Saturday, February 15, 2020

दहीवड़ी एस टी आगार ढीसाळ कारभार

वाहतुक नियंत्रक विना दहीवड़ी एस टी आगाराचा कारभार 



विना नाव फित असलेल्या वाहतुक नियंत्रकाची प्रवश्यासोबत आरेरावी


माण तालुक्यासाठी एस टी विभागाचे दहीवड़ी आगार आहे. पण या आगाराचा कारभार नियंत्रकाच्या अरेराविमुळे चांगलाच चर्चेला अलाय.  माण तालुक्यातील जनतेला नेहमीच दुष्काळामुळे विस्थापित जीवन जगावे लागते. तालुक्यात वाहतुकीच्या सुविधांची वानवा आहे. अशातच दहीवड़ी आगाराचा कारभार रामभरोसे आहे. याचा प्रत्यय रोजच प्रवाशांना येत असतो. (दि.९  रोजी) तालुक्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कुकुडवाड येथे जाण्यासाठी काही प्रवाशी ४ : ०० वाजले पासून आगारात एस टी  बसची वाट पाहत थाबंले होते. बसच्या वेळेबाबत वाहतुक नियंत्रक केबिनकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना धक्कादायक अनुभव आला. तेथे वाहतुक नियंत्रकच नव्हता. वाहतुक नियंत्रक कार्यालयात असणारे इतर कर्मचारिच प्रवाशांना माहीती देत होते. 
दहीवड़ी आगारात वाहतुक नियंत्रकाशिवय केबिनमध्ये असलेली मोकळी खुर्ची.

सव्वा पाच वाजता कुकुडवाड ला बसची चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशाला ५ : ३० वाजता बस आहे असे सांगितले. पुढे सव्वा सहा वाजता शिरवलीहुन आलेली एक बस विरळी येथे जाण्यासाठी बस फलाटात येऊन थांबली. परंतु ही बस पाऊने सात वाजता सुटेल असे वाहकाने सांगितले. यावर प्रवशात संताप सुरु झाल्यावर काही प्रवाशी वाहतुक नियंत्रकाच्या केबिनमध्ये चौकशी करण्यासाठी गेले असता  रिकाम्या खुर्चीशिवाय दूसरे कोणीही नव्हते. दरम्यान, वाहतुक नियंत्रकाच्या  केबिनसमोर प्रवाशांची चौकशीसाठी  वाढलेली गर्दी पाहुन नावाची फित न लावता काम करणारे वाहतुक नियंत्रक बाहेरुन धावत येऊन प्रवशासोबत अरेरावी करू लागले. प्रवशांनी उशिरा बस सोडण्याचे कारण विचारले असता, वाहतुक नियंत्रक म्हणाले, इंजबाव अशी पाटी लावलेली बस ५ वाजता मानेवाडीला गेली आहे. मी स्वतः इंजबावची पाटी काढून मानेवाड़ी पाटी लावली आहे. हवे तर तुम्ही सीसी टीव्ही पहा. 

 इतकेच काय केबिनमध्ये खुर्चीचा ताबा घेयचा सोडून वाहतुक नियंत्रक प्रवशासमोरच चालक व वाहकावर अरेरावी करत होते. वाहतुक नियंत्रक विभागाच्या ढीसाळ कारभाराने अचानकपने बसच्या फेऱ्या रदद् करायच्या व प्रवाशांची गैरसोय करायची. असले रोजच प्रकार दहीवड़ी आगारात होत असल्याची चर्चा प्रवशांमध्ये होती.  पुढे विरळी मुक्कामी असणारी बस सायंकाळी सव्वा सहा वाजता सुटण्याऐवजी पाऊने सात वाजता सुटली.  वाट पहिन पण एस टी बसनेच जाणाऱ्या प्रवाशांना दहीवड़ी आगरात चांगल्या कर्तबगार वाहतुक नियंत्रकाची गरज आहे. अन्यथा नियोजन शून्य करभारमुळे एस टी ऐवजी प्रवाशांना दूसरा पर्याय शोधावा लागेल.  दहीवड़ी आगरात कोणत्या फलाट क्रमांकावर कोणत्या बस लागतात हेही प्रवाशाना सहजपणे कळत नाही. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या गैरसोईलाही सामोरे जावे लागत आहे.
- आबासो पुकळे



फ्रंट पेज न्यूज
वाहतुक नियंत्रकाविना दहीवड़ी एस टी आगाराचा ढिसाळ कारभार
http://www.frontpage.ind.in/sharenews.aspx?q=216694&u=70739

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...