Monday, September 9, 2019

आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक

आमच्यावर राज्य करणारे,  हे गोरे कोण हाय ?
हा आमचा देश हाय, आम्ही इथले राजे हाय !

राजे उमाजी नाईक यांनी जगावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांविरुद्ध सर्वमान्य जनतेच्या सहकार्याने आणि मर्यादित साधनानिशी लढा दिला. स्वराज्य निर्माण केले. धन, साधने, पैसा कमी पडला. सहकारीही दमले, कटांळले. तरि पुन: पुनः नव्या उमेदीने उमाजीराजे नाईक ब्रिटिशांविरुद्ध मरेपर्यंत लढत राहिले. आणि हा देश आमचा हाय, आमच्यावर राज्य करणारे हे गोरे कोण हाय, आमचे राज्य आणुपर्यंत आम्ही गप्प राहणार नाय, असे मनापासून निर्धारपूर्वक खडसावून सांगणारे आणि स्वराज्य स्थापून  'आम्ही इथले राजे हाय' असा संदेश आपल्या कृतीने देणारे राजे उमाजी नाईक मौजे.भिवडी, ता- पुरंदर जि. पुणे येथे दि. ७ सप्टेंबर १७९६ रोजी रामोशी समाजात जन्माला आलेले भारत भूमितील अनमोल रत्न होते. ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचे धारिष्ट दाखवणारे स्वाभीमानी हुकूमी एक्का होते. स्वत:चे छोटे राज्य स्थापन करणारे जननायक होते. उमाजीराजे नाईक यांचे प्रमुख वास्तव्य/ मुख्य कार्यक्षेत्र पुणे सातारा भागातील जांभुळवाडी, वजीरगड, हत्तीमाळ, पांगाराची खिंड, जेजुरी, भिवडी, पुरंदर होते. परंतु उमाजीराजे नाईकांचा दरारा अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पर्यंत पोहचला होता.  उमाजीराजे नाईकांना पकडन्यासाठी जेरीस आलेल्या ब्रिटिशांकडून ४०० बिघे जमिन व १० हजार रुपयाचे बक्षिस लावले जाते.( त्याकाळी या रुपयांचे मूल्य फार मोठे होते.) पुनः  एकदा अवसान घात होतो. भोरच्या जंगलात घेरले जावून काळोत्री गावी उमाजीराजे पकडले जातात. त्यांना दोरखंडानी बांधण्यात येते.  १५ डिसेंबर १८३१ ला खटला सुरू होतो. चो-या, दरोडे, राजद्रोहाचा आरोप ठेवला जातो. फाशीची शिक्षा सुनावली जाते. अखेरची इच्छा विचारण्यात येते तेव्हा उमाजीराजे म्हणतात, 'तुम्ही इंग्रजांनी हिंदुस्थानातून चालते व्हावे'.   ३ फेब्रुवारी ‍१८३२ रोजी पुण्यातील खडकमाळावर  एका झाडावर  उमाजीला जीवंत फासावर चढविले जाते. उमाजीराजे नाईक ब्रिटिशांविरुद्ध लढता- लढता  शहिद होतात. 

छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणार्‍या, ब्रिटिशांना नामोहरम करत स्वत:चे स्वराज्य घोषीत करणारे उमाजीराजे नाईक स्वतंत्र भारताच्या, महाराष्ट्राच्या इतिहासात जाणिवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचे दिसते.  भारताचे खरेखुरे आद्य क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, नरवीर उमाजीराजे नाईक यांच्या २२३ व्या जयंतीनिमित्त "विश्वाचा यशवंत नायक' परिवारकडून विनम्र जय मल्हार.
- आबासो पुकळे, मुंबई.
७ सप्टेंबर २०‍१९.

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...