भारताच्या राजकारणातील महादेव जानकर एक विचार : एस. एल.आक्कीसागर
महाराष्ट्र रासप प्रदेशाध्यक्षपदी आमदार रत्नाकर गुट्टे यांची वर्णी
रासपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न; महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय संघटक निवडी जाहीर
मुंबई : आबासो पुकळे
राष्ट्रीय समाज पक्षाची पाळेमुळे १७ राज्यात रुजवली आहेत, त्यात महाराष्ट्र हा रासपचा गड आहे. महादेव जानकर हे पक्षाची ओळख बनलेली आहे. महादेव जानकर हे आता व्यक्ती राहिली नसून भारताच्या राजकारणात एक विचार बनलेला आहे, असे प्रतिपादन रासप राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी केले.
आज मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीनंतर श्री. अक्कीसागर हे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, के. प्रसन्नकुमार उपस्थित होते.
श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली रासप पक्ष वाटचाल करत आहे, वाढत आहे. पक्षाच्या वर्धापनदिनी कनेक्ट इंडिया- स्वराज रॅली अंतर्गत राष्ट्रातील सर्व महामानवांच्या विचाराने राष्ट्रीय समाजाला जोडू व आमच्या रासपचे देशावर राज्य आणून महादेव जानकर यांना प्रधानमंत्री बनवण्याचे स्वप्न आहे. आज देशात जे काही राजकीय पक्ष आहेत, त्यांच्याशी मैत्री करू, समोरासमोर लढू. उत्तर प्रदेश, बिहार राज्यात रासपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत लढत आहेत. तळागळातून आलेले राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या नेतृत्वात कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात राज्यात रासपचे २० नगरसेवक निवडून आले आहेत. नवनिर्वाचित महाराष्ट्र रासप प्रदेशाध्यक्ष आ. रत्नाकर गुट्टे हे रासपची सामाजिक, राजकीय विचारधारा घेऊन पक्षाचे काम राज्यात वाढवून महाराष्ट्रात रासपचे सरकार आणून मुख्यमंत्री बनवतील, असा विश्वास आहे.
रासप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र विधानसभा गंगाखेड मतदार क्षेत्राचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बाळासाहेब दोडतले यांच्यावर पुनः एकदा महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.राष्ट्रीय संघटकपदी गोविंदराव शूरणार(नांदेड), बाळासाहेब लेंगरे(पालघर), पंडित घोळवे(बारामती) यांच्या निवडी केल्याचे रासप राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी घोषित केले.
No comments:
Post a Comment