Tuesday, September 3, 2019

वनकर्मचारी यांच्यावर कारवाई होणार का?

महाराष्ट्र वन खात्याच्या मानवी हिंस्र लांडग्यांना शासन सेवेतून मुक्त करणार का? वन कर्मचारी निघाले पशुभक्षक

बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात घडला संतापजनक प्रकार
मेंढपाळांसह पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देताना रासपाचे प्रदेशउपाध्यक्ष सुभाष राजपूत 

• दि. २७  ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या काही वन कर्मचा-यांनी नाना मिसाळ नामक मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपातील कोकरु(मेंढीचे बकरे) चोरले.
• चोरलेले कोकरे कापून मटनाचे कालवण(भाजी) करुन वन कर्मचा-यांनी खालले.
• चोरलेले कोकरु कापून खाताना वनकर्मचा-यांना मेंढपाळांनी प्रत्यक्ष पाहिले.  कोकरे चोरणे व कापून खाने यासंबधीत कर्मचा-यांना याचा जाब विचारला.
• कापून खालेल्या कोकराचे कातडे व शस्त्राचा पुरावा घेऊन मेंढपाळांची बोरखडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार.
• दि. २९ ऑगस्ट रोजी मौजे खडकी येथे बाजार करुन मेंढ्याचा तळावर(मेंढपाळांचे वस्तीस्थान) परतणा-या दोन वयोवृद्ध मेंढपाळ महिलांना रस्त्यात अडवून एकुण ४  वन कर्मचा-यांनी केली मारहान. महिलांना बेदम मारहाण करुन खोटाडरड्या चोर असणार्‍या  वन कर्मचा-यांनी बोरखडी पोलीस स्टेशनमध्ये महिलांविरुध्द जगंलात मेंढ्या चारणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी दिल्या व पोलीसांनीही दाखल करुन घेतल्या.
• मारहान झालेल्या पीडित मेंढपाळ महिला पोलीसांत तक्रार देण्यास गेल्या असता पोलीसांनी घटनाक्रमाची शहानिशा न करता संबधीत महिलांना अटक केली.
• मेंढ्या चोर वन कर्मचा-यांच्या पोलीसी दप्तरी असणार्‍या  खोट्या गुन्हेमुळे स्वत: पिडित असणार्‍या निपराध २ महिलांना स्वतंत्र भारतारतल्या न्यायालयातील न्यायदेवतेने तुरुंगात डांबले असून संबधीत चोरटे वन कर्मचारी मोकाट फिरत आहेत.
• स्वत: मेंढी चोर असताना शिरजोर बनलेल्या वन खात्याच्या मानवी लांडग्याची मनस्ताप करायला लावणारी संतापजनक घटना रासपाचे प्रदेशउपाध्यक्ष सुभाष राजपूत यांच्यामुळे दि. १ सप्टेंबर रोजी उजेडात आली आहे.
• उशीरा का होईना संबधीत वन कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिले आहे, परंतु  बेकायदेशीर कृत्य करणार्‍या चोरट्या वन कर्मचारी यांना वाचवण्यासाठी वन विभागाचा खटाटोप सुरु आहे.  या संबधीत घटनेत निपराध महिलांना तुरुंगात धाडणा-या पोलीस यंत्रणा आणि वन विभागाविरोधात मानवी आयोग आणि  महिला आयोग काय भुमिका घेतोय हेही महत्वाचे आहे?.

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...