Sunday, September 6, 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचा विस्तृतपणे शासनाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करावा : ओबीसी नेते तथा जेष्ठ धनगर समाज नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांची मागणी

 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचा विस्तृतपणे महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करावा.ओबीसी नेते तथा जेष्ठ धनगर समाज नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी


राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड हिंदुस्थानभर लोककल्याणकारी कार्य करून संपूर्ण देशासमोर एक आदर्श ठेवला आहे.काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यत त्यांनी बारवा,घाट,धर्मशाळा,तलाव,पूल तसेच मंदिरांचा निर्माण,जीर्णोद्धार यांसारखे असंख्य लोककल्याणकारी कार्य केली आहेत.

आपल्या महाराष्ट्रातील चौंडी ता.जामखेड या छोट्याशा गावातून इंदोर-मध्यप्रदेश येथे जाऊन,तिथली राणी बनून संपूर्ण देशभर कार्य करणारी महाराणी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना त्यांचा अभिमान असायला हवा असे मत प्रकाश आण्णा शेंडगे यांनी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडले.


अहिल्यादेवींनी सर्व जाती-धर्मासाठी कार्य केले आहे,त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व येणाऱ्या नवीन पिढीला त्यांचा इतिहास वाचून प्रेरणा घेण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.


या भेटीदरम्यान शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,समस्त स्त्री जातीसाठी त्यांचे कार्य आदर्शवत आहे.शिक्षण संचालकांना सांगून याविषयीचे ताबडतोब आदेश देण्यात येतील,याचे त्यांनी ठोस आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...