Saturday, October 18, 2025

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी 

मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे . राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आगामी महानगरपालीका निवडणूकीच्या अनुषगांने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर महापालीकेच्या निवडणूका संदर्भात तातडीच्या बैठकीचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकरसो यांच्या आदेशानुसार आझाद मैदान मुंबई येथील पक्ष कार्यालयात करण्यात आले होते. बैठकीसाठी राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य प्रदेश सरचिटणीस अजितदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तौसीफ शेख, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, राज्य कार्यकारणी सदस्य विठ्ठल यमकर उपस्थित होते. 

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक कामाचा आढावा घेतल्यानंतर निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी चर्चा करण्यात आली. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

बैठकीसाठी मुंबई प्रदेश खजिनदार महावीर (आण्णा) वाघमोडे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष रामधारी पाल, अल्पसंख्याक आघाडी मुंबई सचिव इकबाल अन्सारी, ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष संजय उपाध्याय, दक्षिण मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख जीवाराम बघेल, कोकण उपाध्यक्ष रमेश कारंडे, पालघर नेते रामदरश पाल, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष यादव, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल यादव, मुंबई महिला आघाडी सचिव कविता झवेरी, कुर्ला विधानसभा अजित लाडे, मिरा भाईंदर अध्यक्ष संजय मकवाना, उत्तर मुंबई जिल्हा सचिव सुरेश जयस्वार, उत्तर भारतीय वार्ड अध्यक्ष मानखुर्द ओमप्रकाश यादव, ईशान्य मुंबई युवक जिल्हाध्यक्ष विजय जयस्वार, चेंबूर तालुकाध्यक्ष अभय धारपवार, अंधेरी पूर्व माजी अध्यक्ष लक्ष्मण लेंगरे, अंधेरी माजी तालुकाध्यक्ष बिरदेव सरगर, मानखुर्द वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष मोहन करडे, माजी जिल्हाध्यक्ष ललन पाल, उत्तर मुंबई व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष अली मोहम्मद शेख, मुंबई महिला आघाडी सचिव रीमा मोहिते, बदलापूर शहर युवक आघाडी अध्यक्ष अजय चौगुले व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली 

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

मुंबई : राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे फसवे सरकार आहे. खोटी आश्वासने देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडले. मुंबई मराठी पत्रकार संघात रासपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेवते बोलत होते. यावेळी रासपचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष तोसीफ शेख, राज्य सरचिटणीस अजित पाटील, ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते.

श्री. शेवते पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यावर सरकारनिर्मित बाजारभावाचे आणि नैसर्गिक अतिवृष्टीचे संकट असे दुहेरी संकट असताना राज्य सरकारने शेतकऱ्याची थट्टा करू नये. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाने अकोला, बीड, नांदेड, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, सातारा, जालना, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, लातूर, धाराशिवसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. अक्षरशा शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना, राज्य सरकारने तुटपुंजी मदत करून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. उद्योगपतीना हजारो कोटींचे पॅकेज देऊन घसघशीत मदत करता आणि जगाचा पोशिंदा, राष्ट्राचा अन्नदाता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देता, हे राष्ट्रीय समाज पक्ष खपवून घेणार नाही. तटपुंजी मदतीच्या नावाखाली दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत ठणकावले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीके मातीमोल झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा पिकाचे भाव कोसळले आहेत. कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नाही. अतिवृष्टीने कोसळलेल्या शेतकऱ्यांना उभे करायचे सोडून, धनदांडग्या भांडवलदारांचे लाड केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला. श्री. शेवते पुढे म्हणाले, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे मदत केली पाहिजे. छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना मदत केली पाहिजे.

बोगस शिक्षक भरती अंगलट; मालेगावात तीन शिक्षण अधिकारी निलंबित

बोगस शिक्षक भरती अंगलट; मालेगावात तीन शिक्षण अधिकारी निलंबित

मालेगाव शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात गाजलेल्या येथील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अखेर शिक्षण विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले.

निलंबित अधिकऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे, तत्कालीन वेतन अधीक्षक सुधीर पगार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

या तिन्ही अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली होती. ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत राहिल्याने त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत हे अधिकारी निलंबित राहणार आहेत. सदर शिक्षक भरती घोटाळा प्रकरण मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेतलेल्या भरती प्रक्रियेत अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिन्ही पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मालेगाव येथील मालेगाव हायस्कूल व महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेच्या या. ना. जाधव विद्यालयात अकरा बोगस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या घोटाळ्याप्रकरणी पवारवाडी व छावणी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाकडून तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण पाटील, सुधीर पगार व उदय देवरे यांना यापूर्वीच अटक केली होती. त्यांना पोलिस कोठडी व न्यायालयीन कोठडीदेखील सुनावण्यात आली होती. आता शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

माणमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंतांना संधी देणार : इंजि. दादासाहेब दोरगे

माणमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंतांना संधी देणार : इंजि. दादासाहेब दोरगे 

मुंबई (१५/१०/२५) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे, मत रासपचे सातारा जिल्हाउपाध्यक्ष इंजि. दादासाहेब दोरगे यांनी व्यक्त केले. श्री. दोरगे हे यशवंत नायक'शी बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला गेलेल्या लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन केले.

श्री. दोरगे पुढे म्हणाले, माण तालुक्यात गावगाड्याच्या विकासाशी निगडीत अनेक मोठ्या समस्यांचा डोंगर आहे. शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. अतिवृष्टीने छोटे मोठे व्यावसायिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना, नुकसानग्रस्तांना वंचित ठेवणे किंवा किरकोळ मदत देण्याचे काम शासन करत आहे. सोलापूर, सांगलीच्या मार्केटमध्ये कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नसल्याने माण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत. अनेक शासकीय कार्यालयात खासगी लोकांची सुळसुळ असून, अनेक शासकीय योजनांचा लाभ गरजू पर्यंत मिळत नाही. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, असे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे. गावटगे मार्फत लोकांची दिशाभूल सुरू आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  महादेवजी जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून म्हसवड नगरपालिका, दहिवडी नगरपंचायत, माण पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊ. जनतेचे प्रश्न हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरू, असे श्री. दोरगे यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar Official  Dadaso Dorage #zpelection #mhaswad #nagarpalika #satara #manpanchayatsamiti

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

सातारा दि.16: सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी सासपडे येथे जावून चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.

चव्हाण कुटुंबीयांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करुन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

सासपडे सारखी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करुन काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिले.

Monday, October 13, 2025

महादेव जानकर यांच्या पक्षास मजबुत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज सत्ताधारी बनू शकत नाही : सिद्धपा अक्कीसागर

महादेव जानकर यांच्या पक्षास मजबुत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज सत्ताधारी बनू शकत नाही : सिद्धपा अक्कीसागर 

हैदराबाद (११/१०/२५) : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि कार्यकर्त्यास मजबूत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज्याच्या हाती सत्ता येणार नाही. सत्ता नसेल तर समाजाच्या समस्या सुटणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धपा अक्कीसागर यांनी केले. श्री. अक्कीसागर तेलंगणा राज्य राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीत पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आर्टस कॉलेज महबूबानगर, हैदराबाद येथे तेलंगणा राज्य राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीचे आयोजन केले होते.

श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, जोपर्यंत बुद्धिजीवी वर्ग आपल्या उपेक्षित समाजवर्गासाठी मदत करणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय समाजाच्या समस्या सुटणार नाहीत. बुद्धिजीवी वर्गाने पुढे येऊन समाज ऋण फेडण्याची आवश्यकता आहे. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी तन मन धनाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू इच्छितो. तेलंगणा राज्यात सत्ता ताब्यात घेण्यासाठी गावा गावात बूथ पर्यंत पक्षाचे राजकीय संघटन मजबूत केले पाहिजे.

यावेळी तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रमाकांत करगतला, प्रदेश उपाध्यक्ष रमेश दोडामणी, प्राचार्य राम शेफर्ड, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पांडू कोंनगला, रमेश कुरमा, रासेफचे मदनेश्वर शुरनर, सूर्यकांत गुंडाळे व अन्य उपस्थित होते.

Saturday, October 11, 2025

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली 

पत्रकार परिषदेत बोलताना काशिनाथ शेवते, बाजूस ज्ञानेश्वर सलगर, तोसीफ शेख 

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

मुंबई : राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे फसवे सरकार आहे. खोटी आश्वासने देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडले. मुंबई मराठी पत्रकार संघात रासपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेवते बोलत होते. यावेळी रासपचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष तोसीफ शेख, राज्य सरचिटणीस अजित पाटील, ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते.

     श्री. शेवते पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यावर सरकारनिर्मित बाजारभावाचे आणि नैसर्गिक अतिवृष्टीचे संकट असे दुहेरी संकट असताना राज्य सरकारने शेतकऱ्याची थट्टा करू नये. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाने अकोला, बीड, नांदेड, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, सातारा, जालना, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, लातूर, धाराशिवसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. अक्षरशा शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना, राज्य सरकारने तुटपुंजी मदत करून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. उद्योगपतीना हजारो कोटींचे पॅकेज देऊन घसघशीत मदत करता आणि जगाचा पोशिंदा, राष्ट्राचा अन्नदाता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देता, हे राष्ट्रीय समाज पक्ष खपवून घेणार नाही. तटपुंजी मदतीच्या नावाखाली दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत ठणकावले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीके मातीमोल झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा पिकाचे भाव कोसळले आहेत. कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नाही. अतिवृष्टीने कोसळलेल्या शेतकऱ्यांना उभे करायचे सोडून, धनदांडग्या भांडवलदारांचे लाड केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला. श्री. शेवते पुढे म्हणाले, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे मदत केली पाहिजे. छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना मदत केली पाहिजे.

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...