शेळी मेंढी विकास महामंडळाला निधी कधी मिळणार ? : आनंद कोकरे
मुंबई/आबासो पुकळे
सगळ्या महामंडळांना निधी मीळाला तोही दुप्पट परंतू शेळी व मेंढी विकास महामंडळास निधी कधी मीळनार..?? असा प्रश्न मेंढपाळपुत्र आर्मीचे संस्थापक आनंद कोकरे यांनी उपस्थित केला आहे. महामंडळाच्या निधीवरून सरकारला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेंढपाळ बांधवांकडून सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय विभागाकडील 4 महामंडळांच्या भाग भांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल 500 कोटी वरून वाढवून 1000 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 300 कोटी वरून 1000 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे 73.21 कोटी वरून 1000 कोटी आणि दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटी वरून 500 कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला डावलण्यात आल्यामुळे मेंढपाळ बांधवांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आवळला आहे.
लोकसंस्कृतीचे अभ्यासक श्रीकांत हंडाळ यांनी म्हटले आहे, Dhananjay Munde साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ पण आहे लक्षात असू द्या, नेहमी बांधवांचा फक्त मतदानासाठी वापर होतोय असा गैरसमज आम्हा सर्वांचा होऊ नये एवढच....
इतिहास संशोधक रामभाऊ लांडे यांनी सामाजिक न्याय विभागाकडून झालेल्या असामाजिक न्यायाचा निषेध व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाने काय पाप केले होते. निदान परळी तालुक्यातील 30 हजार धनगर बांधवांनी आपल्याला मतदान केले त्यांचा तर विचार करायला हवा होता. बहुजन सुखाय बहुजन हिताय आपल्या निर्णयात कुठेच दिसत नसल्याने आपल्या ठराविक भूमिकेचा व सामाजिक न्याय विभागाकडून झालेल्या असामाजिक न्यायाचा आम्ही निषेध करतो.
No comments:
Post a Comment