राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत
जि. प शाळा पुकळेवाडीचे घवघवीत यश
म्हसवड सेंटरमध्ये विक्रम पुकळे प्रथम, वेदांत पुकळे तृतीय |
🖋️आबासो पुकळे @ ३० एप्रिल २०२०
जानेवरी -२०२० मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा पुकळेवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. म्हसवड सेंटरमध्ये कुकुडवाड केंद्रातुंन ८० विद्यार्थी परिक्षेस बसले होते. जि. प. शाळा पुकळेवाडीचे ३० विद्यार्थी परिक्षेस बसले होते. सात विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा अधिक व एकोणविस मुलांनी १५० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. कुकुडवाड केंद्रात ५० विद्यार्थ्यापैकी ३ विद्यार्थ्यांनी २०० हून अधिक गुण मिळवले. विक्रम पुकळे जिल्हा यादीत ७ व्या तर राज्य यादीत ८ व्या क्रमाकांने उत्तीर्ण झाला आहे. वेदांत पुकळे जिल्हा यादीत ११ व्या तर राज्य यादीत १२ व्या क्रमाकांने उत्तीर्ण झाला आहे.म्हसवड सेंटरमध्ये जिल्ह्य परिषद शाळा पुकळेवाडी मधील विक्रम संजय पुकळे हा विद्यार्थी इयत्ता ४ थी मध्ये २८६ गुण प्राप्त करुन केंद्रात व सेंटरमध्ये प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाला आहे. वेदांत महादेव पुकळे इयत्ता ४ थी २७८ गुण मिळवत केंद्रांत द्वितीय व म्हसवड सेंटर मध्ये तृतीय क्रमाकांने उत्तीर्ण झाला आहे. इयत्ता ३ री मध्ये तनिष्का दादा पुकळे २५६ गुण सेंटरमध्ये ६ वा क्रमांक, प्रणाली किसन पुकळे २४४ गुण, प्रतीक्षा रामचंद्र पुकळे २२० गुण, रणजीत धनाजी पुकळे २०४ गुण, अथर्व आनंदा पुकळे २३२ गुण मिळवून आदि विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. शिक्षक मारुती मोहिते, एस.के सुर्यवंशी, डी. ए कारंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच ब्रम्हदेव पुकळे, तुषार जालींदर पुकळे, शाळा व्यवस्थापन समिती पुकळेवाडी यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment