Sunday, January 21, 2024

२५ रोजी बेळगावला रासप राष्ट्रीय कार्यकारणी मीटिंग व राज्य कार्यकारणी मीटिंगचे आयोजन

२५ रोजी बेळगावला रासप राष्ट्रीय कार्यकारणी मीटिंग व राज्य कार्यकारणी मीटिंगचे आयोजन

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे दि. २६ रोजी संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव साजरा करू : धर्मन्ना तोंटापुर

मुंबई : राष्ट्र भारती द्वारा 

दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी कन्नड साहित्य भवन, राणी चेनम्मा सर्कल जवळ, बेळगांव येथे दुपारी  २ ते ५ : ३० या वेळेत राष्ट्रिय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी व कर्नाटक राज्य कार्यकारणी यांच्या मीटिंगचे आयोजन केले असल्याची माहिती, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष धर्मन्ना तोंटापुर यांनी राष्ट्रभारती ब्लॉग प्रतिनिधिशी बोलताना कळवले आहे. श्री. तोंटापूर हे बेळगांव येथे आले असून, त्यांनी भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांची भेट घेऊन कार्यक्रमाबद्दल चर्चा केली आहे. 

मीटिंग नंतर रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद होईल. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी नंदगड ता - खानापुर जिल्हा बेळगांव येथे '१६ वा क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. देशभरातील राष्ट्रभिमानी कार्यकर्त्यांनी संगोळी रायन्ना राज्याभिषेकास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कर्नाटक राष्ट्रीय समाज पक्ष राज्य शाखेतर्फे केले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...