कवी श्री.बाबासाहेब कोकरे यांचा 'इन्द्रधनु' हा काव्यसंग्रह नावाप्रमाणे भावनांचे सप्तरंग जपणारा आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे 'अतुट प्रीतीचे' असे रंग त्यात आहेत. कधी वेदना, कधी आनंद, कधी निसर्ग सौंदर्य ; अशा अनेकविध छटांचे दर्शन घडविणारे असे हे सप्तरंग आहेत. 'वाट' सारख्या कवितेत जीवनातील खाचखळग्यांचे दर्शन आहे. 'पिकल पान ' मधून वार्धक्याने व उपेक्षेने दुःखी झालेल्या जीवाची कथा - व्यथा आहे. 'माझ बैलं' मधून आपल्या लाडक्या खिल्लारी जोडीचं कौतुक आहे. 'उघड्य नेत्रांनी' सारख्या कवितेतून सामाजिक आशय भेदकपणे व्यक्त झालेला दिसतो. 'धुळदेव गावात ' ही अगदी वेगळी, लोकगीताच्या अंगाने जाणारी कविता कवी श्री. बाबासाहेब कोकरे लिहितात. ' सांबर ' मधून एका देखण्या सांबराचे सुरेख शब्दचित्र साकारले जाते.
' संवेदना आव्हान करणाऱ्या - ' असा रंग सुगंध धुंद होऊन ' निळ्या निळ्या सुंदर डोळ्यांत ' डोळंभर भरला तर...
अशा उत्कट ओळीही बाबासाहेब लिहून जातात. कविता हा बाबासाहेब कोकरे यांचा आनंद आहे. त्या आनंदानेच त्यांचे ' इंद्रधनु ' साकारले आहे. पुढील प्रवासात अनेक सूक्ष्म तरल हुरहुरीचा वेध घेणाऱ्या अधिक समर्थ कविता ते लिहितील अशी आशा आहे. त्यांच्या या कवितासंग्रहाला माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा! '
- प्रा. प्रवीण दवणे ( सुप्रसिद्ध कवी, गीतकार )
छान काम!
ReplyDeleteछानच!शुभेच्छा सर तुम्हाला
ReplyDelete