. आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांनी राज्यघटनेतील किमान मूलभूत हक्क वाचले तर कोणताही माणूस निर्भयपने जगू शकतो.
श्री. पी. बी. पांढरे : आजचा कार्यक्रम म्हणजे ज्योत स्नेहाची आणि प्रेमाची उजाळत आहे. नव्यानेच मी रासेफमध्ये कामाला सुरुवात केली आहे.
बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. एस एल अक्कीसागर साहेब- राष्ट्रीय अध्यक्ष रासेफ, उद्धघाटक के. प्रसन्नाकुमार (केरळ), थोर विचारवंत, प्रबोधनकार श्री. गोविंदराम शूरनर-सल्लागार रासेफ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे सूत्रसंचलन रासेफचे सचिव श्री. जयसिंग राजगे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री. भिवा राजगे सर यांच्या परिवारातर्फे हॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. या बैठकीत राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष एस. एन. नाजरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर रासेफचे सहसचिव पी. बी. पांढरे यांनी आभार मानले. यावेळी अप्पासाहेब जानकर, श्री. मदनेश्वर शूरनर, श्री. शहाजी भाळे, श्री. नितीन शेंडगे, श्री. किरणराव सोनवलकर, श्री. संजय येलवांते, श्री. डी. आर. गडदे, हनुमंत भिसे, श्री. जे. एस. राजगे, कुमार शरद दडस, श्री. अण्णासाहेब अनुसे व अन्य ४०हून अधिक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी पुस्तके विक्रीस उपलब्ध होती.