रासपतर्फे संगोळी रायन्ना राज्याभिषेक- वार्षिकोत्सवाची तपपूर्ति
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करताना महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर, कुमार सुशिल, शंकर सोनळी, धर्मन्ना तोंटापुर, गोविंदराम शुरनार. |
रासपने संगोळी रायन्ना राज्यभिषेकाद्वारे राष्ट्रिय समाजाचा संगम साधला : महादेव जानकर
देशातल्या ७ नद्यांच्या एकत्रित जलकुंभ, विविध भाषिक, धार्मिक, प्रांतातिल नागरिकांद्वारे क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक करुन रासपने राष्ट्रिय समाजाचा राष्ट्रिय संगम साधला, असल्याचे प्रतिपादन रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. दि. २६ जानेवारी २०२० रोजी नंदगड ता- खानापुर जि- बेळगावी येथे कर्नाटक राज्य रासपतर्फे क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक- वार्षिकोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी संगोळी रायन्ना समाधीस्थळी श्री. जानकर यांनी वरील उदगार काढले.
श्री. जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रिय समाज पक्षाला भाषिक, प्रांत, जात, धर्माचे राजकारण करुन राष्ट्रिय समाजात भेद घड़वायचा नसून राष्ट्रिय समाजाचा राष्ट्रिय संगम घडवून बलशाली भारत राष्ट्र बनवायचे आहे. रासपला प्रादेशिक राजकारण करायचे नसून राष्ट्रीय राजकारण करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवन्यासाठी परकियाविरुद्ध लढताना संगोळी रायन्नास साथीदारासह शहीद व्हावे लागले. कालांतराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु ते स्वातंत्र्य संगोळी रायन्ना पाहू शकले नाहीत. देशाच्या स्वतंत्र्यानंतरही ज्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळाले नाही, अशा सत्ताहीन लोकांच्या हाती, रासपला सत्ता मिळवून देयची आहे. कर्नाटक- महाराष्ट्र किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रांतवादाचे राजकारण रासप करनार नाही. जर प्रांतवादाचे राजकारण करुन रासपच्या कर्यक्रमास अडथळा निर्माण होत असेल तर कर्नाटक- महाराष्ट्र राज्याचे केरळ राज्यात विलीन करा, अशी रासप मागणी करेल, असा सूचकवजा इशारा दिला.
सकाळी सव्वा आठ वाजता रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याहस्ते रासपतर्फे रायापुर नंदगड येथील चौकात असणार्या संगोळी रायन्ना पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. व भारतीय झेंड्यास ध्वजवंदना देऊन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला. पुढे, क्रांतिवीर संगोळी रायन्ना व राणी चेन्नमा यांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका साकारणारी लघु नाटिका शालेय बालकांनी सादर केली. या बालकलाकारांचे कौतुक करत राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी रोख रक्कमेच बक्षिस दिले. पुढे रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासप राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशिल, राष्ट्रीय महासचिव प्रसन्नकुमार, कर्नाटक रासप संयोजक धर्मन्ना तोंटापुर, आंध्रप्रदेश- तेलंगना राज्य प्रभारी गोविंदराम शुरनार, क्रांतिवीर संगोळी रायन्ना समधीस्थळ स्मारक समिती नंदगडचे अध्यक्ष शंकर सोनोळी, पत्रकार सुरेश दलाल, कर्नाटक राज्य कुरबा महासंघाचे प्रदेशउपाध्यक्ष रवि कित्तुर, रासप बेळगांव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजारी, विजयपुर जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे , कर्नाटक रासप युवा आघाडीचे सरचिटणीस अनिल पुजारी व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संगोळी रायण्णा दफनभूमि स्माधिस्थळी अभिवादन केले. पुजारी श्रीमती चव्हाण यांनी माजी मंत्री राष्ट्रनायक महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर सहीत अन्य मान्यवरांना संगोळी रायन्ना स्माधिस्थळी असणारा भंडारा ललाटी लावला तर गळ्यात पुष्पमाला अर्पण केली. समाधिस्थळी 'क्रांतिवीर संगोळी रायन्ना'च्या जय जयकार करणाऱ्या गगनभेदी घोषणा दिल्या. नंदगड वासियांची भेट घेऊन राष्ट्रनायक महादेव जानकर पुढे ९ : ०० वाजता महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले.
रासप राष्ट्रिय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर यांनी देशभरातून आलेल्या संगोळी रायण्णाप्रेमी रासप मावळ्यांना मार्गदर्शन केले. रासप अयोजित संगोळी रायन्ना राज्याभिषेक- वर्षिकोत्सवाची माहिती सांगितली. रासप पदाधिकारी/ कार्यकर्ते यांनी संगोळी रायन्ना फाशी स्थळी जाऊन अभिवादन केले.
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळाकड़े जाताना महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर, शंकर सोनळी, पत्रकार सुरेश दलाल, प्रसन्नकुमार, कुमार सुशिल, गोविन्द शिंदे |
रासप संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिनांक २५ जानेवारीस रात्रीचा मुक्काम क्रांतिवीर संगोळी रायन्ना फाशी स्थळाच्या ठिकाणी करुन सकाळी प्रजासत्ताक दिनी ठीक ८ : १५ वाजता ध्वजारोहण केले. २५ जानेवारीस कर्नाटक रासप आयोजीत क्रांतिवीर संगोळी रायण्णा राज्याभिषेक कार्यक्रमाचे पत्र कर्नाटक प्रशासनास देण्यासाठी गेलेल्या धर्मन्ना तोंटापुर व रासपचे ज्येष्ठ नेते गोविंदराम शुरनार यांना कर्नाटक पोलिसांनी नजरकैद केले होते. तसेच महाराष्ट्रात मंत्रिपद भुषवलेल्या रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना कर्नाटकात कार्यक्रम घेता येणार नसल्याबाबतचे नोटिस काढले होते. रासपचे राष्ट्रिय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर हे कर्नाटकचे सुपुत्र असून कोणत्याही परिस्थितीत रासप संगोळी रायन्ना राज्यभिषेक- वार्षिकोत्सव करणारच असा त्यांनी निर्धार केला होता. श्री. अक्किसागर हे स्वतः रासपचे राष्ट्रिय महासचिव श्री. कुमार सुशिल व श्री. प्रसन्नकुमार समवेत कर्नाटक राज्यात दाखल होताच, पुढे कर्नाटक शासन व प्रशासनाने रासपच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन महादेव जानकर व रासपला सहकार्य केले. तसेच कार्यक्रमस्थळी पोलीस यंत्रणाही कार्यन्वित केली. नंदगड़ ग्रामवासियांकडून रासप गत १३ वर्षापासून संगोळी रायन्नास अभिवादन करत आहे, असे खानापुर पोलिस प्रशासनास कळवले होते. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपने राष्ट्रिय समाज बांधवाना सोबत घेऊन क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक- वार्षिकोत्सव उत्सहात पार पाडला.
राज्याभिषेक- वर्षिकोत्सवात राष्ट्रिय समाज पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष किशोर राव, उत्तर कर्नाटक रासप उपाध्यक्ष प्रवीणकुमार पदमगोंड, सौ. सुमंगल वालीकर(विजयपुर), आबासो पुकळे(मुंबई), सुरेश दलाल, ब्रिजेश गोरे(गंगाखेड), समाजसेवक सत्यप्पा गुरिकार(बेंगलोर), देवराज कांबळी (धारवाड़), प्रा. सुनील तोंटापुर, कोल्हापूर महिला अघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती पाटील, सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील, भूषण काळगी, अखिल नगारजी, सुरेश कचरे (सांगोला), जीवाजी लेंगरे व अन्य रासपा पदाधिकारी/ कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याभिषेक- वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला.
नंदगड/ बेळगावी : आबासो पुकळे
क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक वार्षिकोत्सव तपपूर्ति क्षणचित्रे
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करताना महादेव जानकर बाजूस एस. एल. अक्किसागर. |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करताना एस. एल. अक्किसागर समवेत महादेव जानकर. |
![]() |
संगोळी रायन्ना पुतळा येथे संगोळी रायन्ना, रानी चेनम्मा ची भूमिका साकरणाऱ्या बालकांना जिलेबीचा घास देताना महादेव जानकर आदि. |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळ - प्रवेशद्वार येथे उत्तर कर्नाटक रासप उपाध्यक्ष प्रवीण पदमगोंड यांच्यासमवेत हास्यमुद्रेत एस. एल. अक्किसागर. |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी नंदगड येथील रासप हितचिंतक श्री. डवरी यांच्या कन्या व राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी दिव्यांग महिला सुमंगला वालीकर यांची अपुलकिने भेट घेताना एस. एल. अक्किसागर |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी सौ. चव्हाण यांचे म्हणजे माय माउलीचे पदस्पर्श करुन आशीर्वाद घेताना राष्ट्रनायक महादेव जानकर. |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी एस. एल. अक्किसागर समवेत कोल्हापूर रासप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा भारती पाटिल, बेळगाव जिहाध्यक्ष हनुमंत पुजारी, अथनी तालुकाध्यक्ष श्री. चौगुले. |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी अशोक स्तंभाजवळ एस. एल. अक्किसागर, प्रसन्नकुमार, गोविंदराम शुरनार, पुजारी गोविंद चव्हाण, गोवा प्रदेशाध्यक्ष किशोर राव, बेळगांव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजारी, सत्यप्पा गुरिकर. |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी सुरेश कचरे (सांगोला), अजित पाटिल, अखिल नगारजी, भूषण काळगी, आबासो पुकळे. |
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळी महादेव जानकर समवेत रासप हितचिंतक सत्यप्पा गुरिकर (बेंगलोर) बाजूस एस. एल. अक्किसागर, श्री. प्रसन्नाकुमार, अनिल पुजारी. |
![]() |
संगोळी रायन्ना फाशीस्थळी अभिवादन करताना कर्नाटक राज्य रासप पदाधिकारी धर्मन्ना तोंटापुर, अनिल पुजारी, गोविन्द शिंदे, राघु सुळे, प्रवीणकुमार पदमगोंड, रवि कित्तुर प्रा. सुनिल तोंटापुर.
|
![]() |
संगोळी रायन्ना समाधीस्थळ येथे राज्यभिषेकपूर्वी मंचकाच्या ठिकाणी पोलिसांशी संवाद साधताना महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर |
![]() |
संगोळी रायन्ना चौकात महादेव जानकर, महिला पोलिस आधिकारी, एस. एल. अक्किसागर, हनुमंत पुजारी, प्रसन्नकुमार, शंकर सोनळी, गोविंद शुरनार. |
![]() |
कर्नाटक राज्यात महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर, कुमार सुशिल, धर्मन्ना तोंटापुर, गोविंद शिंदे, जीवाजी लेंगरे, रवि कित्तुर, सुनील तोंटापुर. |
![]() |
पहिल्या संगोळी रायन्ना राज्यभिषेकाचे मानकरी नंदगडचे रहिवशी श्री. नागनाथ डवरी यांच्या कुटुंबियासमवेत दुकानासमोर एस. एल. अक्किसागर. |
'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.
ReplyDelete