रविवारी कळंबोलीत सुदामशेठ जरग यांच्या सत्काराचे आयोजन
रविवार, दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी सुधागड हायस्कूल, कळंबोली येथील सभागृहात राष्ट्रीय समाज पक्षाचे शिलेदार श्री. सुदामशेठ जरग यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती कळंबोली शहर शाखेचे अध्यक्ष श्री. आण्णासाहेब वावरे यांनी यशवंत नायक ब्यूरोशी बोलताना दिली.
नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी सुदामशेठ जरग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुदामशेठ जरग यांची राज्य कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रासपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, प. महाराष्ट्र अध्यक्ष एड. संजय माने- पाटील, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरदभाऊ दडस, युवा नेते अजितदादा पाटील यांनी मागील आठवड्यात मॅकडोनाल्ड हॉटेल येथे भेट घेऊन अभिनंदन केले आहे. श्री. वावरे पुढे म्हणाले, सायंकाळी ५ वाजता कळंबोली शहरात रासप पदाधिकारी कार्यकर्ते यांची रॅलीचे नियोजन करत आहोत. सुदामशेठ जरग यांचा कळंबोलीतील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये वावर असल्याने सर्वपक्षीय नेत्यांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करू. तसेच कळंबोली कामोठे येथील रासप पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करू.
No comments:
Post a Comment