Sunday, October 18, 2020

उत्तर प्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ सरकार जातीयवादी

उत्तर प्रदेशात जातीयवादी सरकारकडून हिंदूंचे शोषण : प्रदीपकुमार पाल

रासप बिहार विधानसभा निवडणूक निरीक्षक प्रदीपकुमार पाल



मुंबई / आबासो पुकळे

उत्तर प्रदेशात जातीयवादी सरकारकडून हिंदूंचे शोषण चालू असल्याचा घणाघाती आरोप, रासपचे बिहार विधानसभा निवडणूक निरीक्षक श्री. प्रदीपकुमार पाल यांनी केला आहे. श्री. पाल हे बिहार मधील गया येथून बोलत होते. त्यांनी सोशल माध्यमाद्वारे एक व्हिडिओ जारी केला आहे.

श्री. पाल म्हणतात, जनतेने न्यायासाठी बलिया भूमीवर एकत्र यावे. बलीयाचे आमदार डरपोक असल्याने आरोपिसोबत उभे आहेत. आम्ही प्रामाणिक आहोत, कुणावरही अन्याय करत नाही. संपूर्ण हिंदुस्थानात आमच्या प्रामाणिकतेची नोंद आहे. भाजप कार्यकर्ते धिरेंद्र सिंग याने दुर्जनपुर येथे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या समोर जयप्रकाश पाल यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केल्यानंतर बलियाचे आमदार सुरेंद्र सिंग आरोपीची पाठराखण करत असल्याने'आमच्यावर अन्याय करत असेल तर तुला किडे पडतील, असा संताप आमदार सुरेंद्र सिंग यांच्यावर  व्यक्त केला आहे. 

आम्ही महारानी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज आहे. या देशात अहिल्याबाई होळकरांनी मंदिर निर्माण केली. आम्ही शिवभक्त आहे. आम्ही हिंदू आहोत. हिंदूंना डिवचू नका. कोणत्याही एका जातीला त्रास देऊ नका. कधी ब्राम्हणांना त्रास, कधी जाटोना त्रास, कधी यादवाना त्रास, कधी पालांना त्रास देणारे तुमचे जातीवादी सरकार उत्तर प्रदेशमध्ये चालणार नाही. हिंदूंच्या नावावर आलात आणि हिंदूचेच शोषण करताय, अशा शब्दात उत्तर प्रदेश भाजपचे योगी आदित्यनाथ सरकाला श्री. पाल यांनी सुनावले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...