राष्ट्रीय समाजाला महामानवांचा वारसा पुढे घेऊन जावे लागेल : महादेव जानकर
![]() |
चेन्नई : बँक ऑफ बडोदा ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे 8 व्या महासंमेलनात बोलताना महादेव जानकर व मंचावर अन्य. |
चेन्नई (२६ मे २०२४) : राष्ट्रीय ओबिसी समाजाला महामानवांचा वारसा पुढे घेऊन जावा लागेल, असे प्रतिपादन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. अखिल भारतीय बँक ऑफ बडोदा ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे ३० वे वर्ष महासंमेलन पार पडले. यावेळी जानकर बोलत होते. या संमेलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या समवेत खा. थोल थिरूमावलन, ऑल इंडिया ओबीसी कर्मचारी फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव जी. करुणानिधी, बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर श्रवण कुमार, तमिळनाडू विधानसभा सदस्य एस एस बालाजी, मंडल व्हॉईस ऑफ ओबिसीचे संपादक एड. आर नटराजन, राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिध्दप्पा लक्ष्मण अक्कीसागर, रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, कोषाध्यक्ष सी जयकुमार यांची खास उपस्थिती होती.
यावेळी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मार्गदर्शन करताना म्हणाले, देशभरातून उपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी यांना भारतीय बँक ऑफ बडोदा ओबीसी कर्मचारी असोसिएशनची ८ वी अखिल भारतीय परिषद व ३० व्या वार्षिक समारंभास राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे शुभेच्छ्या देतो. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित यादव, महासचिव जॉर्ज फर्नांडिस आणि पूर्ण कार्यकारणी यांनी आजच्या ऐतीहासिक कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद देईन.
श्री. जानकर पुढे म्हणाले, आज आपण राष्ट्र उभारणीत पिढ्यान पिढ्या खपलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकत्र आलेलो आहे. हा समाज एका दाण्याचे हजार दाणे निर्माण करण्याची क्षमता असलेला समाज आहे. हा समाज देणारा समाज आहे. या समाजाला मी राष्ट्रीय समाज मानतो. खेदाने सांगावे लागेल, राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या समाजाला काहीही विकास झाला नाही. एकूण लोकसंख्येत ५४ टक्के लोकसंख्या असूनही स्वतंत्र भारतात नेहमी भीक मागावी लागत आहे. आपल्या बँकेचेच पाहा अद्यापपर्यंत ओबीसी समाजाचा चीफ जनरल मॅनेजर झालेला नाही. लोकसभा निवडणूकीत मी परभणी लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढवली. आम्ही किती दिवस मागत राहायचं. आपण मागणारे नाही तर देणारे आहोत. जिस बाप का बेटा लायक होगा है उसकी कद्र होती है, जिस बाप का बेटा नालायक होता है उसकी बेइज्जत होती है| स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले, नारायण गुरु, शाहुजी महाराज, महारानी अहिल्यादेवी होळकर, पेरियार रामास्वामी, कर्पुरी ठाकूर, बी. पी. मंडल, विश्वनाथ प्रताप सिंह, अर्जुन सिंह यांचे वारसदार आहोत. यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्याला उचलावी लागेल. महामानवांच्या विचारानेच आपल्या सत्ता मिळवावी लागेल.
No comments:
Post a Comment