Tuesday, September 17, 2019

हिमाचल प्रदेश राज्यपालपदी बंडारु दत्तात्रेय


हिमाचल प्रदेश राज्य राज्यपालपदी शपथ घेणारे 'बंडारु दत्तात्रेय' स्वतंत्र भारतातील पहिले मेंढपाळपुत्र


दि. ११ सप्टेंबर २०१९ वार- बुधवार रोजी 'राजभवन' शिमला येथे बंडारू दत्तात्रेय यांनी हिमाचल प्रदेश राज्याच्या राज्यपालपदी शपथ घेतली.  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश धर्मचंद चौधरी यांनी गोपनीयतेची शपथ दिली. मूळचे तेलंगणा येथील कुरुबा (शेर्फड) समाजातून येणारे बंडारु दत्तात्रय हिमाचल प्रदेशचे २७ वे राज्यपाल बनले. शपथविधी वेळी मुख्यमंत्री जयराम ठाकुर, अन्य मंत्री आणि बंडारु दत्तात्रेय यांच्या पत्नी वसंथा, केंद्रीय गृह राज्यमंत्री कृष्णा रेड्डी, वरिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते. 

राज्यपालपदी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल बंडारु दत्तात्रेय म्हणाले, उत्तर भारत आणि दक्षिण भारत पयर्टनाच्या माध्यमातून जोडू. पर्यटन वाढीकडे प्राधान्य राहिल. कारण पर्यटन वाढले तर रोजगार वाढेल. यासाठी हिमाचल सरकार बरोबर तेलंगणा सरकारशी चर्चा करु. उच्च शिक्षण देणार्‍या संस्थाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करु. गुणवत्ता वाढीबरोबर नैतिक मूल्याकडे लक्ष देऊ.  गरिब, उपेक्षित, कामगार आणि शेतकर्‍यांसोबत सैदव राहू. त्यांच्यापर्यंत शासकिय कार्यक्रम व विकासाच्या योजना पोहचवू.

नवनियुक्त राज्यपाल बंडारु दत्तात्रय हे  दि. १० सप्टेंबर २०१९ वार- मंगळवार सायंकाळी  ६ :०० वाजता शिमला येथे पोहचले.  दि. ११ रोजी सकाळी :११ वाजता राजभवनात शपथविधी कार्यक्रम आयोजित केला होता. मंगळवारी सायंकाळी राजभवनात पत्नीसोबत पोहचणा-या दत्तात्रेय यांचे स्वागत मुख्यमंत्री जयारम ठाकूर यांनी केले. शपथविधी सोहळ्यास ३०० प्रमुख मान्यवर तर हिमाचल प्रदेशबाहेरील २०० प्रमुख मान्यवर उपस्थित होते.  नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी राजभवनात संसदीय कार्यमंत्री सुरेश भारद्वाज, मुख्यसचिव डॉ. श्रीकांत बालदी, मुख्यमंत्री प्रधान सचिव संजय कुंडू, महापौर कुसुम सदरेट सह जिल्हा प्रशासन अधिकारी उपस्थित होते.

बंडारु दत्तात्रेय यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९४७ रोजी हैदराबाद येथे झाला.  त्यांना दत्तन्ना या नावाने लोकांमध्ये ओळखले जाते. आईचे नाव ईश्वरम्मा वडिलांचे नाव अंजैय्या आहे.  हे दांपत्य कुरुबा(shepherd) समाजातील आहे. दत्तात्रेय यांच्या २१ वर्षिय मुलांचे  दि. २४ मे २०१८ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना 'लक्ष्मीविजय' नावाची कन्या आहे.  दत्तात्रेय यांनी उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद आंध्रप्रदेश मधून बी. एससी ची पदवी घेतली. बंडारू दत्तात्रेय सन १९६८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी(आरएसएस) जोडले गेले. १९६८ ते १९८९ मध्ये आरएसएस प्रचारक म्हणून काम केले. लोक संघ समिति(जय प्रकाश नारायण आंदोलन) संयुक्त सचिव होते. आणिबाणीच्या काळात त्यांना तुरुंगावास झाला. १९८० ला भाजपात सामिल झाले.  १९८१ ते १९८९ पर्यंत आंध्र प्रदेशचे भाजप सरचिटणीसपदी काम केले. सन १९९१ मध्ये सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले. सन १९९६ ते १९९८ पर्यंत आंध्रप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षपदी काम केले. खासदार बनल्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय शहर विकास मंत्री पदावर काम केले. सन २००४ ला भाजपाचे राष्ट्रीय सचिव बनले. सन २०१३ मध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असताना सन २०१४ ला सिंकदराबाद लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढले व जिंकले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंत्रीमंडळात केंद्रीयमंत्री बनले. सप्टेंबर २०१७ मध्ये केंद्रीयमंत्री पदाचा राजीनामा दिला.  ५ मार्च २०१८ मध्ये हैदराबाद विद्यापीठ न्यायालयचे सदस्य बनले. भाजपच्या राष्ट्रीय घोषणापत्र समितीचे सदस्यपदी त्यांनी काम केले आहे. 






चारवेळा लोकसभा निवडणुक जिंकणारे बंडारु दत्तात्रेय यांना तेलगंणा राज्यात 'पिपलस लिडर' नेता म्हणून ओळखले जाते. आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात संघ, भाजपला पोहचवणारे ७२ वर्षिय बंडारु दत्तात्रेय हे स्वतंत्र भारतातील कुरुबा- पाल- रबारी- धनगर- भरवाड- कुरुमा- कुरुम्बन- गडरिया- मालधारी- गड्डी- बकरवाल- गाडरी आदी मेंढपाळ समाजातील पहिले प्रतिनिधी आहेत.
एका सामाजिक कार्यक्रमात खांद्यावर घोंगडी, डोईवर पटका व हातात कोकरु सह बंडारु दत्तात्रेय  

-आबासो पुकळे, मुंबई .
दि.१६ सप्टेंबर २०१९.

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...