माणदेशातील प्रसिद्ध मरिमाता देवीची यात्रा कोरोना च्या संकटामुळे रद्द
माणदेशातील प्रसिद्ध असलेल्या आवळाई ता. आटपाडी, जि. सांगली येथील ग्रामदैवत मरिमाता देवीची यात्रा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे. सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या उत्सहाने यात्रेला येत असतात. महालक्ष्मी या नावाने देखील मरीमातेला ओळखले जाते. माणदेशामध्ये आवळाई येथील ग्रामदैवत 'मरिमाता देवीची यात्रा' प्रसिद्ध आहे. सालाबाद प्रमाणे बौद्धपौर्णिमेला म्हणजेच दि. ७ व ८ मे ला मरीमाता देवीची यात्रा पार पणार होती. परंतु राज्यांमध्ये व देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी कलम १४४ लागू करण्यात आल्याने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन आहे.
त्यामुळे दि. ७ मे रोजी होणारी आवळाई येथील मरीमाता देवाची 'यात्रा स्थगित' करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कमिटी आवळाई व ग्रामपंचायत आवळाई यांनी घेतला आहे. शासकीय नियमाप्रमाणे फक्त पुजारी देवीस नैवद्य दाखवणार आहेत. त्यामुळे दि. ७ मे रोजी होणारे यात्रा करण्यात आली आहे, भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत आवळाई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment