नुकताच भारतीय प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा झाला. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारत देश प्रजासत्ताक बनला नव्हता, तो २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी सेनानी 'क्रांतिवीर संगोळी रायण्णा नायक' यांचा शहीद दिन एकाचदिवशी येतो. स्वराज्यातील जनतेला छळणाऱ्या कुलकर्णी व परकीय ब्रिटिश अशा दोहाविरुद्ध 'संगोळी रायण्णा'स लढा द्यावा लागला. भारताच्या भूमिवर ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आदी परकीय सत्तानी राज्य केले. परकियांच्या हातून देश स्वतंत्र झाला. परंतु भारतीय जनतेला स्वातंत्र्य मिळाले नाही. ब्रिटिशांची सत्ता जाऊन भारतातील ठराविक मुठभर लोकांच्या हाती सत्ता हस्तातंरित झाली. आजही काही घराण्यांच्या हाती सत्ता एकवटलेली आहे.
आजही लोकांना न्याय, हक्क मिळवण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारावे लागते. बहुसंख्याक भारतीयांना उपेक्षित जीवन जगावे लागते. प्रसंगी सत्ताधारी राज्यकर्त्याशी संघर्ष करवा लागतो. भारतात सध्या सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परांपरागत उपजीवेकेच्या साधनाला, आधुनिकतेची जोड़ देता न आल्याने, देशातील मूलनिवासी भारतीय समाजाला व त्यांच्या व्यवसायालाही उतरती कळा लागली आहे. शासकीय नोकरीची आस बाळगणाऱ्या, युवक- युवतींच्या स्वप्नांचा चुराडा होऊन, युवाशक्तिचा सत्यानाश करणारे धोरण व्यवस्था आखत व राबवत आहे. भारत देशात सर्वच क्षेत्रात विषमतेचा ग्राफ कमी होण्याऐवजी तो वाढतच चाललाय. नवा विचार मांडून परिवर्तनाचा, मानवतेचा लढा लढत आहे. एकीकडे समाजमाध्यमातुन रोज नवनवे विषय उकरुन काढले जात आहेत. त्यातून भारतीय जनतेचे लक्ष विचलित करुन भारतीय जनतेला उल्लू बनवनारी यंत्रणा दिवस रात्र कार्यरत आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत पर्यटनासाठी नुकतीच आता नाईट लाईफ सुरु झाल्याच्या बातम्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वारेमाफ प्रसिद्धि देऊन प्रसारित केल्या जात आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनतेला स्वतंत्र भारतातील जात, धर्म, प्रांत, भाषा भेद मोडून राष्ट्रीय समाजाला एकत्र करणाऱ्या, गेली सलग १३ वर्षापासून कर्नाटक राज्यात जाऊन संगोळी रायण्णा राज्यभिषेकाकडे प्रगत भारतीय माध्यमांचे लक्ष जात नाही.
भारतभूमित राहणाऱ्या भारतीय जनतेला स्वातंत्र्य मिळावे यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सेनानिनी प्राणाचे बलिदान दिले आहे. जनकार्याला, देशकार्याला वाहुन घेतले. थोर क्रंतिकारकांच्या त्यागातून भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवली. मात्र स्वतंत्र भारतात अनेक क्रातिकारकांची उपेक्षा झाली म्हणा किवा जणीवपूर्वक उपेक्षित ठेवले गेले. क्रांतिविर संगोळी रायण्णा नायक हे त्यातीलच एक नाव.
रासपने सन- २००८ साली समाजसंगम राष्ट्रसंगम राजयात्रेद्वारे जाती ही राष्ट्र, देव ही राष्ट्र, धर्म ही राष्ट्र, प्रांत ही राष्ट्र, भाषा ही राष्ट्र संकल्पना भारतीय जनतेसमोर मांडली. जाती-धर्म- भाषा जोड़ो, राष्ट्रिय समाज बनकर राज्य करो ! चा संदेश देशातल्या १६ लोकसभा मतदारसंघात व कर्नाटक राज्यात पोहचवला. तेव्हापासून नियमितपने हा संदेश रासप संगोळी रायण्णा राज्यभिषेक- वार्षिकोत्सव दरवर्षी साजरा करुन देशातल्या उर्वरित भूभागात पोहचवन्याचा प्रयत्नात असतो. क्रांतिवीर संगोळी रायण्णा समाधिस्थळी राज्याभिषेक करुन नव भारत राष्ट्राचा पाया घात 'संगोळी रायण्णा'च्या बलिदानाचे स्मरण करुन दरवर्षी वार्षिकोत्सव साजरा केला जात आहे. याही वर्षी २६ जानेवारी २०२० ला क्रांतिवीर संगोळी रायण्णा राज्यभिषेकचे एक तप पूर्ण झाले. संगोळी रायण्णा राज्याभिषेकाची सुरवात ते एक तप हा मधला प्रवास खुप व्यापक आहे. यावर्षिचा राज्यभिषेक वार्षिकोत्सव साजरा करताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाराष्ट्र- कर्नाटक सिमवादाची त्याला किनार होती. अशा परिस्थितीत भाषा, प्रांत, जात, धर्म भेद मोडित काढताना देशभरातल्या विविध भाषिक, प्रांत, जाती, धर्माच्या लोकांना संगोळी रायन्ना राज्यभिषेक कार्यक्रमातुन जोडून राष्ट्रिय जोडला गेला.
- आबासो पुकळे
मुंबई, दि. ७ फेब्रुवारी २०२०
राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.
ReplyDelete