Sunday, February 16, 2020

Chinchni Maykkadevi yatra 2020

खेळीमेळीच्या वातावरणात चिंचणी मायक्कादेवी यात्रा उत्साहात पार


महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील  भक्तांचे दैवत कुलस्वामिनी आई मायक्कादेवीच्या दर्शनासाठी लाखो भक्त चिंचणी ता-रायबाग जि-बेळगाव येथे दाखल झाले होते. कुडची येथे कृष्णा नदित पवित्र स्नान करुन भक्तानि कचोळीचे पूजन केले. पुढे आई मायक्कादेवीच्या दर्शनाला लाखो भक्त बस, बैलगाड़ी, ट्रक, टेंपो, जीप, ट्रेवेल्स आदि मिळेल त्या वाहनाने चिंचणीत दाखल होत होते. चंद्रोदयानंतर भक्तानी हल्याळ (दूध नळी) नदीत पवित्र स्नान करुन देवीच्या बोन्याची तयारी केली. दि. १२ व १३ रोजी बोन्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ति भावाने पार पडला. यात्रा काळात कर्नाटक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी देवीची पालखी छबिन्यासह वाजत गाजत प्रमुख ठिकानावरून निघाली. पालखीवर भक्तानी खोबरे,भंडारा उधळत 'माखुबाईच्या नावनं चांगभल' असा जोराचा गजर केला. खेळीमेळीच्या वातावरणात चिंचणी मायक्कादेवी यात्रा उत्साहात पार पडली. यात्रा काळात चिंचनीचा परिसर पिवळ्या भंडाऱ्याने माखला तर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला.
- आबासो पुकळे

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...