Thursday, June 27, 2024

बेळगावात कुरुबरा (हालुमाता) समाज कल्याण संघातर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती

बेळगावात कुरुबरा (हालुमाता) समाज कल्याण संघातर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती

विद्यार्थ्यांचा प्रतिभा पुरस्कार प्रदान करून गुणगौरव 

बेळगाव / कर्नाटक दि. 23/06/2024  

कुरुबरा हालुमाता समाज कल्याण संघातर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती व विद्यार्थी प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम उत्साहपूर्वक संपन्न झाला. कुरुबर (हालूमत) समाज क्षेमाभिवृद्धी संघ, बेळगावी लोकमाता अहिल्यादेवी होळकर 299 वी जयंती उत्सव दिनांक 23 जून 2034, रोजी सकाळी 10.30 वाजता कन्नड साहित्य भवन, कित्तूर चेन्नमा सर्कल, बेळगावी येथे श्री सिद्धयोगी अमरेश्वर कौलगुड (अथणी) यांच्या आशीर्वचन आणि मार्गदर्शनखाली संपन्न झाला. 

महिलांना अबला मानले जाते, परंतु लोकमाता अहिल्याबाई होळकर या देशातील सबला सक्षम महिलां याचे मुर्तीमंत उदाहरण असल्याचे, श्री सिद्धयोगी अमरेश्वर यांनी प्रतिपादन केले. कुरुबर समाजाने याला त्याला मागणी करण्यापेक्षा स्वतः दान करून समाज मंदिरसाठी निधी उभारावा असे आवाहनही स्वामींनी केले. 

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी या देशातील सर्व तीर्थक्षेत्रास दान देऊन जीर्णोद्धार केला. त्या महादेवाच्या भक्त होत्या, शिवपिंड पूजक होत्या. तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी देशाच्या एका मोठया भूभागावर 18 व्या शतकात तब्बल 30 वर्षे राज्य केले.  कल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या त्या एकमेव हिंदू भारतीय महिला आहेत.  अहिल्यादेवी होळकर यांचा धार्मिक सामाजिक चेहरा दाखविला जातो, परंतु त्यांचा राजनैतिक अश्वारूढ  तलवारधारी प्रतिमा का व कोणी लपविला, असा सवाल राष्ट्रीय समाज पार्टी माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिद्धपा अक्कीसागर यांनी आपल्या भाषणात केला. 








निमंत्रण आयोजन संघाचे अध्यक्ष शिवाजी हावळी आणि कार्यदर्शी चेतन अप्पूगोळ यांनी केले. श्रीमती रेखा दलवाई यांनी प्रास्ताविक केले. सौ. मंगलाताई हुग्गी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एस.एस.सी व  एच. एस. सी परिक्षेमध्ये नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रतिभा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बेळगावचे  माजी महापौर मा. यल्लप्पा कुरुबर, निवृत्त पोलीस एस. पी. मा. अशोक सदलगी, उद्योजक सिद्धपा पुजारी, केएएस अधिकारी मा. अशोक गोंडे, समाज सेवक अशोक अप्पूगोल, मा. महादेव बरगाले, प्रा. राजीव चिंगरे, संघाचे ज्येष्ठ नेते  लककपा सांब्रेकर, शशिकांत कडेमनी, लोकेश कडेमनी, बाबू कुरुबर,  विजय कोटरे, बेळगाव रासपाचे प्रभारी बलराम कामनावर सहित अनेक गणमान्यवर उपस्थित होते. सौ. शोभा सदलगी, सौ पद्मा सुंठे, सौ. सुनंदा अक्कीसागर, सौ.रेणुका अप्पूगोल, सौ शोभा बनशंकरी आदी यासहित महिला वर्गाचा मोठा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...