Sunday, February 16, 2020

Chinchni Maykkadevi yatra 2020

खेळीमेळीच्या वातावरणात चिंचणी मायक्कादेवी यात्रा उत्साहात पार


महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील  भक्तांचे दैवत कुलस्वामिनी आई मायक्कादेवीच्या दर्शनासाठी लाखो भक्त चिंचणी ता-रायबाग जि-बेळगाव येथे दाखल झाले होते. कुडची येथे कृष्णा नदित पवित्र स्नान करुन भक्तानि कचोळीचे पूजन केले. पुढे आई मायक्कादेवीच्या दर्शनाला लाखो भक्त बस, बैलगाड़ी, ट्रक, टेंपो, जीप, ट्रेवेल्स आदि मिळेल त्या वाहनाने चिंचणीत दाखल होत होते. चंद्रोदयानंतर भक्तानी हल्याळ (दूध नळी) नदीत पवित्र स्नान करुन देवीच्या बोन्याची तयारी केली. दि. १२ व १३ रोजी बोन्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ति भावाने पार पडला. यात्रा काळात कर्नाटक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी देवीची पालखी छबिन्यासह वाजत गाजत प्रमुख ठिकानावरून निघाली. पालखीवर भक्तानी खोबरे,भंडारा उधळत 'माखुबाईच्या नावनं चांगभल' असा जोराचा गजर केला. खेळीमेळीच्या वातावरणात चिंचणी मायक्कादेवी यात्रा उत्साहात पार पडली. यात्रा काळात चिंचनीचा परिसर पिवळ्या भंडाऱ्याने माखला तर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला.
- आबासो पुकळे

संगोळी रायन्ना राज्यभिषेक- वार्षिकोत्सव तपपूर्ति



नुकताच भारतीय प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा झाला. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारत देश प्रजासत्ताक बनला नव्हता, तो २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी सेनानी  'क्रांतिवीर संगोळी रायण्णा नायक' यांचा शहीद दिन एकाचदिवशी येतो. स्वराज्यातील जनतेला छळणाऱ्या कुलकर्णी व परकीय ब्रिटिश अशा दोहाविरुद्ध 'संगोळी रायण्णा'स लढा द्यावा लागला.  भारताच्या भूमिवर  ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आदी परकीय सत्तानी राज्य केले. परकियांच्या हातून देश स्वतंत्र झाला. परंतु भारतीय जनतेला स्वातंत्र्य मिळाले नाही. ब्रिटिशांची सत्ता जाऊन भारतातील ठराविक मुठभर लोकांच्या हाती सत्ता हस्तातंरित झाली. आजही काही घराण्यांच्या हाती सत्ता एकवटलेली आहे.

आजही लोकांना न्याय, हक्क मिळवण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारावे लागते. बहुसंख्याक भारतीयांना उपेक्षित जीवन जगावे लागते. प्रसंगी सत्ताधारी राज्यकर्त्याशी संघर्ष करवा लागतो. भारतात सध्या सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परांपरागत उपजीवेकेच्या साधनाला, आधुनिकतेची जोड़ देता न आल्याने, देशातील मूलनिवासी भारतीय समाजाला व त्यांच्या व्यवसायालाही उतरती कळा लागली आहे. शासकीय नोकरीची आस बाळगणाऱ्या, युवक- युवतींच्या स्वप्नांचा चुराडा होऊन, युवाशक्तिचा सत्यानाश करणारे धोरण व्यवस्था आखत व राबवत आहे. भारत देशात सर्वच क्षेत्रात विषमतेचा ग्राफ कमी होण्याऐवजी तो वाढतच चाललाय. नवा विचार मांडून परिवर्तनाचा, मानवतेचा लढा लढत आहे. एकीकडे समाजमाध्यमातुन रोज नवनवे विषय उकरुन काढले जात आहेत. त्यातून भारतीय जनतेचे लक्ष विचलित करुन भारतीय जनतेला उल्लू बनवनारी यंत्रणा दिवस रात्र कार्यरत आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत पर्यटनासाठी नुकतीच आता नाईट लाईफ सुरु झाल्याच्या बातम्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वारेमाफ प्रसिद्धि देऊन प्रसारित केल्या जात आहेत.  तर दुसरीकडे भारतीय जनतेला स्वतंत्र भारतातील जात, धर्म, प्रांत, भाषा भेद मोडून राष्ट्रीय समाजाला एकत्र करणाऱ्या, गेली सलग १३ वर्षापासून कर्नाटक राज्यात जाऊन संगोळी रायण्णा राज्यभिषेकाकडे प्रगत भारतीय माध्यमांचे लक्ष जात नाही. 

भारतभूमित राहणाऱ्या भारतीय जनतेला स्वातंत्र्य मिळावे यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सेनानिनी प्राणाचे बलिदान दिले आहे. जनकार्याला, देशकार्याला वाहुन घेतले.  थोर क्रंतिकारकांच्या त्यागातून भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवली. मात्र स्वतंत्र भारतात अनेक क्रातिकारकांची उपेक्षा झाली म्हणा किवा जणीवपूर्वक उपेक्षित ठेवले गेले. क्रांतिविर संगोळी रायण्णा नायक हे त्यातीलच एक नाव. 

 रासपने सन- २००८ साली  समाजसंगम राष्ट्रसंगम राजयात्रेद्वारे जाती ही राष्ट्र, देव ही राष्ट्र, धर्म ही राष्ट्र, प्रांत ही राष्ट्र, भाषा ही राष्ट्र संकल्पना भारतीय जनतेसमोर मांडली. जाती-धर्म- भाषा जोड़ो, राष्ट्रिय समाज बनकर राज्य करो  ! चा संदेश देशातल्या १६ लोकसभा मतदारसंघात व कर्नाटक राज्यात पोहचवला. तेव्हापासून नियमितपने हा संदेश रासप संगोळी रायण्णा राज्यभिषेक- वार्षिकोत्सव दरवर्षी साजरा करुन देशातल्या उर्वरित भूभागात पोहचवन्याचा प्रयत्नात असतो.  क्रांतिवीर संगोळी रायण्णा समाधिस्थळी राज्याभिषेक करुन नव भारत राष्ट्राचा पाया घात 'संगोळी रायण्णा'च्या बलिदानाचे स्मरण करुन दरवर्षी वार्षिकोत्सव साजरा केला जात आहे. याही वर्षी २६ जानेवारी २०२० ला  क्रांतिवीर संगोळी रायण्णा राज्यभिषेकचे एक तप पूर्ण झाले. संगोळी रायण्णा राज्याभिषेकाची सुरवात ते एक तप हा मधला प्रवास खुप व्यापक आहे. यावर्षिचा राज्यभिषेक वार्षिकोत्सव साजरा करताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाराष्ट्र- कर्नाटक सिमवादाची त्याला किनार होती. अशा परिस्थितीत भाषा, प्रांत, जात, धर्म भेद मोडित काढताना देशभरातल्या विविध भाषिक, प्रांत, जाती, धर्माच्या लोकांना संगोळी रायन्ना राज्यभिषेक कार्यक्रमातुन जोडून राष्ट्रिय जोडला गेला.
- आबासो पुकळे
  मुंबई, दि. ७ फेब्रुवारी २०२०

Saturday, February 15, 2020

पाल सेवा संघ स्नेहसमेलन -२०२०

पशुपालक समाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करावी : श्री. अक्किसागर

नालासोपारा जि- पालघर येथे पाल सेवा संघाच्या  स्नेहसमेलनात बोलताना एस. एल. अक्किसागर.
पशुपालक समाज हा भारताचा नव्हे तर विश्वाचा पालक आहे. पशुपालक समाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करावी, असे प्रतिपादन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर यांनी नालासोपरा येथे केले. दि. २ फेब्रुवारीस पाल सेवा संघाने आयोजित केलेल्या विशाल पाल- गडरिया- धनगर- रबारी स्नेहसमेलनात। श्री. अक्किसागर बोलत होते.


श्री. अक्किसागर पुढे म्हणाले, यापूर्वी दोन वेळा पाल सेवा संघाच्या कार्यक्रमाला आलो आहे. तब्येत ठीक नसतानाही ईश्वर  देवपाल सर यांच्या फोनमुळे येथे आलो आहे. यापूर्वी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा केला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील लोक दबंग तर पूर्वांचल मधील लोक ज्ञानी आहेत, असे मी जाणतो. आजच्या कार्यक्रमाला पूर्वांचलमधील लोक जास्त संख्येने आहेत. मी कर्नाटकचा पुत्र आहे. जन्म जबलपुर मध्यप्रदेशातील आहे. कर्मभूमी महाराष्ट्र आहे. मी राष्ट्रिय समाजाचा आहे. पाल- गडरिया- धनगर- कुरबा- देवासी-भरवाड़- बकरवाल- गड्डी-रबारी समाज कन्याकुमारीपासून ते काश्मीर पर्यंत आणि कच्छ पासून बंगल पर्यंत आहे. पूर्ण भारतात आहे.  पाल समाज हा पाल नसून भुपालक आहे. केवळ भारताचा नव्हे तर विश्वाचा भुपालक आहे. चंद्रगुप्त मौर्य पहिला सम्राट होता.  संघटन सर्वात मोठे आहे. पाल सेवा संघ सर्वात मोठा संघ आहे. पाल सेवा संघ मातृ संघटना आहे. सन - १९९४ पासून समाज कार्यात कार्यरत आहे. पाल-कुरबा- गड़रिया-धनगर संमेलन घेतले होते. संसद भवन मध्ये मोठी ताकद आहे.  

आज आयएस अधिकारी स्व. दशरथ पाल यांच्या पत्नीचा सन्मान केला, ही गौरवाची गोष्ट आहे. आम्ही महादेव जानकर यांच्या नेतृत्वात यशवंत सेनेने आयएएस, आयपीएस, एमएलए/ एमएलसी शोधयात्रा काढली होती. त्यावेळी लोक विचारायचे, आयएएस काय आहे? दिल्लीची सत्ता मिळाली पाहिजे. भारत देशातील पशुपालक समाजाने एक पक्ष, एक नेता, एक झेंडा घेऊन एकत्र यावे व दिल्लीची सत्ता हस्तगत करावी. राजस्थानात ऊंट पाळनारा, गुजरातमध्ये गुरे पाळनारा समाज हा  पशुपालक समाज आहे.
स्नेहसमेलनात समाजवादी पार्टी लोहियावाहिनीचे राष्ट्रिय अध्यक्ष राकेश पाल, भाजपचे ब्रम्ह प्रकाश पाल, आगरा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पै. पूजा बघेल, रामधारी पाल, प्रदीप कुमार पाल, जीवाजी लेंगरे, भीमराव लवटे, स्वप्निल ठवरे, कवयित्री संगीता पाल, दादरा नगर हवेलीचे रामभाई पाल आदि उपस्थित होते.
- आबासो पुकळे

दहीवड़ी एस टी आगार ढीसाळ कारभार

वाहतुक नियंत्रक विना दहीवड़ी एस टी आगाराचा कारभार 



विना नाव फित असलेल्या वाहतुक नियंत्रकाची प्रवश्यासोबत आरेरावी


माण तालुक्यासाठी एस टी विभागाचे दहीवड़ी आगार आहे. पण या आगाराचा कारभार नियंत्रकाच्या अरेराविमुळे चांगलाच चर्चेला अलाय.  माण तालुक्यातील जनतेला नेहमीच दुष्काळामुळे विस्थापित जीवन जगावे लागते. तालुक्यात वाहतुकीच्या सुविधांची वानवा आहे. अशातच दहीवड़ी आगाराचा कारभार रामभरोसे आहे. याचा प्रत्यय रोजच प्रवाशांना येत असतो. (दि.९  रोजी) तालुक्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कुकुडवाड येथे जाण्यासाठी काही प्रवाशी ४ : ०० वाजले पासून आगारात एस टी  बसची वाट पाहत थाबंले होते. बसच्या वेळेबाबत वाहतुक नियंत्रक केबिनकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना धक्कादायक अनुभव आला. तेथे वाहतुक नियंत्रकच नव्हता. वाहतुक नियंत्रक कार्यालयात असणारे इतर कर्मचारिच प्रवाशांना माहीती देत होते. 
दहीवड़ी आगारात वाहतुक नियंत्रकाशिवय केबिनमध्ये असलेली मोकळी खुर्ची.

सव्वा पाच वाजता कुकुडवाड ला बसची चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशाला ५ : ३० वाजता बस आहे असे सांगितले. पुढे सव्वा सहा वाजता शिरवलीहुन आलेली एक बस विरळी येथे जाण्यासाठी बस फलाटात येऊन थांबली. परंतु ही बस पाऊने सात वाजता सुटेल असे वाहकाने सांगितले. यावर प्रवशात संताप सुरु झाल्यावर काही प्रवाशी वाहतुक नियंत्रकाच्या केबिनमध्ये चौकशी करण्यासाठी गेले असता  रिकाम्या खुर्चीशिवाय दूसरे कोणीही नव्हते. दरम्यान, वाहतुक नियंत्रकाच्या  केबिनसमोर प्रवाशांची चौकशीसाठी  वाढलेली गर्दी पाहुन नावाची फित न लावता काम करणारे वाहतुक नियंत्रक बाहेरुन धावत येऊन प्रवशासोबत अरेरावी करू लागले. प्रवशांनी उशिरा बस सोडण्याचे कारण विचारले असता, वाहतुक नियंत्रक म्हणाले, इंजबाव अशी पाटी लावलेली बस ५ वाजता मानेवाडीला गेली आहे. मी स्वतः इंजबावची पाटी काढून मानेवाड़ी पाटी लावली आहे. हवे तर तुम्ही सीसी टीव्ही पहा. 

 इतकेच काय केबिनमध्ये खुर्चीचा ताबा घेयचा सोडून वाहतुक नियंत्रक प्रवशासमोरच चालक व वाहकावर अरेरावी करत होते. वाहतुक नियंत्रक विभागाच्या ढीसाळ कारभाराने अचानकपने बसच्या फेऱ्या रदद् करायच्या व प्रवाशांची गैरसोय करायची. असले रोजच प्रकार दहीवड़ी आगारात होत असल्याची चर्चा प्रवशांमध्ये होती.  पुढे विरळी मुक्कामी असणारी बस सायंकाळी सव्वा सहा वाजता सुटण्याऐवजी पाऊने सात वाजता सुटली.  वाट पहिन पण एस टी बसनेच जाणाऱ्या प्रवाशांना दहीवड़ी आगरात चांगल्या कर्तबगार वाहतुक नियंत्रकाची गरज आहे. अन्यथा नियोजन शून्य करभारमुळे एस टी ऐवजी प्रवाशांना दूसरा पर्याय शोधावा लागेल.  दहीवड़ी आगरात कोणत्या फलाट क्रमांकावर कोणत्या बस लागतात हेही प्रवाशाना सहजपणे कळत नाही. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या गैरसोईलाही सामोरे जावे लागत आहे.
- आबासो पुकळे



फ्रंट पेज न्यूज
वाहतुक नियंत्रकाविना दहीवड़ी एस टी आगाराचा ढिसाळ कारभार
http://www.frontpage.ind.in/sharenews.aspx?q=216694&u=70739

Saturday, February 8, 2020

Krantiveer Sangolli Raynna Rajyabhishek - Varshikotsav-2020

रासपतर्फे संगोळी रायन्ना राज्याभिषेक- वार्षिकोत्सवाची तपपूर्ति 

संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करताना महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर, कुमार सुशिल, शंकर सोनळी,  धर्मन्ना तोंटापुर, गोविंदराम शुरनार.

रासपने संगोळी रायन्ना राज्यभिषेकाद्वारे राष्ट्रिय समाजाचा  संगम साधला  : महादेव जानकर


 देशातल्या ७ नद्यांच्या एकत्रित जलकुंभ, विविध भाषिक, धार्मिक, प्रांतातिल नागरिकांद्वारे क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक करुन रासपने राष्ट्रिय समाजाचा राष्ट्रिय संगम साधला, असल्याचे प्रतिपादन रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. दि. २६ जानेवारी २०२० रोजी नंदगड ता- खानापुर जि- बेळगावी येथे कर्नाटक राज्य रासपतर्फे क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक- वार्षिकोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी संगोळी रायन्ना समाधीस्थळी श्री. जानकर यांनी वरील उदगार काढले.

 श्री. जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रिय समाज पक्षाला भाषिक, प्रांत, जात, धर्माचे राजकारण करुन राष्ट्रिय समाजात भेद घड़वायचा नसून राष्ट्रिय समाजाचा राष्ट्रिय संगम घडवून बलशाली भारत राष्ट्र बनवायचे आहे.  रासपला प्रादेशिक राजकारण करायचे नसून राष्ट्रीय राजकारण करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवन्यासाठी परकियाविरुद्ध लढताना संगोळी रायन्नास साथीदारासह शहीद व्हावे लागले. कालांतराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु ते स्वातंत्र्य संगोळी रायन्ना पाहू शकले नाहीत. देशाच्या स्वतंत्र्यानंतरही ज्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळाले नाही, अशा सत्ताहीन लोकांच्या हाती, रासपला सत्ता मिळवून देयची आहे.  कर्नाटक- महाराष्ट्र किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रांतवादाचे राजकारण रासप करनार नाही. जर प्रांतवादाचे राजकारण करुन रासपच्या कर्यक्रमास अडथळा निर्माण होत असेल तर  कर्नाटक- महाराष्ट्र राज्याचे केरळ राज्यात विलीन करा, अशी रासप मागणी करेल, असा सूचकवजा इशारा दिला.


सकाळी सव्वा आठ वाजता रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याहस्ते रासपतर्फे रायापुर नंदगड येथील चौकात असणार्‍या संगोळी रायन्ना पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. व भारतीय झेंड्यास ध्वजवंदना देऊन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला. पुढे, क्रांतिवीर संगोळी रायन्ना व राणी चेन्नमा यांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका साकारणारी लघु नाटिका शालेय बालकांनी सादर केली. या बालकलाकारांचे कौतुक करत राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी रोख रक्कमेच बक्षिस दिले. पुढे रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासप राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशिल, राष्ट्रीय महासचिव प्रसन्नकुमार, कर्नाटक रासप संयोजक धर्मन्ना तोंटापुर, आंध्रप्रदेश- तेलंगना राज्य प्रभारी गोविंदराम शुरनार, क्रांतिवीर संगोळी रायन्ना समधीस्थळ स्मारक समिती नंदगडचे अध्यक्ष शंकर सोनोळी, पत्रकार सुरेश दलाल,  कर्नाटक राज्य कुरबा महासंघाचे प्रदेशउपाध्यक्ष रवि कित्तुर,  रासप बेळगांव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजारी, विजयपुर जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे , कर्नाटक रासप युवा आघाडीचे सरचिटणीस  अनिल पुजारी व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संगोळी रायण्णा दफनभूमि स्माधिस्थळी अभिवादन केले. पुजारी श्रीमती चव्हाण यांनी माजी मंत्री राष्ट्रनायक महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर सहीत अन्य मान्यवरांना संगोळी रायन्ना स्माधिस्थळी असणारा भंडारा ललाटी लावला तर गळ्यात पुष्पमाला अर्पण केली. समाधिस्थळी 'क्रांतिवीर संगोळी रायन्ना'च्या जय जयकार करणाऱ्या गगनभेदी  घोषणा दिल्या. नंदगड वासियांची भेट घेऊन राष्ट्रनायक महादेव जानकर पुढे ९ : ०० वाजता महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले. 


रासप राष्ट्रिय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर यांनी देशभरातून आलेल्या संगोळी रायण्णाप्रेमी रासप मावळ्यांना मार्गदर्शन केले. रासप अयोजित संगोळी रायन्ना राज्याभिषेक- वर्षिकोत्सवाची माहिती सांगितली. रासप पदाधिकारी/ कार्यकर्ते यांनी संगोळी रायन्ना फाशी स्थळी जाऊन अभिवादन केले.

संगोळी रायन्ना समाधीस्थळाकड़े जाताना महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर, शंकर सोनळी, पत्रकार सुरेश दलाल, प्रसन्नकुमार, कुमार सुशिल, गोविन्द शिंदे
क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेकपूर्वी वेगवान घडामोडी
रासप संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिनांक २५ जानेवारीस रात्रीचा मुक्काम क्रांतिवीर संगोळी रायन्ना फाशी स्थळाच्या ठिकाणी करुन  सकाळी  प्रजासत्ताक दिनी ठीक ८ : १५ वाजता ध्वजारोहण केले.  २५ जानेवारीस कर्नाटक रासप आयोजीत  क्रांतिवीर संगोळी रायण्णा राज्याभिषेक कार्यक्रमाचे पत्र कर्नाटक प्रशासनास देण्यासाठी गेलेल्या धर्मन्ना तोंटापुर व रासपचे ज्येष्ठ नेते गोविंदराम शुरनार यांना कर्नाटक पोलिसांनी नजरकैद केले होते. तसेच महाराष्ट्रात मंत्रिपद भुषवलेल्या रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना कर्नाटकात कार्यक्रम घेता येणार नसल्याबाबतचे नोटिस काढले होते. रासपचे राष्ट्रिय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर हे कर्नाटकचे सुपुत्र असून कोणत्याही परिस्थितीत रासप संगोळी रायन्ना राज्यभिषेक- वार्षिकोत्सव करणारच असा त्यांनी निर्धार केला होता. श्री. अक्किसागर हे स्वतः रासपचे राष्ट्रिय महासचिव श्री. कुमार सुशिल व श्री. प्रसन्नकुमार समवेत कर्नाटक राज्यात दाखल होताच,  पुढे कर्नाटक शासन व प्रशासनाने  रासपच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन महादेव जानकर व रासपला सहकार्य केले. तसेच कार्यक्रमस्थळी पोलीस यंत्रणाही  कार्यन्वित केली. नंदगड़ ग्रामवासियांकडून  रासप गत १३ वर्षापासून संगोळी रायन्नास अभिवादन करत आहे, असे खानापुर पोलिस प्रशासनास कळवले होते. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपने  राष्ट्रिय समाज बांधवाना सोबत घेऊन क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक- वार्षिकोत्सव उत्सहात पार पाडला.
  

राज्याभिषेक- वर्षिकोत्सवात  राष्ट्रिय समाज पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष किशोर राव, उत्तर कर्नाटक रासप उपाध्यक्ष प्रवीणकुमार पदमगोंड, सौ. सुमंगल वालीकर(विजयपुर),  आबासो पुकळे(मुंबई), सुरेश दलाल, ब्रिजेश गोरे(गंगाखेड), समाजसेवक सत्यप्पा गुरिकार(बेंगलोर),  देवराज कांबळी (धारवाड़),  प्रा. सुनील तोंटापुर, कोल्हापूर महिला अघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती पाटील, सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील, भूषण काळगी, अखिल नगारजी, सुरेश कचरे (सांगोला), जीवाजी लेंगरे व अन्य रासपा पदाधिकारी/ कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याभिषेक- वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला.
नंदगड/ बेळगावी : आबासो पुकळे


क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्यभिषेक वार्षिकोत्सव तपपूर्ति  क्षणचित्रे


संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करताना महादेव जानकर बाजूस एस. एल. अक्किसागर.

संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करताना एस. एल. अक्किसागर समवेत महादेव जानकर.

संगोळी रायन्ना पुतळा येथे संगोळी रायन्ना, रानी चेनम्मा ची भूमिका साकरणाऱ्या बालकांना जिलेबीचा घास देताना महादेव जानकर आदि.

संगोळी रायन्ना समाधीस्थळ - प्रवेशद्वार येथे उत्तर कर्नाटक रासप उपाध्यक्ष प्रवीण पदमगोंड यांच्यासमवेत हास्यमुद्रेत एस. एल. अक्किसागर.
संगोळी रायन्ना समाधीस्थळी नंदगड येथील रासप हितचिंतक श्री. डवरी यांच्या कन्या व राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब
संगोळी रायन्ना समाधीस्थळी दिव्यांग महिला सुमंगला वालीकर यांची अपुलकिने भेट घेताना एस. एल. अक्किसागर

संगोळी रायन्ना समाधीस्थळी सौ. चव्हाण यांचे  म्हणजे  माय माउलीचे  पदस्पर्श करुन  आशीर्वाद घेताना राष्ट्रनायक महादेव जानकर.
संगोळी रायन्ना समाधीस्थळी एस. एल. अक्किसागर  समवेत कोल्हापूर रासप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा भारती पाटिल, बेळगाव जिहाध्यक्ष  हनुमंत पुजारी, अथनी तालुकाध्यक्ष श्री. चौगुले.
संगोळी रायन्ना समाधीस्थळी अशोक स्तंभाजवळ एस. एल. अक्किसागर, प्रसन्नकुमार, गोविंदराम शुरनार,  पुजारी गोविंद चव्हाण, गोवा प्रदेशाध्यक्ष किशोर राव, बेळगांव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजारी, सत्यप्पा गुरिकर.
संगोळी रायन्ना समाधीस्थळी सुरेश कचरे (सांगोला), अजित पाटिल,  अखिल नगारजी, भूषण काळगी, आबासो पुकळे.

संगोळी रायन्ना समाधीस्थळी महादेव जानकर समवेत रासप हितचिंतक सत्यप्पा गुरिकर (बेंगलोर) बाजूस एस.  एल. अक्किसागर, श्री. प्रसन्नाकुमार, अनिल पुजारी.

संगोळी रायन्ना फाशीस्थळी अभिवादन करताना कर्नाटक राज्य रासप पदाधिकारी धर्मन्ना तोंटापुर, अनिल पुजारी, गोविन्द शिंदे, राघु सुळे, प्रवीणकुमार पदमगोंड, रवि कित्तुर प्रा. सुनिल तोंटापुर.
संगोळी रायन्ना समाधीस्थळ येथे राज्यभिषेकपूर्वी मंचकाच्या ठिकाणी पोलिसांशी संवाद साधताना महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर
संगोळी रायन्ना चौकात महादेव जानकर,  महिला पोलिस आधिकारी, एस. एल. अक्किसागर, हनुमंत पुजारी, प्रसन्नकुमार,  शंकर सोनळी, गोविंद शुरनार.
कर्नाटक राज्यात महादेव जानकर, एस. एल. अक्किसागर, कुमार सुशिल, धर्मन्ना तोंटापुर, गोविंद शिंदे, जीवाजी लेंगरे, रवि कित्तुर, सुनील तोंटापुर.
पहिल्या संगोळी रायन्ना राज्यभिषेकाचे मानकरी नंदगडचे रहिवशी  श्री. नागनाथ डवरी यांच्या कुटुंबियासमवेत दुकानासमोर एस. एल. अक्किसागर.


चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...