कुकुडवाड, पुकळेवाडीमध्ये आज श्रीराम नवमी निमित्त कार्यक्रम
कुकुडवाड ता- माण येथे श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. स. भ. श्री. रोहित वाळिंबे (पुणे) संगीतमय रामकथाकार यांचे कीर्तन होणार होणार असून, सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
"आम्ही श्री राम नवमी(राम जन्म) कार्यक्रम गावस्वरूपी करत आहोत. श्री गोंदवलेकर महाराजांनी सन:१९१२-१३ साली कुकुडवाड ता- माण जि- सातारा येथे श्रीराम मंदिर स्थापित केले आहे. कुकुडवाड मधील राममंदिरात तेव्हा पासून, श्री राम नवमी हा कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये आम्ही अन्नदान (महाप्रसाद ) ही संकल्पना सन:२०१५ पासून चालू केले आहे. आमचे चालू वर्ष 2022 हे 8 वे वर्ष आहे. दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात.
सकाळी अभिषेक,आरती, दुपारी कीर्तन, रामजन्म कार्यक्रम, भजन, सरबत वाटप, संपुर्ण गावामध्ये महाप्रसाद असतो. गावातील सर्व ग्रामस्थ व सर्व स्त्रिया,भक्तजन यांचा आनंद घेतात." - प्रसाद हुद्देदार, कुकुडवाड.
पुकळेवाडीत श्रीराम नवमी निमित्त आज सत्संग
दरवर्षिप्रमाणे आज दि.१० एप्रिल, २०२२ रोजी श्रीराम नवमी निमित्त श्रद्धेय श्री स्वानंदकाकांचे उपस्थितीत श्री गुरुपादुका पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रीगुरुपादुका पूजन व आरती, श्री मायाक्कादेवि मंडप येथे महाप्रसाद, दु.१ ते ३ श्री आसारामायण पाठ व भजन, दु.३ ते ५ श्रद्धेय श्री काकांचा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तरी कृपया जास्तीत जास्त संख्येने पुकळेवाडी ग्रामस्थ, बंधू-भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची नम्र विनंती, आयोजक निलेश पुकळे, पुकळेवाडी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment