Wednesday, January 17, 2024

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस धास्तावले... धनगर समाज उपोषणकर्तेना केली अटक?

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस धास्तावले... धनगर समाज उपोषणकर्तेना केली अटक?

मुंबई  : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. धनगर समाजाला दिलेल्या खोट्या आश्वासनामुळे त्यांना वेगवेगळ्या मार्गाने धनगर समाजातील युवक जाब विचारत आहेत? धनगर समाजाच्या एस. टी आरक्षण अमंबजावणीसाठी उपोषणास बसलेले उपोषणकर्तेना काल रात्री 12 वाजता अटक केल्याने समाज माध्यमातून निषेध नोंदविण्यात येत आहे. धनगर समाजाची मागणी नसताना टीस सारखी संस्था नेमून आरक्षणाला अडथळ निर्माण करणे, भाजपची मातृ संघटना असणाऱ्या वनवासी कल्याण तर्फे धनगर आरक्षण विरोधात याचिका टाकणे यामुळे धनगर बांधवांच्या भावना अधिक तीव्र आहेत. 

सत्ता मिळवण्यासाठी भाजपच्या नरेंद्र मोदी ते  देवेंद्र फडणवीस या सर्वांनी धनगर समाजाची मते लाटण्यासाठी केलेली विधाने धनगर समाज अद्याप विसरलेला नाही. यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली जाते. केंद्र व राज्यात सत्ता असूनही धनगर समाज आरक्षण प्रश्न सुटत नसल्याने विशेषतः  तरुणांमध्ये राज्यभर संतापाचे वातावरण आहे. राज्यातील 23 जिल्हा परिषदमध्ये चुकीचे पद्ध्तीने आरक्षण दाखवून धनगर समाजाला शिक्षक भरतीमध्ये एकही जागा नसल्याने शिक्षित युवकांमध्ये आक्रोश सुरू आहे. गेल्या महिन्यात धनगर समाज बांधवांनी तब्बल ६ तास पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता, यातून धनगर समाज बांधवांच्या भावना किती तीव्र असतील याचा परिचय होतो. 

सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात उपोषण करणाऱ्या युवकांना पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेतले आहे. पोलिस बळ वापरून धनगर समाजाचा आवाज दाबला जातोय की काय, अशी शंका देखील उपस्थितीत केली जातेय. अजून लोकसभा निवडणूक बाकी आहे, निवडणुकीच्या अगोदरच देवेंद्र फडणवीस यांनी धास्ती घेतलीय का?, राज्य व केंद्र सरकार ओबीसी धनगर समाजाचे प्रश्नाला बगल देत असल्यामुळेच महादेव जानकर यांनी भाजप पुरस्कृत महायुती मेळाव्यापासून दूर राहणे पसंद केले आहे. कळंबोली नवी मुंबईत बोलताना महादेव जानकर यांनी धनगर, ओबीसी समाज विकासाच्या मुद्द्यावरून घणाघाती निशाणा साधलाय. भाजप, काँग्रेस हे केवळ मते मिळवण्यासाठी पिवळा झेंडा वापरतात, त्यामूळे त्यांना पिवळा झेंडा वापरू देऊ नका, असे आवाहन भूतपूर्वमंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. "फडणवीसांना धनगर समाजाची इतकी भीती वाटत असेल तर, मस्तीत वागणाऱ्या भाजपचे निवडणुकीत मतांच्या माध्यमातून तोंड  १००% काळ करू", असा इशारा धनगर युवा साम्राज्य सेनेचे अध्यक्ष आशुतोष शेंडगे यांनी दिलाय.


राज्य सरकारला धनगरांची भिती का वाटतेय?

कराड येथील उपोषणकर्ते जयप्रकाश हुलवान यांना रात्री १२ वा अटक का केली? राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन नेमकं काय करू पाहत आहेत.

सदर घटनेचा जाहीर निषेध
- शरद गोरड, धनगर आरक्षण उपोषणकर्ता. 

3 comments:

  1. फसवणीस यांचा धिक्कार असो... बोलो, क्या हुआ तेरा वादा?

    ReplyDelete
  2. सरकार हम धनगरों से डरती है, कभी चमचा तो कभी पुलीस को आगे करती है !

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...