बिरोबा यात्रेनिमित्त आरेवाडीत गुरूवारी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
मुंबई :- तमाम भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरोबा देवालय आरेवाडी (जि. सांगली) येथील यात्रेनिमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पु. अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन (PADMA) व कृष्णा येरळा प्रतिष्ठान, सांगली संस्थेच्या वतीने हे शिबिर आयोजित केले असून याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन PADMA चे डॅा. अरूण गावडे व कृष्णा येरळा प्रतिष्ठानचे डॅा. दिलीप मगदुम केले आहे.
PADMA संस्थेच्या वतीने मागील महिनाभरापासून या शिबिराची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असणारी औषधे संकलन, फार्मसिस्ट व तज्ञ डॉक्टरांच्या सहभाग तसेच स्थानिक यात्रा कमिटीशी समन्वय आदी पातळीवर सर्व तयारी झाली आहे.
सदर शिबिर गुरुवार दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ. अरुण गावडे, दंतरोग तज्ञ डॉ. दिलीप मगदूम, डॉ. सुनील मगदूम, डॉ. विक्रम कोळेकर, डॉ. स्वप्नील चोपडे, डॉ. अमित खरजे, डॉ. श्रीनिवास माने, डॉ. सखाराम गारळे, डॉ. विजय पाटील, डॉ. प्रमोद गावडे, डॉ. सुनील लवटे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. वर्षा चौरे, डॉ. नामदेव देशमुख व डॉ. आदर्श गावडे आदी तज्ञ डॉक्टर्स सहभागी होवून आरोग्यसेवा करणार आहेत.
ही यात्रा ऐन उन्हाळ्यात भरत असल्यामुळे बदलत्या हवामानाचा येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे अशा भाविकांना प्राथमिक इलाज व्हावा आणि येणाऱ्या सर्व भाविकांना तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य विषयक सल्ला मिळून उपचार व्हावा, या उद्देशाने या शिबिराचे मागील ७ वर्षांपासून आयोजन करण्यात येते.
तरी सदर शिरीबाचा जास्तीत जास्त भाविकांसह परिसरातील बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बिरोबा देवस्थान यात्रा कमिटी व PADMA व कृष्णा येरळा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment