पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय सिडको येथे महिला वाचक मेळावा संपन्न
नवीन नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई, राणी तुळसाबाई होळकर, विरंगणा झलकारीआई यांच्या जयंतीनिमित्त महिला वाचक मेळावा व ज्ञानदानाचा कार्यक्रम प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य माणिकराव मुलगीर, प्रमुख पाहुणे प्रा.डाॅ.शारदाताई माने, डॉ.सीमाताई मदने, डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर, डॉ गणपत जिरोनेकर, डॉ. श्रीराम श्रीरामे , यांची भाषणे झाली.
प्रमुख वक्त्या प्रा. शारदाताई माने मार्गदर्शन करताना म्हणाले, मी आज येथे सन्मानाने उभी आहे. ती राष्ट्रमाता सावित्रीमाईमुळे, जर सावित्रीमाईनी स्त्रियासाठी शिक्षणाचे दारे उघडे केले नसते, तर मी शेतात मजुरी केले असते. म्हणून सर्व महिलांनी सावित्रीमाई आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या पाल्यांना घडविण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्रबोधनकार गोविंदराम शूरनर म्हणाले, राजमाता जिजाऊने इतिहास वाचल्या म्हणून मुलाला राजा बनविले, सावित्रीमाई फुले नी शेणमारा खाऊनही बहुजन स्त्रियांना शिक्षण शिकविले म्हणून आजची स्त्री देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती होत आहे. राणी तुळसाबाई व विरंगणा झलकरबाई स्वातंत्र्या साठी इंग्रजा विरूध्द लढता लढता रंणागंनावर वीरमरण पत्कारले म्हणून भारत देश स्वातंत्र्य झाला. आजच्या काळातील स्त्रियांनी त्यांचा आदर्श घेवून घरा घरात छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, राष्ट्रमाता सावित्री, महाराणी अहिल्याई घडवण्याचे कार्य करावे. त्यासाठी अंध्दश्रध्देवर होणारा खर्च टाळून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कविता नाईक यांनी केले तर आभार ग्रंथपाल मदनेश्वरी देवकते यांनी केले.