Thursday, September 24, 2020

केंद्र शासनाचे कामगारविरोधी मालकधार्जिणे धोरण

 केंद्र शासनाचे कामगारविरोधी मालकधार्जिणे धोरण : भगवानराव ढेबे

राष्ट्रीय समाज संघटित असंघटित कामगार फ्रंटची घणाघाती टीका

नवीमुंबई  :  आबासो पुकळे 

शास कामगारविरोधी मालकधार्जिणे धोरण राबवत असल्याची घणाघाती टीका, राष्ट्रीय समाज संघटित असंघटित कामगार फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते भगावानरावजी ढेबे यांनी केली आहे. नवी मुंबई कळंबोली येथे श्री. ढेबे बोलत होते.

श्री. ढेबे पुढे म्हणाले, शेतकरी विरोधी धोरण राबवल्यानंतर बहुमताच्या जोरावर लगेचच कामगार विरोधी धोरण राबवण्याचा सपाटा केंद्र शासनाकडून सुरु आहे. केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा राष्ट्रीय समाज संघटित असंघटित कामगार फ्रंट  जाहीर निषेध करत आहे. दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयींच्या काळात कामगारविरोधी बील आणण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी प्रमुख राजकीय पक्षांनी विरोध केला होता. देशातील कामगारांनी संसदेला घेराव घातला होता. आता मात्र केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर कामगार विरोधी कायदे पारित केले आहेत, त्यास आमचा पूर्णपणे विरोध आहे. किमान वेतनाबाबत केंद्र शासनाने निर्णय घेणे आवश्यक होते, परंतु कायमस्वरूपी कामगारांना कंत्राटी पद्धतीने ठेवण्याची मुभा कंपन्यांना देण्यात आली आहे. लवकरच राज्यातील कामगार संघटना संयुक्तपणे  केंद्रशासनाच्या धोरणा विरुद्ध आंदोलन उभारतील.  संयुक्त कामगार संघटना कृती समिती आंदोलनाची दिशा ठरवेल.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...