Sunday, September 28, 2025

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी मदत करा : महादेव जानकर

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी मदत करा : महादेव जानकर 



मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा; नांदेड, हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातून जानकरांची मागणी

नांदेड : राज्य सरकारने मुंबई पुण्यातील प्रोजेक्ट थांबवून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेतली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.  आज (दिनांक २८ ) सकाळ पासून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तोसीफ शेख, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.  

महादेव जानकर साहेब यांनी कंधार तालुक्यातील तेलुर व कवठा, मुखेड तालुक्यातील चिवळी आणि लोहा तालुक्यातील गोळेगाव भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत श्री. जानकर म्हणाले, शेतकऱ्यांना एकरी ₹५०,००० रुपयेची मदतीची घोषणा करावी, माती वाहून गेलेल्या क्षेत्रांना विशेष भरीव मदत द्यावी, मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

नांदेड जिल्हा दौरा करून हिंगोली जिल्हा दौऱ्याकडे रवाना झाले. महादेव जानकर यांनी गिरगांव जि. हिंगोली येथे पूरग्रस्त व अतिवृष्टी भागाची भेट घेतली. अनेक गावात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना, शासनाचे महसूल कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याने महादेव जानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Thursday, September 18, 2025

शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची स्थापना

शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची स्थापना

कर्जमाफी व शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर (२५/८/२०२५) :  छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक संपन्न झाली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन, शेतकरी कर्जमाफी आणि MSP च्या भावावर २०% हमीभाव याबाबत शासनाने निर्णय घेण्यास करत असलेले विलंब आणि त्याचा शेतकरी व त्याच्या कुटुंबावर होणारे परिणाम यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून, त्याला न्याय मिळून देण्यासाठी आज ही बैठक संपन्न झाली. याबैठकीत प्रमुख विषयावर चर्चा करुन खालील निर्णय घेण्यात आले.

१) दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई मध्ये आंदोलन करण्यात येणार २) राज्यात विभागनिहाय संयुक्त परिषद घेण्यात येणार ३) शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार ४) शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे ५) कर्जमुक्ती,सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव, बोगस खते व बियाणे प्रश्न, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करणे, सर्व कृषीनिविष्ठा GST मुक्त करणे आणि गाव एकक धरून शेतकरी हिताची पीकविमायोजना व खते बियाणे तपासणीसाठी गावावर टेस्टिंग लॅब स्थापन करणे  ई. प्रमुख मागण्यासह निर्णय घेऊन लढा देण्याचा निर्णय झाला. 

वरील प्रमुख निर्णयासह हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून, आजच्या बैठकीला विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव व इतर शेतकरी संघटना नेते या बैठकीस उपस्थित होते. तसेच  राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन द्वारे बैठकीस उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुंबईत मोर्चा काढणार : महादेव जानकर

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुंबईत मोर्चा काढणार : महादेव जानकर 

पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, बाजूस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तोसीफ शेख, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सूरज ठाकूर

यवतमाळ (९/९/२५) : शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारच्या धोरणावरून राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे यवतमाळ येथे आले असता जाहीर केले. 

श्री. जानकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये '२०२४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारने शेतकर्‍यांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहामध्ये अडकला असून, शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, विदर्भातील शेतकर्‍यांना ऊसाप्रमाणे एफआरपी दयावी, व शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांकरीता मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना श्री. जानकर म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांनी शासकीय योजनेचा लाभ घेवून शेतीसोबत पुरक व्यवसाय करण्यावर भर दिला पाहिजे. शेतकर्‍यांच्या मुलांनी शेतीचे अद्यावत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय फायद्याची शेती केली जावू शकणार नाही. मी मंत्री असताना दुधाला सर्वाधिक दर मिळवून दिले होते, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सत्ताधार्‍याकडून आपल्याला जाती जातीमध्ये भांडविले जात आहे. ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना सरकारने दयावे, कुणाच्याही आरक्षणाच्या हक्काला आमचा विरोध नाही. ज्या जातीची जेवढी जन संख्या असेल, तेवढया प्रमाणात त्यांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. त्यासाठी कायदे तयार करण्याचे अधिकार संसदेला आहेत, त्यांनी ते करावेत असे स्पष्ट मत महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

महादेव जानकर यांचा उत्तर प्रदेश दौरा

महादेव जानकर यांचा उत्तर प्रदेश दौरा

लखनऊ - उत्तर प्रदेश (३१/९/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे लखनऊ उत्तर प्रदेश दौऱ्यावर अतिथिगृह येथे पोहचल्यावर राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे लखनऊ जिल्हाध्यक्ष पारस पांडे, जिल्हा उपाध्यक्ष बृजेश विक्रम पासी, बीकेटी विधानसभा मंडल अध्यक्ष अमर सिंह आणि भारतीय मजदूर किसान यूनियनचे राजू पाल, लखनऊ मंडल अध्यक्ष सरवन पाल उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे काम वाढवण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

ग्वाल्हेर येथे राष्ट्रीय समाज पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ग्वाल्हेर येथे राष्ट्रीय समाज पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : येथे ग्वाल्हेरचे रहिवाशी आणि महादेव जानकर यांचे खंदे समर्थक, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते जीवाराम बघेल यांच्या नेतृत्वात जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्वाल्हेर येथे पक्ष वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या देशभरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून या कार्यालयास भेट देऊन पुढील कार्यास शुभेच्छ्या देण्यात आल्या. यावेळी मध्य प्रदेश, महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

माण तालुक्यात रासपची गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाची मोहीम

माण तालुक्यात रासपची गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाची मोहीम

दहिवडी (१/९/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांच्या नेतृत्वात यावर्षीचा गणेश उत्सव हा पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेत साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. दिनांक 30 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी माण तालुक्यातील गणेश मंडळास वृक्षारोपणासाठी रोपे भेट देण्यात आली. खुटबाव, मोही, ठोंबरेवाडी, शिंगणापूर, थदाळे, वावरहिरे, डंगिरेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, राजवडी या गावातील गणेश मंडळांना वृक्ष वाटप करण्यात आले. यापूर्वी शरद दडस यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद येथील शाळांना विद्यार्थ्यांना शालेपयोगी वही, पेन सारखे साहित्य वाटप केले होते. आताही त्यांनी गणेश उत्सवात पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेऊन चांगला उपक्रम राबवला आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कालिदास गाढवे यांनी व्यक्त केले. 

यावेळी रासपचे माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे, युवक तालुका अध्यक्ष तात्याराम दडस, प्रवचनकार प्रतीक भोसले, किशोर जगदाळे, लखन खुस्पे, गणेश दडस, आयुष्य दडस, विकास पवार, गौरव साळुंखे, मधुकर अवघडे, ओंकार चौगुले, आकाश मेनकुदळे, अजिंक्य शिंगाडे, तसेच सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश मंडळांनी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केल्यास तीन वर्षानंतर त्यांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देऊ, असे शरद दडस यांनी जाहीर केले. वृक्षाची लागवड करणे हे शाश्वत काम आहे, त्यामुळे सर्वांना ऑक्सिजन मिळतो. पर्यावरणाचे रक्षण होऊन ममाण तालुक्यासारख्या प्रजन्यछायेच्या भागात वृक्ष लागवडीमुळे पावसाचे देखील प्रमाण वाढू शकते.

महादेव जानकर यांच्यापेक्षा देवालाही मी मोठे मानत नाही : एस एल अक्कीसागर

महादेव जानकर यांच्यापेक्षा देवालाही मी मोठे मानत नाही : एस एल अक्कीसागर

ग्वाल्हेर : राष्ट्रीय समाज पक्षाचा 22 वा वर्धापनदिन ग्वाल्हेर येथे पार पडला. वर्धन दीन कार्यक्रमात रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले, 22 वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज पार्टीला जन्म कुणी दिला असेल तर, त्यांचं नाव आहे महादेव जानकर, यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यामुळे मी त्यांना मानतो. त्यांच्यापेक्षा देवालाही, माता पिता यांना मी मोठे मानत नाही. आज राष्ट्रीय समाज्याच्या हाती देशाची सत्ता देण्यासाठी झगडत आहेत. टिळक म्हणाले होते, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना स्वराज मिळाले. आमचे शेतकरी, कष्टकरी, पशुपालक, व्यावसायिक अशा असली भारतीय जनतेला स्वराज मिळाले नाही, त्यांच्या हातात सत्तेची चावी देण्यासाठी ही पार्टी बनवली आहे. इथे लिहिले आहे, राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म हमारा !राष्ट्र बने बलशाली यही सूत्र हमारा!! आज प्रस्थापित लोक देशात सगळीकडे जाती धर्म भाषेवरून भेदभाव केला जात आहेत आणि याच भेदभावातून राज्य करत आहेत. हे कायमचे थांबवण्यासाठी ''राष्ट्र, समाज' सर्वांना सामावून घेणारी सर्वात सुपर विचारधारा असणारी राष्ट्रीय समाज पार्टी महादेव जानकर यांनी बनवली आहे. जोपर्यंत शेतकरी शेतमजूर स्वतःचे सरकार बनवणार नाही देशाचे राज्याचे भले होणार नाही. आज महादेव जानकर लढत आहेत, झिजत आहेत, आमचे चंद्रगुप्त मौर्य आहेत. आपल्याला राष्ट्रीय समाजाच्या विचाराचा भारत घडवायचा आहे, त्य आपले स्वराज आपल्याला आणायचे आहे. ते आता कोणी रोखू शकणार नाही.

Friday, September 12, 2025

राजे उमाजी नाईक यांचा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला : काशिनाथ शेवते

राजे उमाजी नाईक यांचा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला : काशिनाथ शेवते 

भिवडीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राजे उमाजी नाईक यांना अभिवादन


पुरंदर (७/९/२५) : देशाच्या इतिहासात भिवडी येथे पहिली जयंती साजरी करून, राजे उमाजी नाईक यांचा खरा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला असे प्रतिपादन, राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे अभिवादन करण्यात आले.


श्री. शेवते म्हणाले, उमाजीराजे नाईक यांची पहिली जयंती महादेव जानकर यांनी साजरी केली. सुरुवातीच्या काळात येथे घाणीचे साम्राज्य होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी येथील ऊर्जास्थळाची स्वच्छता केली. हे ठिकाण जागृत केले. राजे उमाजी नाईक यांची प्रेरणा घेऊनच राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकाळ सुरू झाला. राजे उमाजी नाईक जयंतीच्या निमित्ताने रामोशी समाजात जागृती निर्माण होत आहे. आज शासन जयंती उत्सव साजरा करतेय, हाच आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. उपेक्षित समाजाचे महानायक प्रकाशझोतात आणण्याचे काम महादेव जानकर यांनी केलेले आहे.  यापुढेदेखील राजे उमाजी नाईक यांचे काम महाराष्ट्रभर व्यापक पद्धतीने पुढे नेऊ. 

रासपचे सरचिटणीस अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/ कार्यकर्ते यांनी राजे उमाजी नाईक यांचा विजय असो ! राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो !! अशा घोषणा दिल्या. यावेळी राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस अजित पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुनिताताई किरवे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे, पुणे शहर संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष परमेश्वर बुर्ले, पुणे शहर अध्यक्ष संतोष शिंदे, माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे, तात्याराम दडस,रासेफचे महावीर सरक आदी उपस्थित होते.

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...