Monday, January 25, 2021

उद्या कर्नाटकात रासपचा क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक सोहळा

 उद्या कर्नाटकात रासपचा क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक सोहळा



मुंबई : भारतीय स्वातंत्र्य महापराक्रमी योद्धा क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या स्मृतिदिन व उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी कर्नाटक रासप तर्फे क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक सोहळा नंदगड़ (जि-बेळगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटक रासपचे राज्य सरचिटणीस अनिल पुजारी यांनी दिली आहे.  रासपचे राष्ट्रिय कार्यकारणी सह, विविध राज्यातील रासपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. ७ फेब्रुवारी ला एस टी आरक्षण मेळाव्यामुळे कलबुर्गी ते नंदगड़ होणारी रॅली रद्द करन्यात आली आहे. परंतु थाटामाटात राज्यभिषेक कार्यक्रम पार पाडु, असा विश्वास श्री. पुजारी यांनी व्यक्त केला आहे.


कर्नाटक राज्य संयोजक धर्मन्ना तोंटापुर यांच्यासह श्री. पुजारी हे बेळगावात दाखल झाले आहेत.  दोन अठवड्याहुन अधिक काळ रासपचे राष्ट्रिय अध्यक्ष श्री. एस. एल. अक्किसागर  हे स्वतः कर्नाटक राज्यात तळ ठोकून आहेत.  गदग, कोलार, कलबुर्गी, बेळगाव, विजयपुर,हावेरी, चित्रदुर्ग, म्हैसुर, दावणगेरे, रायचूर,  बेल्लारी, यादगिरी,  बेंगलोर  आदि  जिल्ह्यातून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उपस्थित राहतील.

Sunday, January 24, 2021

गुजरात रासप का विस्तार ; आनेवाले महानगर पालिका और नगर पालिका चुनाव मेंराष्ट्रीय समाज पार्टी पूरे गुजरात में सभी सीटों पर अपना उम्मीदवार उतारेगी : मेहता

शास्त्री, मेहता, राठोड, परमार, उपहार, शर्मा, देसाई, जाधव, मोदी, उपाध्याय के उपर पार्टीने जिमेदारी सौपी : सुशिल शर्मा

सूरत :  राष्ट्रीय समाज पार्टी गुजरात प्रदेश प्रभारी सुशील शर्मा के नेतृत्व में सूरत में मीटिंग का आयोजन किया गया । जिसमें भारत सरकार की गाइडलाइंस के अनुसार सोशल डिस्टेंस को ध्यान में रखते हुए मीटिंग का शुभारंभ किया गया । जिसमें गुजरात में होने वाले महानगरपालिका और नगर पालिका के चुनाव को लेकर चर्चा और रणनीति बनाई गई  जिस के   अन्तर्गत श्री अंकित मेहता को महा नगर पालिका  और नगर पालिका   इलेक्शन के इनचार्ज बनाया गया और साथ ही साथ  श्री अंकित मेहता को पार्टी प्रवकता   की जिम्मेदारी सौंपी गई । 



पार्टी में जुड़े नए व्यक्तियों की नियुक्ति और स्वागत किया गया जिसमें पूर्व साउथ गुजरात अध्यक्ष ऋषि राज शास्त्री को गुजरात प्रदेश उपाध्यक्ष पद पर नियुक्त किया गया ।एवं पूर्व  प्रदेश सचिव सचिव महेंद्र राठौड़ गुजरात युवा अध्यक्ष के के रूप में नियुक्त किया गया । एवं पूर्व सूरत शहर प्रमुख राजू परमार को सूरत जिला उपाध्यक्ष नियुक्त किया, अंकित मेहता को प्रदेश महासचिव और  प्रवकता  गुजरात राज्य, ललित भाई को प्रदेश सचिव, हीरामणि शर्मा को प्रदेश सचिव महिला मोर्चा, नाविक उपहार को सूरत जिला युवा अध्यक्ष, भरत भाई देसाई को वलसाड जिला अध्यक्ष पद पर नियुक्त किया, कुलदीप जाधव को साउथ गुजरात सह प्रभारी, रुचि मोदी को वलसाड जिला अध्यक्ष महिला मोर्चा, प्रवीण भाई कच्छ जिलाध्यक्ष, पत्रा उपाध्याय को ओलपाड तालुका महिला मोर्चा अध्यक्ष बनाया गया। गुजरात प्रदेश युवा अध्यक्ष महेंद्र राठौर ने मीडिया के समक्ष कहां की,  आनेवाले महानगर पालिका और नगर पालिका चुनाव में इंचार्ज अंकित मेहता नेतृत्व करेंगे और अंकित मेहता ने मीडिया से कहा कि  राष्ट्रीय समाज पार्टी पूरे गुजरात में सभी सीटों पर अपना उम्मीदवार उतारेगी ।

दादा विठोबा लुबाळ यांच्या स्मृतीस विनम्र भावांजली

दादा विठोबा लुबाळ यांच्या स्मृतीस विनम्र भावांजली ! 


दहीवड़ी व्हाया 'म्हसवड ते आदमापुर' एस टी बस सेवा सुरु



माण खटाव तालुक्यातील सर्व बाळूमामा भक्तांना कळविण्यात आनंद होतो कि, दहिवडी आगाराची दहिवडी- म्हसवड - आदमापूर हि बस सेवा सोमवार दिनांक १८ /०१/२०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे तरी या सुवर्ण संधीचा फायदा सर्व भाविकभक्तांनी आणि प्रवाशी बांधवानी घ्यावा अशी सर्वाना विनंती हि बस दहिवडी मधून दुपारी 1 वाजता सुटेल म्हसवड मधून दुपारी २ वाजता सुटेल हि बस म्हसवड कुकुडवाड मायणी विटा तासगाव सांगली मार्गे आदमापूरला मुक्कामी जाईल दुसऱ्या दिवशी आदमापूर मधून सकाळी ६:३० वाजता सुटेल व म्हसवड ला दुपारी १२ वाजता पोहोचेल.

Saturday, January 2, 2021

समाजाने आता बदललेच पाहिजे

 समाजाने आता बदललेच पाहिजे


Point 18 be noted



१.  पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.*

२.   कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.

३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशीनिगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील.

६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा. 

७. मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम)

8 आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल.

१०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवू ठेवा.

११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू).

१२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.

१३.   वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी घालत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा.

१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायमच ऋणी रहा.

१५. घरातील महिलांना सन्मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा.                      

१६.  मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या.

१७. निंदा  टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि  असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. 

१८. घराघरात जो मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा, सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने. 

१९. आपलं आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा.

२०. चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा,

२१. आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा, 

हा संदेश आपल्या संपूर्ण समाजाच्या हिताचा आहे... तेव्हा स्वतःही स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा...


वाचन करा📕📗📘

व्यायाम करा💪💪💪

अर्थ साक्षर व्हा💸💸💸


वंशावळी (Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी

 वंशावळी (Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी

(वंशावळी# स्वतः वडील-आजोबा-पंजोबा-खापरपंजोबा-पन्तू-नातू-अन्तू-खातू-नातू)

महिन्याच्या प्रत्येक पहीला शुक्रवार लेख 

-----------------------------------------------------------

आपण सर्वसाधारणपणे आपल्या पुर्वजांच्या वंशाची, कुळातील पूर्वजांच्या वंशावळी ही काही अपवादात्मक कारणांसाठीच जुळविण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. शाळा महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणा-या काही महत्वाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यामध्ये वंशावळी हा एक भाग आहे


परंतु हा वंशावळी जुळविण्याचा व शोधण्याचा मार्ग हा तात्पुरत्या कागदोपत्री तरतूदीसाठी सिमीत आहे. कारण जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील व वडीलांचे वडील म्हणजे आजोबा इथपर्यंतच हा वंशावळीचा विषय मर्यादित होतो.

परंतु काही शहरात आजचा मुंबईस्थित तरूण वर्ग  व उत्साही चाकरमाणी  आपली वडीलोपार्जित मालकीची जागा, कुळाची जागा, वंशाची वंशावळी या पारंपरिक व महत्वाच्या गोष्टीचा शोध लावण्याचा व ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत व बहुतेक लोकांना यात यशही आले आहे व येत आहे.


सुनिल भडेकर यांच्या सध्या वास्तवातल्या ४ पिढ्यांची वंशावळी  राजापूर-रत्नागिरी येथील असेल तर त्या आधीची ५ पिढयांची१७०० शतकापासुनची वंशावळी लांजा-रत्नागिरी तालुक्यातील भडे या गावची असेल. तसेच काही तावडे, खानविलकर,टुकरुल, पारकर,मांजरेकर, सुर्वे,राणे, सावंत, दळवी,माने, राऊत,कदम, मोरे,गजरमल,गडकरी यांच्या सदर जिल्ह्यातील वंशावळीच्या बाबतीत आहे.


आपण आपल्या पुर्वजांच्या वंशाची *साधारणतः ९ पिढ्याच्या वंशाची वंशावळी* शोधू शकतो जुळवू शकतो. या सर्व प्रकारात महसुल  विभागाचा दस्तैवजांपैकी काही महत्वाचे दस्तैवज खालीलप्रमाणे-


१) *टिपनबुक नोंदवही-*

(जागेचे सर्व्हे, वर्णन नोंद व मुळ भोगवटाधारक सदर बुकात सापडतात. साधारण १८४० ते १८८० या कालावधीच्या नोंदी)


२) *सुडपत्रक-सुडाचा उतारा सन १८६४*-सुडाच्या मुळ उता-यास जमाबंदी पत्रक असेही म्हणतात.


३) *जंगलखर्डा नोंदवही पत्रक सन १८८६-* सदर नोंदवहीत आपल्या वंशातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणतः १८२० साली झाला होता त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजे ज्यांचा जन्म सन १७०० ते १७२० च्या आसपास झाला आहे त्या वंशातील मुळपुरुषाचे नाव नोंद असते. म्हणजे आपण ७ व ८ व ९ क्रमांकाची पुरुषाची वंशावळी या दस्तैवजावर नोंद असते


४) *बोटखत नोंदवही १८९५ व आकारफोड पत्रक १९५७*- या दस्तैवजावरून आपण साधारण ५ व ६ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.


५) *फेरफार पत्रक नोंदवही व मेळाची फाईल,*- गावनमुना ६अ, तसेच गुणपत्रिका  या दस्तैवजावरून  वंशावळीतील ३ व ४ क्रमांकाच्या पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.


६) *विदयमान २०१८ चा ७/१२ उतारा* यावर आपले व आपल्या वडीलांचे नाव असते म्हणजे क्र.१ व २ क्रमांक  ची वंशावळी येथे जुळली जाते.


*यापैकी कोणते दस्तैवज कोठे अर्ज करावेत.*

१) टिपनबुक नोंदवही-भुमापन तथा भुमीअभिलेख विभाग तहसील

२) जंगलखर्डा नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय

3) बोटखत नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय

४) आकारफोड पत्रक-तलाठी/तहसील कार्यालय

५) मेळाची फाईल-तहसिल/तलाठी कार्यालय

६) फेरफार नोंदवही/गुणपत्रिका/गावनमुना ६अ, ७/१२ उतारा-तलाठी कार्यालय

७) मेळ साक्षीदार पुरावा-तहसिलदार/तलाठी कार्यालय/ 


वंशावळी(Family Tree) छजुळणी करून *तहसिल क्षेत्रातील दुय्यम निबंधक तथा सक्षम महसुल प्रमाणक अधिकारी* मार्फत प्रमाणित करावी


 सदर प्रकरणातील टिपनबुक(सन १८४० ते सन १८८०), सुडाचा उतारा १८६४-सुडपत्रक, जंगलखर्डा नोंदवही १८८६ व बोटबुक नोंदवही-१८९५, ही मोडी लिपीमध्ये तहसिल कार्यालय/भुमापन तथा भुमीअभिलेख यांचे कार्यालयात उपलब्ध होते. त्याचे मराठीमध्ये *शासकीय मोडीलिपी तज्ञाकडुन प्रमाणीत*

हस्तांतर करून घ्यावे.


व सदर दस्तैवज हे अर्ज करून प्रत्येक दस्तैवज हा रुपये २/-, रुपये १० ते जास्तीत जास्त रुपये ४०/- शासकीय शुल्क भरणा करुन संबंधित महसुल विभागात अर्जाचे प्राप्त करवावे.

तरी साध्या सोप्या भाषेत वर्णन केलेल्या माहीतीचा अभ्यास करताना महसुल विषयक कायदेशीर पुस्तके व दस्तैवज यांचाही वाचकांनी अभ्यास करावा.


मागील लेख:

बारा बलुतेदार वतन जमीन पध्दतीखोत व त्यावरील आजची मालकी "


( *पुढील लेख:* हा पतीच्या वडीलोपार्जित ७/१२ जागेवर पतीच्या हयातीत पत्नीचे सहहीस्सेदार म्हणून नाव लावता येते-शासन परिपत्रक-नियम.सदर लेखावर

आपल्या सुचना कळवाव्यात)

--------------------------------

सुनिल सुनंदा शशिकांत भडेकर

महसुल अभ्यासक

LLB, MBA (Finance), B. com.

Special Executive Officer 

Govt. Maharashtra 

WhatsApp: 90296 44000

helpsocialorg@gmail.co

(आजतागायत  १६० च्यावर महसुल निशुल्क  व्याख्याने)

केवळ  मुंबई.ठाणे.राजगड. पालघर.रत्नागिरी निशुल्क व्याख्यानासाठी संपर्क.

-----------------------------------------------

Please Empower your   Friends by Sharing this

-----------------------------------------------

पत्रकार म्हणजे काय.....??

✍️पत्रकार म्हणजे काय.....??



पत्रकार म्हणजे फीरता वारा...


पत्रकार म्हणजे वाहता झरा...


पत्रकार म्हणजे रात्री एकटाच 


अंधारात चमकनारा तारा...


पत्रकार अंगावरील शहारा...


पत्रकार रात्रीचा पहारा...


फक्त पत्रकार आहे सुख अन दु:खाचा सहारा...


पत्रकार जनहिताचा नारा...


पत्रकार आहे अनमोल हिरा...


पत्रकार म्हणजे धाक अन् दरारा...


त्याचाच आहे वचक सारा...


काहीही करु शकतो पत्रकार

जर असेल तो नीती न खरा... 


पत्रकारांवर प्रेम करुन पहा....


एकदा तरी पत्रकारांवर प्रेम करुन पहा...


मनापासुन त्याच्यावर तुम्ही मरुन पहा...



जीवाला जीव देईल तुमच्या

         त्याचा हात धरुन पहा...

त्याचं नाव काळजावर

         एकदातरी कोरुन पहा...

कसा जगतो एकटा

तुम्ही चोरुन पहा...

प्रेमाचे दोन शब्द

त्याच्याशी बोलून पहा...


          त्याच्या सारख्या यातना

         एकदा तरी सोसुन पहा...


 अनोळखी जगात तुम्ही एकटे बसुन पहा...


दु:ख असुन मनात

तुम्ही हसुन पहा...

त्याच्या सारखे तुम्ही

ऊन्हात फिरून पहा...

 एकदा तरी पत्रकारांवर

          प्रेम करुन पहा...


तो रोज मरतो तुम्ही पत्रकारांवर  एकदातरी मरुन पहा...


लेकरांसाठी झुरतो तो

तसं भेटीसाठी झुरुन पहा...


तुम्हाला काय वाटतं तुम्ही

पत्रकारांच्या यातना सोसुन पहा...


 एकदा तरी  पत्रकारांवर....

       तुम्ही प्रेम करुन पहा

 सर्व पत्रकाराच्या मित्रांना  समर्पित 

महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना



अनेक कुटुंबे वृत्तपत्र वाचत नसल्याने त्यांना घरात आजार होऊनही त्यांना राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यावा हे माहित नसते.त्यामुळे त्यांना दागदागिने विकावे लागतात.यासाठी गोरगरीब रुग्णांना कळण्याकरिता खालील मेसेज शेअर करावा.

   राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही आता 1जुन2017 पासुन नाव बदलुन  महात्मा फुले जीवनदायी योजना करण्यात आले आहे.


या आरोग्य योजने मार्फत जाणाऱ्या पेशन्ट ला योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ,औषधे,जेवण व प्रवास खर्च दिला जातो. (1,50000) 

   971 प्रकारच्या कुठल्याही शस्त्रक्रिया खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत होत असतात.2,50,000 पर्यंत किडनी रोपण साठी शस्त्रक्रिया  मोफत होते परंतु 1  किडनी  जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराकडुन द्यावी लागते.

  कुठल्याही रुग्णालयात जाताना पिवळे ,केशरी,अंत्योदय व अन्नपुर्णा रेशनकार्ड ची गरज असते.त्याचप्रमाणे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड प्रत्येक जिल्हांची आजाराप्रमाणे नेमलेल्या खाजगी व शासकीय रुग्णालयाची यादी टोल फ्रि क्रमांक 18002332200 या क्रमांकावरती फिरवल्यास आपल्याला माहीती मिळु शकते.

         या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड अंत्योदय व अन्नपूर्णाया रेशनकार्डची गरज असुन मतदान कार्ड किंवा आधार कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा शासनाने नेमणूक केलेल्या खाजगी व शासकीय रूग्णालयात राजीव गांधी आरोग्यमित्र या काउन्टर वर नोंदणी केल्यानंतरच मोफत शस्त्रक्रिया केली जाते तसेच औषधे , जेवण व प्रवास खर्चही मोफत दिला जातो शासनाचा टोल फ्री नंबर- 18002332200 या टोल फ्री नंबर वरती प्रत्येक जिल्ह्याच्यी रुग्णालयाची माहिती मिळू शकते. 


            971 प्रकारच्या आजार व उपचार या योजनेंतर्गत मोफत असून  ( कॅन्सर, ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, मनक्याचा आजार, हाडांची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा आजार, प्लास्टिक सर्जरी, पित्त पीशवीची शस्त्रक्रिया, ब्रेन ट्युमर, भाजने, गुढग्यांची शस्त्रक्रिया, अॅपॅंडीक्स, हरनिया गर्भपीशवीची शस्त्रक्रिया, ह्रदयाला वॉल बसवणे, ह्रदयाला पेसमेकर बसवणे , पोटातील आतड्यांची शस्त्रक्रिया, तसेच कान नाक घश्याची शस्त्रक्रिया  इत्यादी )सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येतो. 

              कुठल्याही रुग्णांनी कावीळ याआजाराचे निदान झाल्यास गावठी उपचार न करता डॉक्टरांच्या सल्याने रक्त तपासनी करून औषधे व गोळ्या घ्याव्यात कावीळ चे जंतु कीडणी मध्ये सुक्ष्म प्रमाणात राहील्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्त तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधे घ्यावीत

        कुठल्याही रुग्णालयात जाण्या अगोदर आपली होणाऱ्या शस्त्रक्रियेची त्या रुग्णालयाला परवानगी आहे याची खात्री केल्यानंतरच त्या रुग्णालयामध्ये जावे.


 अनेकांचे संसार आर्थिक परीस्थितीमूळे उध्वस्त होत होते याला आता या योजने मुळे आळा बसला आहे.


           सर्वांना माहिती होऊ द्या

महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना


जनहितार्थ

नवीन शैक्षणिक धोरण २०२०

 नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी 



NEW EDUCATION POLICY 2020 :

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं

नामकरण आता 

"शिक्षण मंत्रालय" असं होणार...


जाणून घेऊया :

नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.

३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :


तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...


५ वर्षे मूलभूत Fundamental :

१. नर्सरी            @ ४ वर्षे

२. जूनियर केजी @ ५ वर्षे

३. एसआर केजी @ ६ वर्षे

४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे

५. इयत्ता दुसरी   @ ८ वर्षे


३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :

६. इयत्ता तिसरी  @ ९ वर्षे

७. इयत्ता चौथी   @ १० वर्ष

८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे


३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :

९.   इयत्ता सहावी @ १२ वर्षे

१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष

११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे


४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :

१२. इयत्ता नववी     @१५ वर्षे

१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे

१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे

१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे


ठळक वैशिष्ट्ये :


— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.

महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची. 

दहावी मंडळ रद्द. SSC

एमफिल MPhil देखील बंद असेल.


आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...

 

बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...

आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.


— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.

 *शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...* 


— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच, 

*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,* 

*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर 

*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*


— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...


— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील. 


— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...

 दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...


— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये 

*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय  Administrative* आणि 

*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*

समाविष्ट आहे... 

त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील. 

आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील. 

राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...


*सर्व सरकारी Government,*

*खासगी Private* आणि 

*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*

*Deemed University*

 समान नियम असतील...


— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...


— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...


— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...


— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...


— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...


 — सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..


या नियमानुसार नवीन शैक्षणिक सत्रे सुरू करता येतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा संदेश काळजीपूर्वक वाचावा...



माणूस मरतो म्हणजे काय ?

 माणूस मरतो म्हणजे काय ?



मृत्यु ही सुध्दा एक भौतिक क्रियाच आहे. मनुष्य मरण पावला यालाच त्याचा जीव गेला असे म्हणतात. मग आपल्या शरीरात जीव असतो तरी कोठे ?


सर्वसामान्यपणे असे समजले जाते की मनुष्याचा जीव त्याच्या हृदयात असतो. काहींच्या मते तो मेंदूत असतो. पण जीवशास्त्रीयदृष्ट्या माणसाचा जीव हा शरीरातील कोण्या एका अवयवात केंद्रीत झालेला नसून मनुष्याच्या शरीरात असलेल्या अब्जावधी (एकावर १४ शून्ये किंवा १० लाख अब्ज) पेशींच्या स्वरूपात सर्व शरीरभर पसरलेला असतो. जीवन म्हणजे या सर्व पेशींमध्ये असलेल्या हजारो वेगवेगळया प्रथीनांच्या मार्फत होणार्‍या रासायनिक क्रियांचा परिपाक असतो. या रासायनिक क्रिया होण्यासाठी शरीराबाहेरुन त्या पेशींना प्राणवायु (ऑक्सिजन) आणि ग्लुकोज सारखी रसायने लागतात. हा पुरवठा जोपर्यंत सुरु असतो तोपर्यंत पेशींचे कार्य सुरु असते म्हणजे त्या जिवंत असतात. शरीरात चालणाऱ्या श्वासोच्छवास आणि (हृदयामार्फत) होणारे रक्ताभिसरण यासारख्या प्रक्रियांद्वारे या पेशींना उर्जापुरवठा सुरु असतो.


 ज्यावेळी या दोन गोष्टी (श्वासोच्छ्वास आणि हृदयक्रिया) काही कारणांमुळे बंद पडतात तेव्हा पेशींचे कार्य बंद पडते, त्यांच्यात होणाऱ्या रासायनिक क्रिया थांबतात म्हणजेच त्यांचे जीवन संपते आणि माणसाचा मृत्यू होतो. जसे गाडीतील पेट्रोल संपले की गाडी बंद पडते किंवा समईतील तेल संपले किंवा त्यावर झाकण ठेवून तिला हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला की समई विझते. त्याचप्रमाणे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा संपला की जीवाचा मृत्यू होतो. यात त्या शरीरातून आत्म्यासारखी एखादी शक्ती बाहेर गेली असे होत नाही !

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती



कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


 लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

६०० ते १५०० - ७ सभासद

१५०१ ते ३००० - ९ सभासद

३००१ ते ४५०० - ११ सभासद

४५०१ ते ६००० - १३ सभासद

६००१ ते ७५०० - १५ सभासद

७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद


*#* निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


*#* कार्यकाल - ५ वर्ष


*#* विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


*आरक्षण :*


👉  महिलांना - ५०%

👉  अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

👉  इतर मागासवर्ग - २७% (महिला ५०%)


*ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :*


👉  तो भारताचा नागरिक असावा.

👉  त्याला २१ वर्ष पूर्ण झालेली असावीत.

👉  त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


*ग्रामपंचायतीचे विसर्जन :*


विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.


*सरपंच व उपसरपंच यांची निवड :*


निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.


*सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल :*


५ वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


*राजीनामा :*


👉  सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

👉  उपसरपंच - सरपंचाकडे


*निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :*


सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी १५ दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


*अविश्वासाचा ठराव :*


👉  सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून १ वर्षापर्यंत मांडता येत नाही.


👉  बैठक : एका वर्षात १२ बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

👉  अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

👉  तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

👉  अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

👉  आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.


*ग्रामसेवक / सचिव :*


निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-३ चा.


*कामे :*


👉  ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

👉  ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.

👉  कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

👉  ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

👉  व्हिलेज फंड सांभाळणे.

👉  ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

👉  ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

👉  गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

👉  जन्म-मृत्यूची नोंद करणे.


*ग्रामपंचातीची कामे व विषय :*

कृषी

समाज कल्याण

जलसिंचन

ग्राम संरक्षण

इमारत व दळणवळण

सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

सामान्य प्रशासन


👉  ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निर्मिती करण्यात आली आहे.


👉  बैठक : आर्थिक वर्षात (२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोंबर)


👉  सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.


👉  अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच


👉  ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या १५% सभासद किंवा एकूण १०० व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.


*📑 ग्रामपंचायतींची कार्ये 🗒*

१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.


२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.


३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.


४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.


५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.


६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.


७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.


८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे.


✴️ *आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.* ✴️


👉  गाव नमुना नंबर - १ - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.


👉  गाव नमुना नंबर - १ अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.


👉  गाव नमुना नंबर - १ ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १ क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.


👉  गाव नमुना नंबर - १ ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १ इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - २ - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ३ - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.


👉  गाव नमुना नंबर - ४ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ५ - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ६ - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ६ अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ६ क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ६ ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ७ - (७/१२ उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ७ अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ८ अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ८ ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ९ अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १० - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - ११ - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १२ व १५ - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १३ - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १४ - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १६ - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १७ - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - १८ - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.


👉  गाव नमुना नंबर - १९ - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - २० - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.


👉  गाव नमुना नंबर - २१ - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते. अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.

पुकळेवाडी ग्रामपंचायत निवडणूक -२०२१ बिनविरोध

 🙏🙏 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक पुकळेवाडी सन २०२०🙏🙏🙏

सर्व ग्रामस्थ मंडळी पुकळेवाडी,मुंबईकर , सर्व व्यवसाय, व नोकरीनिमित्त बाहेर असणारे सर्व पुकळेवाडीकर बंधू आणि भगिनींनो दर पाच वर्षांनी येणारी ग्रामपंचायत निवडणूक यावर्षी ही पार पडली.आज ग्रामपंचायत आवेदनपत्रे भरण्याची मुदत ५.३०वाजता संपली आणि आपल्या गावातून ७ जागांसाठी फक्त ७ च आवेदनपत्रे  जमा करण्यात आली.आणि ज्या गावची राजकीयदृष्टीने संवेदनशील अशी तालुक्यात नोंद होती व या गावाची ग्राम पंचायत निवडणूक, खूप संघर्ष , भावकितील वाद जिरवा जिरवी. अशा अनेक बाबतीत आपल्या वर जो कलंक लागला होता तो पुसण्यात आपण सर्वजण  पुकाळेवाडीकर आज यशस्वी झालो, हे आपणा सर्वांचे यश आहे हे यश सर्वांचे आहे.यासाठी पुढाकार घेणारे सर्व व्यक्ती ,ग्रामस्थ , यांचे  आभार  भविष्यात गावातील , गावचा विकास असेल, नवीन योजना असतील, ध्येयधोरणे ठरविणे असेल , एकमेकांची सुख दुःख असतील या सर्वांसाठी आपण असेच एकत्र येऊन आपण काम करणार आहोत या सर्व बाबीसाठी तुमची सर्वांची साथ महत्वाची आहे. आपण एक असेल तर कोणाचीही हिंमत नाही आपल्या पुकळेवाडीला  रोखण्याची ,कोणीही नसेल परका येथे असतील  सर्वजण आपले या सुविचाराने वागूया आणि आपले गाव सुखी समृद्ध करूया एवढीच अपेक्षा 

ग्रामपंचायत पुकळेवाडी

          सदस्य

१) श्री ब्रम्हदेव तुकाराम पुकळे

२) श्री तानाजी भीमराव पुकळे

३) श्री विजय बयाजी पुकळे

४) सौ.सपना महादेव पुकळे

५)सौ.पिनाबाई बाळासाहेब पुकळे

६)सौ.अलका शंकर पुकळे

७)सौ.रंजना महादेव पुकळे

वरील सर्व सदस्य बिनविरोध निवडून दिलेबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...