Monday, May 31, 2021

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा भाजप, मोदी, शहा ना विसर

 महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा भाजप, मोदी, शहा ना विसर



सामाजिक - राजकीय विचारवंत सुदर्शन अक्किसागर यांचा 'मोदी, शहा'वर हल्लाबोल


मुंबई : आबासो पुकळे

भारता सारख्या विशाल भूप्रदेशावर आदर्श राज्यकारभार करणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा देशाच्या कानाकोपऱ्यात जयजयकार केला जात असताना देशात सत्ताधारी असलेल्या भाजप पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर साधा नामोल्लेख देखील केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, PMO india यांचे ऑफिशियली अकाउंट वर देखील सायंकाळपर्यंत तरी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करणारे पोस्ट प्रसारित केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावरूनच सामाजिक - राजकीय विचारवंत सुदर्शन अक्किसागर यांनी भाजप, मोदी - शहा यांच्यावर हल्लालाबोल चढवला आहे.

श्री. अक्किसागर यांनी म्हटले आहे की, गेल्यावर्षीप्रमाणे  याहीवर्षी देशाचे प्रचारमंत्री यांना महारानी अहिल्याबाई होळकर जयंती दिन आठवले नाही. सत्यतेसाठी त्यांचे ऑफिशियल ट्विटर अकाउंट पहावे. मागील वर्षीही असेच दिसले. नुकतेच काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनी'त महारानी अहिल्याबाई होळकर व देशाचे प्रचारमंत्री यांच्यात थेट अनेक बाबतीत चक्क 'समानता' दाखवीले होते हे निषेधार्ह होते. सर्वात वेदनादायक म्हणजे आमचेच काही विद्वान व समाजकारणी मंडळी हे असे समानता दाखविणारी बातमी जसे काय हे गौरवाची बातमी म्हणून ते शेअर करत होते. कळत नव्हते की येथे कोण कोणास फसवतो की कोण स्वता:हुन येथे फसवून घेतोय. असे आपलेच काहिंचे बळीचे चेहरे पाहिले की राग येतोच. असो, आणि हेहि आता तसे काही नवे राहिलेले नाही. आता याचीहि सवय झालेली आहे. हे मात्र येथे खेदानेच सांगावेसे वाटते.

आरएसएस, बीजेपी अमित शहा, वाराणसी येथून निवडून येणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पीएमओ इंडिया ऑफिशियल ट्विटर अकाउंट पाहिले असता  सांयकाळ'पर्यंत तरी पुण्यश्लोक, महारानी अहिल्याबाई होळकर जयंती दिनाची आठवण मात्र यांना होताना दिसली नाही.  आता यांचे धर्म संस्कृती आदिचे नुसते उपदेश ऐकून किळस आला आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांच्या लोकांनी 'मन की बात'  न ऐकण्याचेच ठरविले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी मोदी व शाह यांना सावरकर जयंती आठवते, पण चोंडी या गावी येणारे अमित शहा व मोदी यांना आज महारानी अहिल्याबाई होळकर जयंती आठवण झाली नाही. बिहार विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन काही विद्वान मंडळी एका वृत्त वाहिनीतिल होळकर व मोदी समानता दाखविनारे व्हीडिओ शेअर करित मोदीचें गुणगान करित होते, त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. आरोग्यमंत्री डॉ.  हर्षवर्धन व भाजपचे ऑटीसेलचे अमित मालवीय यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांची तुलना नरेंद्र मोदीशी केल्याने श्री. अक्किसागर यांनी संताप व्यक्त केला आहे.



Tuesday, May 25, 2021

माण तालुका पंचायत समितीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा

 माण तालुका पंचायत समितीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा



सभापतीपदी रासपच्या लतिका वीरकर विराजमान


दहिवडी : आबासो पुकळे

माण तालुका पंचायत समितीच्या सभापती राष्ट्रीय समाज पक्षाच्या सौ. लतिका बबनशेठ विरकर यांची बहुमताने निवड झाली. लतिका वीरकर यांच्यासाठी रासपचे ज्येष्ठ नेते बबनदादा वीरकर यांनी  संख्याबळ तयार करण्यासाठी प्रयत्न केले. आठ सदस्य वीरकर यांच्या बाजूने होते.   वरकुटे म्हसवड गणातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या लतिका बबन विरकर यांनी दणदणीत विजय मिळवला होता. सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे पंचायत समिती मध्ये खाते उघडणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पहिल्या महिला पंचायत समिती सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर,  ज्येष्ठ नेते बबनदादा विरकर, माजी  जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, एड. विलास चव्हाण, सातारा जिल्हा महिला आघाडी  जिल्हाध्यक्ष पूजाताई घाडगे, प्रा. सचिन होनमाने सर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

 

Monday, May 17, 2021

काँग्रेसमधील ओबीसींचा कोहिनुर हिरा निखळला ! : महादेव जानकर.

काँग्रेसमधील ओबीसींचा कोहिनुर हिरा निखळला ! : महादेव जानकर



मुंबई :  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील ओबीसींचे युवा नेते राज्यसभेचे खासदार श्री.राजीव सातव यांचं आज दिनांक-16 मे 2021 रोजी दुःखद निधन झालं. राजीव सातव यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो, काँग्रेस मधील युवकांचा कोहिनुर हिरा निखळला आहे, असा शाेक महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

 काेविडच्या महामारीमुळे ऐन तारुण्यातील खासदार,अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते  हिंगोलीचे खासदार हाेण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य हाेते. अखिल भारतीय युवक काॅंग्रेसमध्ये काम करत असताना त्यानी ओबीसींना या पक्षात जास्तीतजास्त काम करण्याची संधी कशी देता येईल यावर भर देत असत, प्रत्येक योग्य संधीचे त्यांनी साेने केले. स्वभाविकपणे देशातील युवकांचा तरुण नेता, पक्षाचा हाेतकरु व प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ख्याती होती.

राहुल गांधी यांचे विश्वासु म्हणून त्याना अनेक राज्यांची जबाबदारी दिली होती आणि ते ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडत हाेते, युवक काॅंग्रेसच्या कारिकर्दीत त्यानी त्यांच्याकडे युवक नेत्यांचा माेठा संग्रह उभा केला. काॅंग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावर प्रचंड माेठा विश्वास हाेता. त्यांना खूप चांगले भवितव्य हाेते. राहूल गांधी यांनी काॅंग्रेसची पुर्नरचना करताना युवक काॅंग्रेसमध्ये कामगिरी बजावलेल्यांना मोठी संधी दिली. त्यामधील खासदार राजीव सातव हे एक होते.

माझ्या माहितीप्रमाणे ते राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील पहिलेच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत. अश्या ह्या एकजिनसी युवा नेतूत्वाला आज आम्ही मुकलो आहोत, परंतु सातव यांचे संसदेमधील कार्य उत्तम हाेते. किंबहुना ते आदर्श संसदपटू होते, खरंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कामासाठी वाहून घेतले हाेते. त्यांना देखील खूप चांगले भवितव्य हाेते. त्यांची प्रकृती ठीक होईल असे आम्हांला वाटले हाेते. परंतु न होणे असे अघटीत घडले, मी दुःखी झालो, राजीव सातव यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझा राष्ट्रीय समाज पक्ष सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Thursday, May 6, 2021

मेंढपाळ तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणापासून वंचित राहू नयेत ; मेंढपाळ पुत्र आर्मीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मेंढपाळ तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणापासून वंचित राहू नयेत ; मेंढपाळपुत्र आर्मीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई : महाराष्ट्रासहित देश व जगभरामध्ये कोरोना विषाणुच्या आजाराने थैमान घातले असून. सर्वच जनजीवन ठप्प झालेले आहे. अशा जीवघेण्या आजारा विरोधात महाराष्ट्र राज्य सक्षमपणे लढत आहे. अश्यावेळी सध्या सर्वात प्रभावी उपाय या आजारावर लसीकरण हेच आहे. दरम्यान दि. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या लसीकरणापासून राज्यातील मेंढपाळ-भटक्या विमुक्त जाती जमाती वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेंढपाळपुत्र आर्मीच्यावतीने  निवदेन देण्यात आले आहे, अशी माहिती मेंढपाळपुत्र आर्मीचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रा. आबासो पुकळे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे की, लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी आधार क्रमांक किंवा तत्सम दस्ताऐवज सुद्धा गरजेचा आहे. मात्र अश्यावेळी राज्यातील मेंढपाळ-भटके विमुक्त जाती जमाती या प्रामुख्याने सतत स्थलांतरण करणाऱ्या आहेत. तसेच या जाती जमातींमध्ये शिक्षणाचा व तंत्रज्ञान जागृतीचा अभाव ही असून, हे लोक केवळ या काराणामुळे लसीकरणापासून वंचित राहू शकतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर म्हणजेच ग्रापंचायतमार्फत अधीवासाची कुठलीही अट न ठेवता, ऑफलाईन नोंदणी केंद्रे चालू करावी. तसेच ऑनलाईन नोदणी केंद्र चालू करण्याची व्यवस्था करण्यात यावी;  यासाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास सरपंच अथवा संबंधित आरोग्य अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या प्रमाणपत्रावर लसीकरण नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. अशी विनंती मेंढपाळपुत्र आर्मीच्यावतीने करण्यात आली आहे.

राज्यातील पत्रकारांना लसीकरण करा : महादेव जानकर

राज्यातील पत्रकारांना लसीकरण करा : महादेव जानकर



मुबंई : राज्यातील पत्रकार, मिडिया सेलच्या प्रतिनिधींना प्राधान्याने लसीकरण करून देण्याबाबत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे.

श्री. जानकर यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रोज शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशातच पत्रकार, मीडिया सेलचे प्रतिनिधी हे बातमीदारीसाठी कायमच घराबाहेर पडत असतात. त्यातच त्यांचा असंख्य रुग्णालय व कोरोना बाधित लोकांच्या नकळत संपर्कात गेल्याने त्यांना तसेच त्यांच्या कुटूंबाना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तरी तमिळनाडू, मध्यप्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, या राज्याप्रमाणे पत्रकारांना  सुद्धा अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावे.

लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महारज : डॉ.श्रीमंत कोकाटे

लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महारज  : डॉ.श्रीमंत कोकाटे

 


छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कसबा बावडा येथे झाला.1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादीवरती दत्तक म्हणून आले.1884 ते 1894 या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले. 1894 साली त्यांना राज्याभिषेक झाला.

 राज्याभिषेकानंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले,  छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये  प्रचंड वात्सल्य होते.ते जसे स्वाभिमानी होते,तसेच ते प्रेमळ होते. आपल्या राज्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. राज्यारोहणामुळे शाहू महाराजांचा सत्कार पुण्यातील सार्वजनिक सभेने आयोजित केला होता, त्यादरम्यानच पुण्यात हिंदू-मुस्लिम दंगल झालेली होती आणि या दंगलीला टिळकाची मदत होती, टिळक हे वयाने शाहू महाराजांपेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. सत्कार प्रसंगी शाहू महाराज म्हणाले "हिंदू-मुस्लिमांनी एकोप्याने राहावे, भांडण करू नये" शाहू महाराजांची वयाच्या विसाव्या वर्षीची प्रगल्भता ही त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आहे.टिळक दंगल घडविण्याच्या बाजूचे तर शाहू महाराज शांतता प्रस्थापित करणारे होते.

 शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली.

पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नाशिक येथील उदाजी मराठा शिक्षण संस्था, नागपूर येथील शिक्षण संस्था, चेन्नई येथील शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात शाहू महाराजांचा पुढाकार होता.रयत शिक्षण संस्था स्थापन करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण शाहू महाराजांच्या राजवाड्यावर राहून झाले. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.

  राजर्षी शाहू महाराजानी 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. 1919 साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. बाजारपेठ स्थापन केली. जयसिंगपूर शहराची स्थापना केली. त्यांनी भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर 1908 साली बांधले. छत्रपती शिवाजी राजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा 1921 साली  पुणे या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते उभारला. पहिले शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.

1899 साली वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या पुरोहिताची त्यांनी हकालपट्टी केली. बहुजन पुरोहित तयार करणारी शिवाजी वैदिक शाळा त्यांनी सुरू केली. डोणे नावाचे धनगर विद्वान  त्या शाळेचे  प्राचार्य होते. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित नावाचे पुस्तक लिहिले. बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही हे त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना करून सिद्ध केले. स्वतंत्र धर्मपीठावर त्यांनी सदाशिव लक्ष्मणराव पाटील बेनाडीकर या विद्वानाची नियुक्ती केली. 

शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही. याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा, यासाठी 1902 साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय. प्रशासनातील  एकाधिकारशाहीला त्यांनी पायबंद घातला.त्यांनी सर्व जातींना प्रसासनात प्रतिनिधित्व दिले.

शाहू महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते,त्यांनी भविष्य,पंचांग,मुहूर्त कधीही पाहिला नाही.भविष्य सांगण्यासाठी आलेल्या जोतिष्याला तुरुंगात डांबून त्याला बुद्धिप्रामाण्यवादाचे महत्व  पटवून दिले.त्यांनी भाकडकथा, पुराणकथा नाकारून प्रतिगामी विचारांना नेस्तनाबूत केले.त्यांनी ग्रंथप्रामान्य नाकारले.

 आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी आपले राजेपद पणाला लावले. ज्या जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलेले होते, अशा जातीवरचे निर्बंध राजांनी उठवले. त्यांना नियमित हजेरीतुन मुक्त केले. त्यांना आपल्या राज्याच्या संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावरती नेमले. अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी ते अस्पृश्याच्या घरी जेवले. अस्पृश्यांना आपल्या राजवाड्यावर स्नेहभोजन ठेवले. अन्यायग्रस्त गंगाराम कांबळेला न्याय देऊन त्याला हॉटेल टाकून दिले. त्या हॉटेलला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी स्वतः शाहू महाराज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जात असत. महार, मांग, चांभार इत्यादी पैलवानाबरोबर देशभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्ती खेळावी म्हणून त्यांना जाट, सरदार, पंडित अशी नावे दिली. 

जातिभेद नष्ट व्हावा यासाठी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली. याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून केली त्यांनी आपली बहीण चंद्रप्रभादेवी यांचा विवाह इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्या बरोबर निश्चित केला, तो पुढे राजाराम महाराजांनी लावून दिला, असे सुमारे 25 आंतरजातीय विवाह घडवून आणले, यातून त्यांनी मराठा- धनगर आणि इतर जाती एकमेकांचे विरोधक नसून नातेवाईक आहेत, हे सिद्ध केले. म्हणजे शाहू महाराज हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते,

छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था मोडणारी व समता प्रस्थापित करणारी परंपरा आहे, छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था पाळणारी विषमतावादी परंपरा नाही,छत्रपतींची परंपरा प्रगल्भ परंपरा आहे,ती संकुचित नाही.

शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. मूकनायक या नियतकालिकासाठी मदत केली. शाहू महाराज म्हणाले "बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत आणि तेच खरे लोकमान्य आहेत". शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांचा सत्कार केला, याप्रसंगी शाहू महाराज म्हणाले "रमाबाई माझी धाकटी बहीण आहे, तुम्ही लंडनवरून परत येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो"  

 माणगाव आणि नागपूर येथील परिषदेत जाऊन शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खंबीर पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्प वरती स्नेहभोजन दिले आणि मानाचा जरीपटका देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात  "छत्रपतींनी मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला, त्याचा मी सदैव सन्मान राखीन" 

शाहू महाराजांच्या मुला-मुलींच्या लग्नात करवले म्हणून भटक्या विमुक्त, दलित जातीतील समवयस्क मुला-मुलींना सोबत घेतले होते, जेणेकरून विषमता नष्ट व्हावी व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, हे शाहू महाराजांचे धोरण होते.

शाहू महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू-मुस्लिम हा भेद केला नाही. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी त्यांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. आपल्या राज्यातील गरिबातल्या गरीब मुस्लिमांना कुराण मराठी भाषेत वाचता यावे, यासाठी अरबी भाषेतील कुराणाचे मराठी भाषांतर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली. शंभर वर्षांपूर्वीची ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे. शाहू महाराजांनी पाटगावच्या मौनी बाबाच्या मठाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील मुस्लिमांच्या मशिदीच्या बांधकामासाठी दिली, तर रुकडीतील पिराच्या देवस्थानाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील अंबाबाई मंदिराच्या बांधकामासाठी व दिवाबत्तीसाठी दिली, इतका सामाजिक सलोखा शाहू महाराजांच्या राज्यात होता.

शाहू महाराजांनी शाहीर लहरी हैदर, चित्रकार आबालाल रहमान, गानमहर्षी अल्लादिया खाँसाहेब, मल्लविशारद बालेखान वस्ताद,बालगंधर्व यांना सर्वतोपरी मदत केली. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.

शाहू महाराजानी आपल्या राज्यात सर्वांचा विकास आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे संघर्ष केला, परंतु आज सामाजिक वातावरण बिघडवले आहे, जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पेरले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सर्व समाज बांधवांनी एकोपा जपावा, हे शाहूचरित्र सांगते, 

  शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा आपण कायम ठेवणे, हेच खरे शाहू प्रेम आहे.शाहू राजांची जयंती(२६ जून) सणासारखी साजरी करा, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले आहे,त्यांच्या विचारांचे आपण आचरण करूया.आज शाहू महाराजांचा स्मृतिदिन(६ मे) आहे,स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

- डॉ.श्रीमंत कोकाटे

पुकळेवाडी अखंड हरिनाम सप्ताह पारायणास एक तप एक वर्ष पूर्ण

पुकळेवाडी अखंड हरिनाम सप्ताह पारायणास एक तप एक वर्ष पूर्ण

प्रतिनिधिक स्वरूपात वारकरी दिंडी काढून परायणाची सांगता

ह.भ.प अशोक महाराज मांडवेकर यांच्या शुभहस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. यावर्षी दि. २८ एप्रिल २०२१ रोजी अखंड ग्रंथराज ज्ञानेश्वरी  पारायण सप्ताहाची सुरवात करण्यात आली होती. दि. ३ मे २०२१ रोजी भगवान श्रीकृष्ण पूजा, कलश पूजा, ग्रंथ पूजा, विना पूजा यासह अनेक विधी पूर्ण करून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच श्री. ब्रम्हदेव पुकळे यांच्याहस्ते ह.भ.प अशोक महाराज मांडवेकर यांचा श्रीफळ देऊन पुकळेवाडी ग्रामस्थातर्फे आभार मानण्यात आले. कोरोना महामारीच्या साथीमुळे भव्य दिव्य अंखड हरिनाम सप्ताह करता आला नसला तरीही सामाजिक अंतर व कायद्याचे पालन करून यावर्षीचा सप्ताह पार  पडल्याने  परायणास एक तप एक वर्ष पूर्ण झाले. श्री. सिद्धनाथ पुकळेवाडी धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेने नियोजन केले होते.

- आबासो पुकळे

Wednesday, May 5, 2021

उत्तर प्रदेशात २०२२ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी रासपची तयारी : भुरेसिंह

उत्तर प्रदेशात २०२२ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी रासपची तयारी : भुरेसिंह

भुरेसिंह, महासचिव-उत्तर प्रदेश रासप

मुंबई : उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने खाते उघडल्यानंतर रासपने २०२२ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारी केली आहे, असे मत रासपचे उत्तर प्रदेश महासचिव भुरेसिंह यांनी व्यक्त केले. भुरेसिंह 'यशवंत नायक'शी बोलत होते.

श्री. भुरे सिंह पुढे म्हणाले, राज्यातील जनतेचा भाजप सरकाने भ्रमनिरास केला तर सपा, बसपा पार्टीवर जनतेचा भरोसा नाही. राज्यात रासपची सत्ता आणून दिल्लीच्या धर्तीवर वीज, पाणी प्रश्नावर काम करू.  राज्यातील ४०३ मतदारक्षेत्रात रासपची मोर्चेबांधणी चालू आहे.  उत्तर प्रदेशात सर्वाधिक मतदार असलेल्या साहेबाबाद मतदारसंघातून स्वतः निवडणूक मैदानात उतरणार आहे.

व्हायरल व्हिडीओ मानदेशातील मेंढपाळांचा

आबाजी बनगर आणि मोहन विरकर दोघे राहणार म्हसवडजवळील शेंबडेवस्ती.  मेंढ्या चारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जळुबाई या गावी आहेत. तिथेच या दोघां मेंढपाळांनी मोबाईलवर ढोल आणि सनयच्या सुरात आपल्या परंपरेचा कलेचा ताल धरला. "निराशेच्या गर्तेत ऊर्जा देणारी संस्कृती.." या नावाने तो व्हीडीवो व्हायरलं झाला  आहे.



Sunday, May 2, 2021

दादांच्या स्मृतीस विनम्र भावांजली !

 दादांच्या स्मृतीस विनम्र भावांजली !



आमचे थोरले चुलते श्री. बबन केरु पुकळे (दादा) यांना काल ईश्वर आज्ञा झाली. जुन्या काळात ७ वी शिक्षण घेतले होते. त्या काळात  गणित विषयात प्रचंड हुशार असणारा विध्यार्थी म्हणून ते प्रसिद्ध होते. शासकीय नोकरी मिळवण्याची क्षमता असून देखील त्यांनी पारंपरिक मेंढपाळ व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतले. मेंढपाळ व्यवसायात देखील खिलारी (मेंढपाळातील प्रमुख) होते. लिखे पढे असल्याने गावातील मेंढपाळांची व्यवहाराची मांडपुस त्यांच्याकडे होती. कुटुंबात त्यांना मान, सन्मानाने पहिले जात होते.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...