Saturday, February 15, 2020

पाल सेवा संघ स्नेहसमेलन -२०२०

पशुपालक समाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करावी : श्री. अक्किसागर

नालासोपारा जि- पालघर येथे पाल सेवा संघाच्या  स्नेहसमेलनात बोलताना एस. एल. अक्किसागर.
पशुपालक समाज हा भारताचा नव्हे तर विश्वाचा पालक आहे. पशुपालक समाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करावी, असे प्रतिपादन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर यांनी नालासोपरा येथे केले. दि. २ फेब्रुवारीस पाल सेवा संघाने आयोजित केलेल्या विशाल पाल- गडरिया- धनगर- रबारी स्नेहसमेलनात। श्री. अक्किसागर बोलत होते.


श्री. अक्किसागर पुढे म्हणाले, यापूर्वी दोन वेळा पाल सेवा संघाच्या कार्यक्रमाला आलो आहे. तब्येत ठीक नसतानाही ईश्वर  देवपाल सर यांच्या फोनमुळे येथे आलो आहे. यापूर्वी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा केला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील लोक दबंग तर पूर्वांचल मधील लोक ज्ञानी आहेत, असे मी जाणतो. आजच्या कार्यक्रमाला पूर्वांचलमधील लोक जास्त संख्येने आहेत. मी कर्नाटकचा पुत्र आहे. जन्म जबलपुर मध्यप्रदेशातील आहे. कर्मभूमी महाराष्ट्र आहे. मी राष्ट्रिय समाजाचा आहे. पाल- गडरिया- धनगर- कुरबा- देवासी-भरवाड़- बकरवाल- गड्डी-रबारी समाज कन्याकुमारीपासून ते काश्मीर पर्यंत आणि कच्छ पासून बंगल पर्यंत आहे. पूर्ण भारतात आहे.  पाल समाज हा पाल नसून भुपालक आहे. केवळ भारताचा नव्हे तर विश्वाचा भुपालक आहे. चंद्रगुप्त मौर्य पहिला सम्राट होता.  संघटन सर्वात मोठे आहे. पाल सेवा संघ सर्वात मोठा संघ आहे. पाल सेवा संघ मातृ संघटना आहे. सन - १९९४ पासून समाज कार्यात कार्यरत आहे. पाल-कुरबा- गड़रिया-धनगर संमेलन घेतले होते. संसद भवन मध्ये मोठी ताकद आहे.  

आज आयएस अधिकारी स्व. दशरथ पाल यांच्या पत्नीचा सन्मान केला, ही गौरवाची गोष्ट आहे. आम्ही महादेव जानकर यांच्या नेतृत्वात यशवंत सेनेने आयएएस, आयपीएस, एमएलए/ एमएलसी शोधयात्रा काढली होती. त्यावेळी लोक विचारायचे, आयएएस काय आहे? दिल्लीची सत्ता मिळाली पाहिजे. भारत देशातील पशुपालक समाजाने एक पक्ष, एक नेता, एक झेंडा घेऊन एकत्र यावे व दिल्लीची सत्ता हस्तगत करावी. राजस्थानात ऊंट पाळनारा, गुजरातमध्ये गुरे पाळनारा समाज हा  पशुपालक समाज आहे.
स्नेहसमेलनात समाजवादी पार्टी लोहियावाहिनीचे राष्ट्रिय अध्यक्ष राकेश पाल, भाजपचे ब्रम्ह प्रकाश पाल, आगरा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पै. पूजा बघेल, रामधारी पाल, प्रदीप कुमार पाल, जीवाजी लेंगरे, भीमराव लवटे, स्वप्निल ठवरे, कवयित्री संगीता पाल, दादरा नगर हवेलीचे रामभाई पाल आदि उपस्थित होते.
- आबासो पुकळे

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...