३ वर्षानंतर माणदेशाला सर्वदूर पाऊसाने झोडपले.
दुथडी भरुन वाहणारे माणगंगा नदीचे पात्र |
ऐन पाऊसाळ्यात माण तालुक्यात ८ गावे व ४२ वाड्यावस्त्यांवर शासकिय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. काही भागात शेतकर्यांची जनावरे छावणीवर होती. तर काही पशुपालक मेंढपाळ गावाकडे परतले नव्हते. 'आज येईल, उद्या येईल' या पावसाच्या प्रतीक्षेवर आस लावून बसलेल्या माणदेशी जनतेला पावसाने सतत हुलकावणीच दिली. पूर्ण गणेशोत्सव कोरडा गेल्याने दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले होते. मात्र, गत आठवडाभरापासून माणच्या पूर्वेकडे म्हसवडसह परिसरात पावसाने सुरवात केली. त्यानंतर हा पाऊस गोंदवले, दहिवडी, मलवडी असा पश्चिमेकडे सरकला. काल मंगळवारी मध्यरात्री ११ पासून मेघराजाने माणदेशात बरसायला सुरुवात केली अन्, तो पहाटे ३. ३० वाजताच थांबला. रात्रीचा पाऊस माण तालुक्यात सर्वदूर झाला. दहिवडी, मलवडी, सत्रेवाडी, कुकुडवाड, पुकळेवाडी, विरळी, म्हसवड, भाटकी, वरकुटे मलवडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. कुळकजाई ता- माण येथील सितामाईच्या डोंगरात उगम पावणाऱ्या फलटणमधील बाणगंगा आणि माण तालुक्यातील माणगंगा नदीचे पात्र भरुन वाहु लागलेय. खटाव तालुक्यात येरळा नदीचे पात्र पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे. काल मंगळवारी रात्रीनंतर फलटण आणि माण, खटाव तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. परतीच्या पावसामुळे दुष्काळी भागातील बळीराजाला काहीसा दिलासा मिळालाय. कायम दुष्काळी भाग असलेल्या या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय. रात्रीपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातल्या लोकांना दिलासा मिळालाय.
म्हसवड बसथानकासमोर ढालेमामा कॉम्पलेक्स च्या तळघरात शिरलेले पाणी |
माणगंगा नदीला पूर आल्यानंतर नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुळकोटी येथील महिलांनी या पाण्याची पूजा करून ओटी भरली. तर दिवड येथील म्हसोबा मंदिरातही पाणी शिरले असून देव ही पाण्यात आहेत. माण तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. कुळकजाई ते राजेवाडी असा या नदीचा प्रवाह माण तालुक्यात असून, या नदीवर कोल्हापूर पद्धतीचे सुमारे २० बंधारे आहेत. शिरताव गावाच्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय. तर कुकुडवाड - कारंडेवाडी दरम्यान येणाऱ्या भाकरेवाडी पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतुक थांबली होती. जोरदारपणे बरसलेल्या पाऊसामुळे शेतीचे मोठे नुकसानही झाले आहे. शेतात बांधलेल्या मोठमोठया तालींची पडझडही झाली आहे. पुकळेवाडी सारख्या गावात असा पाऊस ७० वर्षानंतर पहिल्यांदाच झाला आहे, तर काही वयोवृद्ध नागरिक म्हणाले आसा पाऊस झालेला आयुष्पायात पाहिलाच नाही. मध्यरात्रीच्या पाऊसाने पुकळेवाडीचा तलाव पूर्णक्षमतेने भरुन वाहिला तर श्रमदानावेळी तलावालाची खोली वाढवताना निघालेला गाळ हा तलावाच्या भरावाच्यापाठिमागे टाकलेला होता. तो गाळ आता वाहून गेला आहे. तर गावाला पाणीपुरवठा करणारी कुपनलिका या गाळात बुजली आहे. तलावाकाठी शेतजमिन असणार्या शिवाजी जोतिराम पुकळे यांच्या रानातील माती वाहिल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. भराव भरुन चढावर घर बांधण्याच्या स्पर्धेमुळे गावात कमी उंचीचा पाया असलेल्या बांधवांच्या घरात डोंगरावरुन आलेला पाण्याचा लोंढा थेट घरात शिरल्याने धान्य तसेच संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. पुकळेवाडी परिसरातील सर्व ओढे, नाले, ओहोळ प्रवाहित झाले आहेत. पुकळेवाडी रस्त्याला जोडणारा व शेळकेवस्तीला जाणारा पुल वाहून गेल्याने काही काळ रहदारी खंडीत झाली. कुकुडवाडमध्येही पाऊसाने चांगलेच झोडपले आहे.
माणदेशाला वॉटर कप स्पर्धेचा फायदा...
गेल्या तीन वर्षांत माण तालुक्यामध्ये वॉटर कप स्पर्धेचे मोठे काम झाले आहे. गाव शिवार, माळरानावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यातच आता दोन वर्षांनंतर चांगला पाऊस बरसत असल्याने डीपसीसीटी, नालाबांध, बंधाऱ्यात पाणी साठले आहे. याचा शेतीसाठी फायदा होणार आहे.
पुकळेवाडी तलाव |
पुकळेवाडी |
माणगंगा नदी |
पुकळेवाडी |
माणगंगा नदी
पुकळेवाडी |
पुकळेवाडी |
पुकळेवाडी |
पुकळेवाडी |
माणदेशाच्या सिमेवर असणारे शैक्षणिक केंद्र देवापुरातील विद्यालयास सुट्टी देण्यात आली. |
शेतीचे नुकसान
चीरनाळ अर्थात शिर नावाच्या शिवारात शेतीचे प्रचंड नुकसान झाले.